Union Budget 2024: अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण यांनी एक मोठी घोषणा केली आहे. सोन्यावरील कस्टम ड्युटी कमी होणार
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत आर्थिक वर्ष 2024 साठी अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. सोनं-चांदीच्या दराबाबतही अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोठी घोषणा केली आहे. सोन्या-चांदीवरील कस्टम ड्युटी कमी केली आहे. यामुळं सोनं-चांदी स्वस्त होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत होते. दोन महिन्यांपूर्वी सोन्यांने 75 हजारांचा पल्ला गाठला होता. त्यामुळं सर्वसामान्यांच्या चिंतेत वाढ झाली होती. भारतात सोन्याच्या सर्वाधिक मागणी आहे. स्त्रीधन म्हणून सोन्याकडे पाहिले जाते. त्यामुळं लग्नसराईत किंवा एखाद्या समारंभाला सोन्याच्या खरेदी आवर्जुन केली जाते. अशातच सोन्याचे दर आभाळाला भिडत आहेत. येत्या काही दिवसांत सोनं एक लाखांवर जाऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.
आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात सोनं,चांदी आणि प्लॅटिनमवर लागणाऱ्या कस्टम ड्युटीत कपात करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. या कपातीनंतर मौल्यवान धातु स्वस्त होणार आहेत. सोनं आणि चांदीच्या सीमा शुल्कात 6 टक्क्यांची घट होणार आहे. तर, प्लॅटिनमच्या कस्टम ड्युटीत 6.5 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. सरकारच्या या घोषणेनंतर देशात सोनं आणि इतर मौल्यवान धातुंच्या वायदे बाजारात किंमती कमी होणार आहेत.दरम्यान, यापूर्वी सोनं-चांदीवरील कस्टम ड्युटी 15 टक्के होती.
चांदीची किंमतही बजेट संपताच कोसळल्या आहेत. 2429 रुपये प्रति किलोपर्यंत चांदीची किंमत कमी झाली आहे. चांदीची किंमत 86774 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. सोनं स्वस्त झाल्याने आता पुन्हा एकदा मागणीत वाढ होऊ शकते.
Union Budget 2024 Budget 2024 Expectations Budget 2024 Expectations For Salaried Employees Budget 2024 Date Expectations From Budget 2024 Budget 2024 Gold And Silver सोनं-चांदी स्वस्त सोनं चांदी स्वस्त होण्याची शक्यता बजेट सोनं चांदी
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
मोठा दिलासा! अर्थसंकल्पापूर्वीच सोनं झालं स्वस्त; 18, 22, 24 कॅरेटचा भाव जाणून घ्याGold Price Today In Marathi: आज सोन्याच्या दरात मोठी घट झाली आहे. जाणून घेऊया सोन्याचा आजचा भाव
और पढो »
महिना सुरू होताच सोन्याच्या दरात घसरण, 24 कॅरेटचा दर जाणून घा!The Gold Price Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा घट झाली आहे. जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोनं स्वस्त झालं आहे.
और पढो »
India vs Pakistan चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तारखा अखेर जाहीर, भारत पाकिस्तानात जाणार? रिपोर्टनुसार, 'सरकारच्या...'चॅम्पिअन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) पाकिस्तानमध्ये (Pakistan) होणार असून भारत दौरा करणार की नाही हा मोठा प्रश्न आहे.
और पढो »
'कॅनडातून चोरलेलं 183 कोटींचं 400 किलो सोनं भारतात...'; 6600 सोन्याच्या विटा सापडेनात400 Kilograms Gold From Canada In India: कॅनडाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दरोडा असून एका वर्षाच्या तपासानंतर आता हे सोनं भारतात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
और पढो »
सोनं झालं स्वस्त, ग्राहकांना खरेदीची सुवर्णसंधी; 24 कॅरेटचा भाव जाणून घ्याGold Price Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या किमतीत घट झाली आहे. त्यामुळं ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला आहे.
और पढो »
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; उच्चांकी दरवाढीनंतर सोनं स्वस्त; वाचा 10 ग्रॅमचे भावGold Price Today On 27th June: सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. आज गुरुवार रोजी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.
और पढो »