Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडतंय. राज्यातील अकरा मतदारसंघात मतदान सुरु असून यापैकी बारामती लोकसभा मतदारसंघामधल्या हाय व्होल्टेज लढाईकडे सर्वांचंच लक्ष आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडतंय. राज्यातील अकरा मतदारसंघात मतदान सुरु असून यापैकी बारामती लोकसभा मतदारसंघामधल्या हाय व्होल्टेज लढाईकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. बारामतीत पवार वि. पवार अशी लढत आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार आमने सामने आहेत. तिसऱ्या टप्प्यात मतदान सुरु असतानाच बारामतीत नाट्यमय घडामोड पाहायला मिळाली. मतदान सुरु असतानाच सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी पोहोचल्या.
सुप्रिया सुळे बराच वेळ अजित पवारांच्या घरी होत्या. त्यानंतर त्या निघून गेल्या. कारण बारामती लोकसभा मतदारसंघातल्या नणंद भावजयीच्या लढाईकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. आई प्रतिभा पवार, लेक रेवती सुळे यांच्यासोबत मतदान केल्यानंतर सुप्रिया सुळेंनी थेट अजित पवारांचं घर गाठलं. मात्र या भेटीनंतर राजकीय चर्चांनाही उधाण आलं. आता या भेटीमागचं कारण सुप्रिया सुळेंनीच सांगितलं.अजित पवारांच्या आई म्हणजे आशाकाकींना नमस्कार करायाला आणि त्यांचा आशिर्वाद घ्यायला आपण आलो होतो, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलंय.
पवार कुटुंबातले राजकीय वाद वेगळे आणि कौंटुबिक संबंध वेगळे असणार हेच सुप्रिया सुळेंच्या भेटीतून स्पष्ट होतंय. मात्र या भेटीनंतर बारामतीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळण्याची शक्यता आहे.बारामतीमध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा धक्कादायक आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आलाय. इंदापूर आणि बारामतीमध्ये पैसे वाटल्याचा आरोप रोहित पवारांनी विरोधकांवर केलाय. पैशांच्या वाहतुकीसाठी पोलीस यंत्रणेचा वापर केल्याचाही आरोप रोहित पवारांनी केलाय.
Baramati Loksabha Constituency Supriya Sule Vs Sunetra Pawar Supriya Sule Visit Ajit Pawar House Supriya Sule Meet Ashakaki Pawar Pawar Vs Pawar Supirya Sule In Ajit Pawar House Voting Day Loksabha 3Rd Phase Voting
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीतून माघार घेऊनही नाशिकमध्ये भुजबळांची नवी खेळी? पाहा का उडालीय खळबळ...Loksabha Election 2024 Nashik : दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु असतानाच नाशिकमधून आली राजच्याच्या राजकारणाती मोठी बातमी. छगन भुजबळ यांची खेळी की आणखी काय?
और पढो »
Lok Sabha Nivadnuk 2024 LIVE: आजपासून देशात लोकशाहीचा उत्सव महाराष्ट्रातील या मतदारसंघांत पहिल्या टप्प्यातील मतदानLok Sabha Elections Voting Live Updates: देशातील लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आजपासून. 21 राज्यातील 102 जागांसाठी मतदान.
और पढो »
'लोकसभा निवडणुकीत बटण कचा-कचा दाबा आणि पाहिजे तेवढा निधी घ्या' अजित पवारांच्या वक्तव्यानं नवा वादLoksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान काही दिवसांवर येऊन ठेपलं, सर्वच पक्षांच्या प्रचाराला वेग आला असतानाच महायुतीतले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
और पढो »
ठाण्यातील शिंदेंचा कार्यकर्ता त्यांच्या पुत्रापेक्षाही श्रीमंत! ठाण्यात 4 घरं, 25 लाखांचं सोनं अन्.. एकूण संपत्ती..Loksabha Election 2024 Mhaske Property Details: महायुतीच्या जागावाटपामधील सर्वात मोठा चर्चेचा मुद्दा ठरत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे मतदारसंघाच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे.
और पढो »
LPG Price Cut : सिलेंडर 'इतक्या' रुपयांनी स्वस्त; महिन्याच्या पहिल्याच दिवशी सरकारचा दिलासादायक निर्णयLPG Price Cut : देशात लोकसभा निवडणूक सुरु असताना आता केंद्र शासनाच्या वतीनं मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. काय आहेत सिलेंडरचे नवे दर?
और पढो »
'कचा-कच बटण दाबा' वक्तव्याबद्दल विचारलं असता अजित पवार हात जोडत म्हणाले, 'आमच्या ग्रामीण..'Ajit Pawar React On Controversial Comment: इंदापूरमधील एका कार्यक्रमामध्ये अजित पवारांनी कचा-कच बटण दाबा असं म्हणत मतदारांना अमिष दाखवल्याचा आरोप केला जात असतानाच यावर खुद्द अजित पवारांनीच प्रतिक्रिया नोंदवली आहे.
और पढो »