Monsoon In Maharashtra: मान्सून काहीच दिवसांत गायब झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आता हवामान विभागाने माहिती दिली आहे.
मान्सून वेळेआधी भारतात दाखल झाला असला तरी महाराष्ट्रात अद्यापही समाधानकारक पाऊस बरसलेला नाहीये. पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातील काही भागांत जोरदार कोसळेला पावसाने मात्र आता ओढ दिली आहे. पावसाने दडी मारल्यामुळं अनेक शेतकरी निराश झाले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. मात्र पाऊस न झाल्याने त्यांच्यावर संकट ओढावू शकते. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनसाठी आणखी एक आठवडा वाट पाहावी लागणार आहे.
पावसाने देशभरासह महाराष्ट्रातही ब्रेक घेतला आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच चांगला पाऊस झाल्यामुळे राज्यात आतापर्यंत गेल्या वर्षीच्या तुलनेत चार पट अधिक पेरण्या झाल्या आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसानं ओढ दिली आहे. त्याचप्रमाणे पावसाचा असमतोल दिसून येत आहे. त्यातच आता हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार समाधानकारक पाऊस होण्यासाठी आणखी आठवडाभराचा कालावधी लागणार आहे.
बंगालचा उपसागर तसेच अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होत नसल्याने राज्यात मान्सूनचा वेग मंदावला आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता मान्सून सक्रिय होण्यासाठी आणखी किमान 8 दिवस वाट पाहावी लागू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस होण्याआधी पेरणीची घाई करू नये, अन्यथा दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते, असा सल्ला पुणे वेधशाळेनं दिला आहे.पुढील 24 तासात मुंबईसह उपनगरात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Monsoon Update In Marashtra Rain Alert In Maharashtra Rain Update In Maharashtra IMD Monsoon 2024 Predictions Maharashtra Weather Today Unseasonal Rain Heat Wave Weather Updates India Weather Updates Maharashtra Weather Updates Weather News Todays Weather Report Monsoon IMD Maharashtra Maharashtra Weather Forecast Mumbai Weather News Mumbai News News Weather Forecast Near Me
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
मान्सून महाराष्ट्रात पण संपूर्ण राज्य कधी व्यापणार, हवामान विभागाने दिली Good News!Monsoon Weather in Maharashtra: सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मान्सून महाराष्ट्रात दाखल झालाय. तर, मान्सून संपूर्ण राज्य कधी व्यापणार याबद्दल जाणून घेऊया.
और पढो »
Maharashtra Weather News : कोकणासह मध्य महाराष्ट्रात मान्सून सरींमुळं तापमानात दिलासादायक घट; मुंबई कधी सुखावणार?Maharashtra Weather News : मान्सून येणार म्हणता म्हणता मान्सून आता अखेर आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मान्सूननं हजेरी लावली असून, तापमानातही लक्षणीय घट पाहायला मिळत आहे.
और पढो »
Monsoon In Kerala : ठरल्या मुहूर्ताआधीच मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात कधी पोहोचणार?Monsoon In Kerala : प्रचंड उकाड्यापासून मिळणार दिलासा. कारण अखेर केरळमध्ये मान्सून दाखल. महाराष्ट्रात पोहोचण्यासाठीचा नवा मुहूर्त पाहून घ्या...
और पढो »
महाराष्ट्रात ठाकरे+ शरद पवारांनी भाकरी फिरवली, महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता?Maharashtra Nivadnuk Nikal 2024: महाराष्ट्रात काहीच वेळात लोकसभा निवडणुकांच्या निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. राज्यात भाजपला मोठा फटका बसू शकतो.
और पढो »
Maharashtra Weather News : राज्याच्या 'या' भागात वादळी पावसाचा अंदाज; कोकणात काय परिस्थिती?Maharashtra Weather News : महाराष्ट्रात दणकून उपस्थित झालेला मान्सून आता राज्याच्या बहुतांश भागांमध्ये हजेरी लावत असला तरीही काही भाग मात्र यास अपवाद ठरत आहेत.
और पढो »
Maharashtra Weather News : उष्णतेचा रेड अलर्ट! तापमानानं कुठं ओलांडली पन्नाशी? मान्सूनच्या आगमनाआधी नुसती होरपळMaharashtra Weather News : राज्यात उकाडा वाढताना, मान्सून आता नेमका कुठपर्यंत पोहोचलाय? जाणून घ्या हवामान विभागानं दिलेली माहिती.
और पढो »