Nepal Bus Accident: नेपाळमध्ये भारतीय प्रवाशांनी भरलेली बस नदीत कोसळली आहे. हे सर्व प्रवासी महाराष्ट्रातील होते. या दुर्घटनेत 14 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
Nepal Bus Accident: नेपाळमध्ये भारतीय प्रवाशांनी भरलेली बस नदीत कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 14 प्रवासी ठार झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नेपाळ पोलिसांनी दुजोरा दिला आहे की, 40 प्रवासी प्रवास करत असलेली बस तानाहून जिल्ह्यातील मार्स्यांगडी नदीत कोसळली आहे. हे सर्व प्रवासी महाराष्ट्रातील जळगावातील जिल्ह्यातील आहेत.
महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील भुसावळ गावातून 104 लोकांचा एक गट 10 दिवसांच्या दौऱ्यासाठी दोन दिवसांपूर्वी नेपाळमध्ये आला होता. हा गट तीन बसमधून प्रवास करत होता. त्यांनी पहिले दोन दिवस पोखराला भेट दिली. शुक्रवारी काठमांडूसाठी रवाना झालेल्या या तीन बसपैकी एक बस मार्स्यांगडी नदीत दुर्घटनाग्रस्त झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसमध्ये बहुसंख्य प्रवासी हे कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक होते.
“The bus entered Nepal from Belahiya check-point in Rupandehi on 20th August with 8-day permit,” says Rupandehi District Police Office Spokesperson, DSP Manohar Bhatta on bus accident in Tanahun district.“UP FT 7623 क्रमांकाची बस नदीत कोसळली आहे. बस सध्या नदीच्या काठावर पडलेली आहे,” अशी माहिती जिल्हा पोलिस कार्यालय तानाहुनचे डीएसपी दीपकुमार राया यांनी दिली आहे. ही बस पोखराहून काठमांडूकडे जात होती असा अंदाज आहे. मात्र अधिक तपशील देण्यात आलेला नाही.
दरम्यान काठमांडू स्थित भारतीय दुतावासाने नेपाळमध्ये भारतीय पर्यटकांच्या बसला झालेल्या अपघाताबाबत माहिती मिळवण्यासाठी हेल्पलाइन नंबर जारी केला आहे. दूतावासाच्या अधिकृत एक्स अकाउंटवर हा नंबर जारी करण्यात आला आहे. यासंदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती मिळवण्यासाठी जारी केलेला हेल्पलाइन नंबर आहे 9779851107021 असा आहे.मनोरंजन
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
महाराष्ट्रात आहे देशातील सर्वात श्रीमंत गाव! इथं राहणाारा प्रत्येकजण करोडपतीजाणून घेऊया महाराष्ट्रातील श्रीमंत गावाविषयी...
और पढो »
प्रचंड वेगाने वाहणाऱ्या नदीवर झुलता पुल; धबधब्यापर्यंत जाणारा महाराष्ट्रातील सर्वात थरारक मार्गमहाराष्ट्रातील या धबधब्यावर पोचण्यासाठी नदीवर बांधण्यात आलेला झुलता पुल पार करावा लागतो.
और पढो »
12 ठिकाणचे पाणी एकत्र होऊन कोसळणारा महाराष्ट्रातील अजस्त्र धबधबा! पाण्याचा प्रवाह पाहून धडकी भरतेमहाराष्ट्रातील हा अनोखा धबधबा पाहण्यासाठी संपूर्ण भारतातून पर्यटक येथे येतात.
और पढो »
Breaking News LIVE Updates: ममता बॅनर्जी नीती आयोगाच्या बैठकीतून बाहेर पडल्याBreaking News LIVE Updates: महाराष्ट्रातील आजच्या ताज्या घडामोडींबरोबर देश विदेशातील ठळक घडामोडींचा आढावा
और पढो »
महाराष्ट्रात आणखी 4-5 दिवस कोसळधारा; 'या' जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशाराMaharashtra Weather Alert: महाराष्ट्रातील घाट माथ्यावर पावसाचा जोर कायम आहे. आज हवामान विभागाने कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट दिला आहे, जाणून घेऊया.
और पढो »
Breaking News LIVE Updates: साताऱ्यात रेड अलर्ट! कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढणारMaharashtra Breaking News LIVE: महाराष्ट्रातील आजच्या प्रमुख घडामोडींबरोबरच पावसाचे सर्व अपडेट्स आणि दिवसभरातील महत्त्वाच्या घटनांचा धावता आढावा या ब्लॉगच्या माध्यमातून...
और पढो »