Maharashtra Weather Update: राज्यात मोसमी पावसाच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. त्यामुळं उकाड्यात वाढ झाली आहे.
महाराष्ट्रातून पावसाचा परतीचा प्रवास सुरू, पण 'या' जिल्ह्यांत मात्र पावसाचा इशारा, कसं असेल राज्याचं हवामान?
राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. तर एकीकडे उन्हाच्या झळा वाढण्यास सुरुवात झाली आहे. ऑक्टोबर हीटमुळं मुंबईकर त्रस्त झाले आहेत. मुंबईकरांची येत्या काळात उकाड्यापासून सुटका होणे दूरच याउलट उकाड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईत पुढील तीन – चार दिवस कमाल तापमान ३३ ते ३६ अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याची शक्यता आहे.
मागील आठवड्यात पावसाने मुंबई व राज्यभरात धुमाकुळ घातला होता. मात्र त्यानंतर पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळं गेल्या काही दिवसांपासून राज्यात उकाडा वाढला आहे. वाढत्या आद्रतेमुळं उकाड्यात आणखी वाढ होत आहे. पुढील चार ते पाच दिवस मुंबईचे तापमान 33 ते 36 अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पुढील दोन ते तीन दिवस पावसाच्या हलकी सरी बरसू शकतात, अशी शक्यताही प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे.
मुंबईबरोबरच राज्यातील इतर काही भागातही पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. रविवारी संपूर्ण कोकण किनारपट्टी, उत्तर महाराष्ट्र मध्य आणि दक्षिण महाराष्ट्रात तुरळ ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा दिला आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागातून शनिवारी मोसमी वाऱ्यांच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. पावसाची उघडीप असलेल्या ठिकाणी उकाड्यात वाढ झाली आहे. ऑक्टोबर हीटचा तडाखा जाणवायला लागला आहे.
राजस्थानमधून सरासरीपेक्षा सात दिवस उशिराने परतीचा प्रवास सुरू करणाऱ्या मोसमी पावसाने महाराष्ट्रातून मात्र नियोजित वेळेत परतीचा प्रवास सुरू केला आहे. शनिवारी नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागातून मोसमी पाऊस माघारी फिरला आहे. हवामान पोषक राहिल्यास नियोजित वेळेत म्हणजे १० ऑक्टोबरपर्यंत मोसमी वारे राज्यातून माघारी परतण्याचा अंदाज आहे. पोषक हवामान राहिल्यास १० ऑक्टोबरपर्यंत माघारीचा प्रवास पूर्ण होण्याचा अंदाज आहे.
Maharashtra News Today Weather Today At My Location परतीच्या पावसाला सुरुवात Weather Update Monsoon IMD Mumbai Rains Rain Maharashtra Maharashtra Weather Forecast Mumbai Weather News Mumbai News News महाराष्ट्र हवामान महाराष्ट्रातील आजचे हवामान महाराष्ट्र हवामान विभाग Summer Al Nino La Nina Arabian Sea अरबी समुद्र
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Maharashtra Rain: उद्या राज्यात कशी असेल पावसाची स्थिती? आजच जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाजMaharashtra Weather: राज्यात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता.
और पढो »
महाराष्ट्रात पाऊस किंवा सूर्यकिरण? जाणून घ्या हवामान स्थितीउत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर असला तरी राज्याच्या उर्वरित भागात पावसाचा जोर ओसरवेल. शनिवारपासून पावसाचा जोर ओसरणार असल्याचं म्हटलं जात आहे.
और पढो »
Maharashtra Weather News : पाऊस पाठ सोडेना, उकाडा कमी होईना; राज्यातील हवामानात का होतायत झपाट्यानं बदल?Maharashtra Weather News : पावसाचा मुक्काम आणखी किती दिवस? जाणून घ्या हवामान विभागाचं यावर काय म्हणणं...
और पढो »
बाप्पाचे आगमन होताच पाऊसदेखील सक्रीय; आज राज्यातील 'या' जिल्ह्याना अलर्ट, मुसळधार पावसाचा इशाराMaharashtra Rain Update: राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रीय झाला असून काही जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.
और पढो »
Maharashtra Weather News : गौराईच्या आगमनासाठी पावसाची हजेरी; पाहा कोकणापासून विदर्भापर्यंतचा हवामानाचा अंदाजMaharashtra Weather News : राज्यातील हवामानाचा एकंदर अंदाज पाहता सध्याच्या घडीला विदर्भामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
और पढो »
जोरदार पावसामुळे मुंबईची दैना! रेल्वे सेवा विस्कळीत तर रस्त्यांवर साचलं पाणीMumbai Rains: राज्यात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. पुणे आणि रायगड जिल्ह्याला आज हवामान विभागाने पावसाचा रेड अलर्ट जारी केला होता तर नाशिक, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर केला होता. मुंबईला जोरदार पावसाने झोडपले आहे.
और पढो »