Chhagan Bhujbal : छगन भुजबळांबाबत एका पुस्तकात खळबळजनक दावा करण्यात आलाय.. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडालीय.. ईडीपासून सुटका मिळवण्यासाठी भाजपसोबत गेल्याचं भुजबळांनी म्हटलंय.. 2024 द इलेक्शन दॅट सरप्राइज्झ इंडिया या इंग्रजी पुस्तकात भुजबळांनी हा दावा केल्याचा उल्लेख आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु असताना ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई ंचं ' 2024 द इलेक्शन दॅट सरप्राइज्झ इंडिया ' या पुस्तकामुळं वाद निर्माण झालाय. या पुस्तकात भुजबळ ईडीचा ससेमिरा चुकवण्यासाठी भाजपसोबत कसे गेले यावर भाष्य करण्यात आलंय.
'अजित पवार यांच्य नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपसोबत महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्याचा आनंद पक्षाच्या सर्वच नेत्यांना झाला होता. कारण अर्थातच ईडीपासून सुटका... ती झाल्यानं सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.. माझ्यासाठी तर ईडीपासून सुटका म्हणजे एक प्रकारे पुनर्जन्मच होता.. दोन-अडीच वर्षे तुरुंगात काढल्यावर जामिनावर असताना मला ईडीची पुन्हा नोटीस आली. वयाच्या पंचाहत्तरीत किती वेळा चौकशांना सामोरे जायचे, असा प्रश्न, होता. अजूनही तुरुंगातील दिवस आठवले की माझी झोप उडते.
यावरून वाद झाल्यानंतर भुजबळांनी जे म्हटलंय तेच पुस्तकात लिहिण्यात आल्याचा दावा राजदीप सरदेसाई यांनी केलाय.. तर पुस्तकातील दावे खोटे असून कायदेशीर कारवाईचा इशारा भुजबळांनी दिलाय. राजदीप सरदेसाईंच्या पुस्तकात जे लिहिलंय ते अगदी बरोबर असल्याचा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलाय. पुस्तकातील सगळे दावे छगन भुजबळांनी खोडून काढलेत. सरदेसाईंच्या पुस्तकाचा अभ्यास सुरु असून वकिलांमार्फत कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचं भुजबळांनी सांगितलंय.
2024 The Election That Surprises India Chhagan Bhujbal Chhagan Bhujbal Went With BJP 2024 द इलेक्शन दॅट सरप्राइज्झ इंडिया राजदीप सरदेसाई छगन भुजबळ
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आणणार तिसरी आघाडी; परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार जाहीरThird Alliance In Maharashtra : महाराष्ट्राच्या राजकारणात परिवर्तन महाशक्ती आपली ताकद दाखवणार आहे. महायुती आणि महाविकासआघाडीला टक्कर देण्यासाठी तिसऱ्या आघाडीने आपले उमेदवार जाहीर केले आहेत.
और पढो »
महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी सर्वात मोठी अफवा! बड्या नेत्यांना करावा लागला खुलासाMaharashtra Politics: महाराष्ट्रद्रोहींसोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कधीही जाणार नाही....शाहा-फडणवीसांसोबत कोणतीही बैठक झाली नसल्याचं संजय राऊतांचं स्षष्टीकरण
और पढो »
'ईडीपासून सुटेकसाठी भुजबळ भाजपसोबत', पुस्तकातून खळबळजनक दाव्यानंतर भुजबळ म्हणाले, 'नको ते माझ्या तोंडी...'Chhagan Bhujbal ED BJP Mahayuti : विधानसभेची रणधुमाळी सुरु असताना छगन भुजबळांच्या एका बातमीने खळबळ माजली आहे. ईडीपासून सुटेकसाठी भुजबळ भाजपसोबत गेले असा दावा एका पुस्तकातून करण्यात आलाय. या दाव्यावर भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिलं.
और पढो »
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंची भूमिका ठरणार महत्त्वाची; पुण्यातील 'या' 5 मतदार संघात मनसे उमेदवार उभे करणार?Raj Thackeray : लोकसभा निवडणूक स्वबळावर राज ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिलाय. आगामी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची असणार आहे. पुण्यातील आठ पैकी पाच मतदारसंघात मनसे उमेदवार देण्याच्या तयारीत असल्यानं राज ठाकरे यांनी मिशन पुणे हाती घेतलंय.
और पढो »
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमुळे राजकारणात खळबळ; कोण काय म्हणाले?राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या झाली आहे. सर्व पक्षीय राजकीय नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. जाणून घेऊया कोणता नेता काय म्हणाला?
और पढो »
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा फोन टॅपिंगचा विषय; रश्मी शुक्लांवरून वार-प्रहारRashmi Shukla : राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांवर मविआच्या नेत्यांनी पुन्हा एकदा फोन टॅपिंगचे आरोप केलेत.. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यापाठोपाठ खासदार संजय राऊत यांनीही रश्मी खुक्लांवर आरोप केलेत.
और पढो »