Pune Nashik Highway Manchar Accident: अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहितेंच्या पुतण्याने बेदरकारपणे कार चालवत दुचाकीस्वाराला चिरडले. यात एकाचा मृत्यू झाला आहे.
पुणे-नाशिक महामार्गावर शनिवारी रात्री घडलेल्या भीषण अपघातात अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी पार्टीच्या आमदाराचा पुतण्याचे नाव समोर येत आहे. खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटलांच्या पुतण्या मयुर मोहितेच्या फॉर्च्युनर काराने दुचाकीस्वार तरुणाला चिरडले असल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर आता आमदारांनीच या अपघाताबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
पुणे-नाशिक महामार्गावर शनिवारी हा अपघात घडला होता. एका भरधाव वेगातील कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात 19 वर्षीय दुचाकीस्वाराला जागीच मृत्यू झाला होता. प्राथमिक माहितीनुसार, मयुर मोहिते हा कार विरुद्ध दिशेने चालवत होता. त्याचवेळी त्याच्या कारने दुचाकीला धडत दिल्याने दुचाकीस्वार काही फूट अंतरावर फेकला गेला. धक्कादायक म्हणजे, अपघातानंतर जखमी व्यक्तीला मदत करण्याऐवजी मयुर मोहिते कारमध्येच बसून असल्याचे कॅमेऱ्यात कैद झालं आहे.
शनिवारी रात्री जो अपघात झाला. अपघातानंतर जेव्हा मला फोन आला तेव्हा मी स्वतःहून माझ्या पुतण्याला पोलिस स्टेशनला हजर राहायला सांगितलं. पोलिसांनी त्याला अटक केलेली नाही. या सगळ्याची चौकशी पोलिस करत आहेत. जोपर्यंत यात दोषी कोण याचा तपास होत नाही तोपर्यंत यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही. माझा सख्खा पुतण्या जरी असला आणि त्याने चुक केली असली तर जे काही कायद्याचे भाषेत होईल ते झालं तरी मी त्यामध्ये कोणताही प्रकारचा हस्तक्षेप करणार नाही, असं आमदार मोहिते पाटील यांनी म्हटलं आहे.
माझ्या पुतण्याने स्वतः त्याला उचलून रुग्णवाहिकेत ठेवलं आहे. मी त्या ठिकाणी नव्हतो. मी पोलिसांकडून माहिती घेतो. पण माझा पोलिसांच्या तपासात कोणताही हस्तक्षेप नाहीये. जोपर्यंत याचा तपास लागत नाही तोपर्यंत पोलिसही काही सांगू शकत नाही. मयत आणि माझा पुतण्या दोघांची मेडिकल झाली आहे. त्या दोघांचेही मेडिकल रिपोर्ट यायचे आहेत. ते आल्यानंतरच पोलिस सांगू शकतील, असं दिलीप मोहिते पाटील यांनी म्हटलं आहे.
Manchar Kalamb Accident Ajit Pawar Group Mla Dilip Mohite Nephew Killed Bike Rider Fortuner Car Dilip Mohite Patil Mayur Mohite Pune Accident
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'तुम्ही सिद्धू मुसेवालाचं...', BJP 350 पार Exit Polls वर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; मोदींचाही उल्लेखLok Sabha Election Exit Polls 2024 Rahul Gandhi First Comment: पंतप्रधान मोदींनी एक्झिट पोल आले त्या दिवशीच पहिली प्रतिक्रिया नोंदवली असली तरी राहुल गांधींनी दुसऱ्या दिवशी या आकडेवारीवर पहिली प्रतिक्रिया नोंदवताना मोदींचा उल्लेख केला.
और पढो »
Shikhar Bank Scam : अजित पवारांच्या अडचणीत भर? शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी क्लोजर रिपोर्टवर अण्णा हजारेंचा आक्षेपShikhar Bank Scam Case : शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. कारण क्लोजर रिपोर्टवर अण्णा हजारे यांनी आक्षेप घेतलाय.
और पढो »
Monsoon Updates : वरुण राजाचं आज महाराष्ट्रातील 'या' भागात आगमन?, विदर्भासह नागपुरात येलो अलर्टMaharashtra Monsoon News : मान्सूपूर्व पावसाने हजेरी लावली असली तरी महाराष्ट्रातील तळकोकणात आज मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आलाय.
और पढो »
'...तर कान धरुन मला काम सांगा', खासदार झाल्यानंतर प्रणिती शिंदेंनी हक्कानं दिली पहिली प्रतिक्रियाप्रणिती शिंदे यांना 6 लाख 20 हजार 225 इतकी मतं मिळाली. तर राम सातपुते यांना 5 लाख 46 हजार 028 इतकी मतं मिळाली.
और पढो »
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मंत्रीपद नाही, रोहित पवार म्हणतात 'त्यांच्याकडे आता एकच पर्याय'PM Modi Shapath Grahan LIVE : नरेंद्र मोदी यांच्यासह एनडीएतील मित्रपक्षांच्या मंत्र्यांचाही आज शपथविधी होणार आहे. यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एकही मंत्रीपद देण्यात आलेलं नाही. यावरुन शरद पवार गटाच्या रोहित पवार यांनी अजित पवार गटावर हल्लाबोल केलाय.
और पढो »
अजित पवारांच्या आमदाराचा ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा; 'त्या' रिकाम्या चौकटीने 'वेगळ्या निर्णयाची' चर्चाAjit Pawar MLA Support Thackeray Group Candidate: आज अजित पवार गटातील या आमदाराचा वाढदिवस असून त्यामिनित्त छापण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये शरद पवारांचाही फोटो दिसतोय.
और पढो »