मला घेरण्याचा प्रय़त्न केला जातोय, मी एकटा पडलोय; मनोज जरांगे पाटील असं का म्हणाले?

Manoj Jarange Patil समाचार

मला घेरण्याचा प्रय़त्न केला जातोय, मी एकटा पडलोय; मनोज जरांगे पाटील असं का म्हणाले?
Manoj Jarange Patil OfficialManoj Jarange Patil LiveManoj Jarange Patil Latest News
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 80 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 59%
  • Publisher: 63%

Manoj Jarange Patil: मला आणि माझ्या समाजाला घेरण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. आम्ही जी सत्य मागणी केली ती अनेकांना रुचलेली नाहीये. मी एकटा पडलोय, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.

मला आणि माझ्या समाजाला घेरण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. आम्ही जी सत्य मागणी केली ती अनेकांना रुचलेली नाहीये. मी एकटा पडलोय, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. आज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी ओबीसी नेत्यांबरोबरच मराठा नेत्यांवरही निशाणा साधला आहे. मराठ्यांचे नेते मतांचा विचार करतात आरक्षणाचा नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.

'आम्ही सत्य बोलतो, कायद्याने मराठ्यांना आरक्षण दिलं आहे. सरकारी नोंदी आहेत. मराठा हा कुणबी असल्याचा उल्लेख आहे.मी नेमकं महत्त्वाच्या विषयावर बोट ठेवल्याने सगळ्यांना पोटदुखी होऊ लागले. हा मुलगा जो पर्यंत या लढ्यात आहे तोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळून देणार आहे. सत्यता बाहेर आली आहे. मराठ्यांच्या जीवावर निवडून येणारे ओबीसी नेते आता मराठा समाजासमोर उघडे पडले आहेत,' असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

'महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आणि मराठे नेत्यांना सांगतो सगळ्या पक्षातीले ओबीसी नेते मराठा समाजाला आरक्षण मिळू नये ते एकटवले आहेत. ते मतांचा विचार नाही तर आरक्षणाचा विचार करायला लागले आहेत. त्याउलट मराठ्यांचे नेते आरक्षणाचा नाही तर मतांचा विचार करत आहेत. हा फरक आहे त्यांच्यात आणि मराठ्यांच्या नेत्यांमध्ये. आरक्षण विषय इतका मोठा आहे त्यांच्यासाठी की मतं आणि निवडून येणे महत्त्वाचं नाहीये त्यांच्यासाठी,' असंही त्यांनी म्हटलं आहे.'भाजपामधले ओबीसींची सर्व नेते आमदार , मंत्री एकत्र झाले.

'आणखी एक सांगतो मराठा समाज आणि मराठ्यांच्या नेत्याला सांगतो मी एकटा पडलोय. मी आरक्षणाच्या बाजूने राहू नये म्हणून सगळ्यांनी मला घेरलं आहे. मी एकटा पडलोय. मग सत्ताधाऱ्यांचे मराठ्यांचे मंत्री तेही कोणी बोलत नाही असो किंवा विरोधी पक्षातील नेतेही बोलत नाही. मराठा समाजाला माझी विनंती आहे तुम्ही एकजूट राहा,' असं अवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे.

'मराठ्यांच्या नेत्याने ताकदीने उभं राहा. 6 जुलै ते 13 जुलैपर्यंत जे मराठा आरक्षण रॅली ठेवली आहे. त्याला सर्वांनी उपस्थित राहा. 6 जुलैला एकही मराठा घरी राहणार नाही सगळे जणांनी आपल्या परिसरात जिथे कुठे जनजागृती शांतता मराठा आरक्षण रॅली असेल तिथे उपस्थित राहा,' असं अवाहन जरांगे यांनी केलं आहे.महाराष्ट्र

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Manoj Jarange Patil Official Manoj Jarange Patil Live Manoj Jarange Patil Latest News Manoj Jarange Patil Movie मनोज जरांगे पाटील चित्रपट मनोज जरांगे पाटील आरक्षण Manoj Jarange Patil Marathi News

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'सगळं आरक्षण रद्द करा, फक्त..', जरांगेंची मागणी; म्हणाले, '..तर विधानसभेला गुलाल रुसेल''सगळं आरक्षण रद्द करा, फक्त..', जरांगेंची मागणी; म्हणाले, '..तर विधानसभेला गुलाल रुसेल'Manoj Jarange Patil Warning Over Maratha Aarakshan: मनोज जरांगे-पाटील यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत हल्लाबोल केला आहे.
और पढो »

'OBC नेते मराठ्यांविरोधात विष ओकतायेत', जरांगेंचा हल्लाबोल; म्हणाले, 'भुजबळांनी आयुष्यभर..''OBC नेते मराठ्यांविरोधात विष ओकतायेत', जरांगेंचा हल्लाबोल; म्हणाले, 'भुजबळांनी आयुष्यभर..'Manoj Jarange Patil On OBC Leaders: मनोज जरांगे-पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ओबीसी नेते मराठ्यांविरोधात विष ओकत असल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला आहे.
और पढो »

मृत्यूच्या बातम्यांसंदर्भात बोलताना जरांगेंचा खळबळजनक आरोप; म्हणाले, 'सरकार आणि..'मृत्यूच्या बातम्यांसंदर्भात बोलताना जरांगेंचा खळबळजनक आरोप; म्हणाले, 'सरकार आणि..'Maratha Aarakshan Manoj Jarange Patil On Death News: मराठ्यांचं वाटोळं झालं पाहिजे असं सरकारला वाटत असल्याचंही मनोज जरांगे-पाटलांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे.
और पढो »

'...तर विधानसभेत 288 उमेदवार देणार'; मराठा आरक्षण, सगेसोयऱ्यांच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा'...तर विधानसभेत 288 उमेदवार देणार'; मराठा आरक्षण, सगेसोयऱ्यांच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशाराMaratha aarakshan : लोकसभा निवडणूक संपल्यानंतर आता राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा जोर धरतोय. पोलिसांची परवानगी नसतानाही मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत.
और पढो »

'माझ्यावर कलम 370 नुसार गुन्हा दाखल केला पाहिजे'; पंकजा मुंडे स्वत:च असं का म्हणाल्या?'माझ्यावर कलम 370 नुसार गुन्हा दाखल केला पाहिजे'; पंकजा मुंडे स्वत:च असं का म्हणाल्या?लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा पराभव झाल्यानंतर त्यांचे समर्थक नैराश्यातून आत्महत्या करत आहेत. यामुळे पंकजा मुंडे यांनी आपल्याला अपराधी वाटत असल्याची उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे.
और पढो »

Maharashtra: मराठा आंदोलन से माहौल बिगड़ने का खतरा, नहीं मिली इजाजत; मनोज जरांगे अड़ेMaharashtra: मराठा आंदोलन से माहौल बिगड़ने का खतरा, नहीं मिली इजाजत; मनोज जरांगे अड़ेमराठा आरक्षण का मुद्दा गरमाने वाले मनोज जरांगे पाटिल को पुलिस ने जालना जिले के अंतरवाली सराटी गांव में आंदोलन करने की अनुमति देने से इनकार कर दिया है।
और पढो »



Render Time: 2025-02-15 18:24:10