मराठी-हिंदी भाषिक वाद: मुंब्र्यात मराठी तरुणालाच माफी मागायला लावली

महाराष्ट्र समाचार

मराठी-हिंदी भाषिक वाद: मुंब्र्यात मराठी तरुणालाच माफी मागायला लावली
मराठीहिंदीवादा
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 47 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 53%
  • Publisher: 63%

मुंब्र्यात मराठी आणि हिंदी भाषिक वाद चव्हाट्यावर आला आहे. मराठी का येत नाही विचारणाऱ्या तरुणालाच माफी मागायला लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मुंब्र्यात मराठी - हिंदी भाषिक वाद चव्हाट्यावर आला आहे. मराठी का येत नाही विचारणाऱ्या तरुणालाच माफी मागायला लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंब्र्यात फळविक्रेत्याला मराठी का येत नाही? असं एका मराठी तरुणानं विचारलं आणि त्यावरून वाद निर्माण झाला. त्यानंतर मराठी भाषिक तरुणावरच मुंब्रा पोलिस ांनी गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हिंदी येतं तर हिंदी त बोल, असं म्हणत तिथल्या जमावानं तरुणाला पोलीस स्टेशनमध्ये नेलं.

व्हिडीओत तरुणाला सर्वांनी घेराव घातलेला दिसत आहे. यावेळी पांढरा शर्ट घातलेला एक व्यक्ती मध्यस्थी करत काय झालं असं विचारतो. यावेळी तरुण मराठीत सांगू लागताच तो त्याला हिंदीत बोलायला सांगतो. तुला जर हिंदी समजतं तर तुला समजलं ना तो काय बोलतोय ते? अशी उलट विचारणा तो करतो. महाराष्ट्रात राहून त्याला 10 वर्षं झाली तरी मराठी येत नाही असं तरुण सांगत असताना, तो त्याल महाराष्ट्रात असो नाहीतर कुठेही असो येत नसेल मराठी तर काय करणार? अशी उलट विचारणा केली जाते. तसंच 100 नंबरला फोन करुन जमा करा असंही म्हटलं जातं. यादरम्यान तरुणाला शिवीगाळ आणि धमक्याही दिल्या जात असल्याचं व्हिडीओत ऐकू येत आहे. तरुण मराठीत माफी मागू लागताच सर्वजण त्याला अडवतात. आम्हाला मराठी येत नाही, हिंदीत बोल, असं यावेळी मागे उभे तरुण ओरडत असल्याचं ऐकू येत आहे. यावेळी पांढरा शर्ट घातलेला व्यक्ती सर्वांना त्याची माफी व्हिडीओत रेकॉर्ड व्हावी यासाठी शांत राहण्याचं आवाहन करताना दिसत आहे. तसंच तरुण आरडाओरड सुरु असताना कसं बोलू असं हतबलपणे सांगताना दिसत आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

मराठी हिंदी वादा मुंब्रा पोलिस गुन्हा भाषिक महाराष्ट्र गुन्हा दाखल

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

मराठीद्वेष्ट्या शुक्लाला धडा! मागील 24 तासात नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर घटनाक्रममराठीद्वेष्ट्या शुक्लाला धडा! मागील 24 तासात नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर घटनाक्रमकल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण केल्याप्रकरणी आता शुक्ला पती पत्नीची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
और पढो »

'महाराष्ट्र खरंच कमजोर झालाय! पेढे वाटा पेढे'; कल्याण मारहाणप्रकरणी 'सामना'तून सरकारवर टीकेची झोड'महाराष्ट्र खरंच कमजोर झालाय! पेढे वाटा पेढे'; कल्याण मारहाणप्रकरणी 'सामना'तून सरकारवर टीकेची झोडKalyan attack marathi family : कल्याणमधील एका प्रतिष्ठित वस्तीमध्ये मराठी माणसाला अखिलेश शुक्ला नामक व्यक्तीकरून करण्यात आलेल्या मारहाणीचा तीव्र शब्दांत निषेध.
और पढो »

चुकीला माफी नाहीच! कल्याण मराठी माणूस मारहाण प्रकरणी अखिलेश शुक्लावर मोठी कारवाईचुकीला माफी नाहीच! कल्याण मराठी माणूस मारहाण प्रकरणी अखिलेश शुक्लावर मोठी कारवाईकल्याणच्या योगीधाम परिसरात अजमेरा हाइट्स सोसायटीमध्ये मराठी कुटुंबावर हल्ला झाला. या प्रकरणात आरोपी अखिलेश शुक्लावर मोठी कारवाई करण्यात आली आहे.
और पढो »

कल्याण मारहाण प्रकरण: मुख्य आरोपी अखिलेश शुक्ला पोलिसांच्या ताब्यातकल्याण मारहाण प्रकरण: मुख्य आरोपी अखिलेश शुक्ला पोलिसांच्या ताब्यातAkhilesh Shukla Detained: कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या आरोपी अखिलेश शुक्लाला (Akhilesh Shukla) ताब्यात घेण्यात आलं आहे.
और पढो »

शरद पवार ने पीएम मोदी को मराठी साहित्य सम्मेलन में आमंत्रित कियाशरद पवार ने पीएम मोदी को मराठी साहित्य सम्मेलन में आमंत्रित कियाशरद पवार ने पीएम मोदी से मुलाकात की और उन्हें अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन में आने का निमंत्रण दिया। उन्होंने बताया कि यह राजनीति से सम्बंधित नहीं है।
और पढो »

Devendra Fadnavis: टिपिकल नेता नहीं हैं देवेंद्र फडणवीस, मॉडलिंग में भी आजमा चुके हैं हाथDevendra Fadnavis: टिपिकल नेता नहीं हैं देवेंद्र फडणवीस, मॉडलिंग में भी आजमा चुके हैं हाथMaharashtra New CM Devendra Fadnavis: मराठी ब्राह्मण परिवार में जन्‍मे देवेंद्र फडणवीस को विरासत में ही सियासत मिली है.
और पढो »



Render Time: 2025-02-13 19:14:56