Mumbai Local Train Update: गेल्या काही दिवसांपासून मुंबई लोकलचे वेळापत्रक बिघडले आहे. मात्र लवकरच आता ट्रेनचे वेळापत्रक पुन्हा पुर्ववत होणार आहे.
लोकल ही मुंबईकरांची लाइफलाइन आहे. नियोजीत लोकलला थोडासा वेळ जरी झाला तरी मुंबईकरांच्या संपूर्ण टाइमटेबल विस्कळीत होते. गेल्या काही दिवसांपासून लोकल उशीराने धावत आहेत. त्यामुळं त्याचा फटका सर्वसामान्यांना बसतो आहे. लोकल उशीरा असल्याने हाफ-डे किंवा लेट मार्क बसतो आहे. मात्र, या समस्येवर आता मध्य रेल्वेने उपाययोजना हाती घेतली आहे. मध्य रेल्वेवर अखेर 15 दिवसांनंतर ट्रेनची स्थिती सुधारणार आहे. दिल्लीहून रेल्वे बोर्डाकडून मध्य रेल्वे प्रशासनाला सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यास परवानगी दिली आहे.
2 जून रोजी रूट रिले इंटरलॉकिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर ट्रेनच्या वाहतुकीला फटका बसला होता. दादर ते सीएसएमटी मार्गावर लोकल उशीराने धावत होत्या. येथे लोकलचे थोडेसे अंतर कापण्यासाठीही 40-50 मिनिटे लागत होते. लोकलला लवकर सिग्नल मिळत नसल्याने ट्रेन उशीराने धावत होत्या. या नवीन प्रणालीमध्ये सुरक्षेवर अधिक भर देण्यात आला होता.
रेल्वे बोर्डकडून मंजूरी मिळाल्यानंतर सॉफ्टवेअरमध्ये काही गरजेचे बदल करण्यात आले आहेत. आता पहिल्याप्रमाणे ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम होणार नाही. या बदलानंतर ट्रेनच्या वेळापत्रकांवर परिणाम होणार नाही, याची अपेक्षा आहे, असं रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकार्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, ज्या नियमामुळं मुंबईतील लोकलचे वेळापत्रक बदलले होते. तो नियम सुरक्षिततेसाठीच लागू करण्यात आला होता. खासकरुन बालासोरसारखी घटना घडल्यानंतर असे नियम कठोर करण्यात आले होते. या नियम पॅन इंडियासाठी करण्यात आला होता. पण मुंबईसारख्या शहरात जिथे लोकलचे मोठे जाळे पसरले आहे तिथे या नियमांची अंमलबजावणी करणे कठिण जात होते. कारण, सीएसएमटी यार्डमध्येच सीएसएमटी यार्डमध्येच जवळपास १०० क्रॉसओव्हर पॉइंट आहेत.
Mumbai Local Trains Mumbai Local Train App Mumbai Local Train Time Table Mumbai Local Trai Crowd Mumbai Local Mumbai News मुंबई लोकल ट्रेन अपडेट मुंबई लोकल न्यूज मुंबई लोकल ट्रेन टायमिंग Mumbai Local Train Update In Marathi
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
ठाणे स्थानकात फलाट रुंदीकरणासाठी 63 तासांचा ब्लॉक, पण यानंतर प्रवाशांना काय फायदा होणार?Central Railway Megablock: मध्य रेल्वेने तीन दिवसांचा मेगाब्लॉक आयोजित केला आहे. याकाळात तब्बल 930 लोकल सेवा रद्द होणार आहे.
और पढो »
मध्य रेल्वेवर 15 दिवसांचा पॉवर ब्लॉक, प्रगती, इंटरसिटी गाड्या रद्द, वाचा वेळापत्रकMumbai Local Megablock: मध्य रेल्वेकडून मध्यरात्री ब्लॉक घेण्यात येणार आहे. 15 दिवसांच्या या ब्लॉकमध्ये अनेक गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.
और पढो »
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, कोस्टल रोडचा दुसरा टप्पा 10 जूनपर्यंत सेवेत, कसा असेल मार्ग?Coastal road: कोस्टल रोड प्रकल्प आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता कोस्टल रोडचा दुसरा टप्पादेखील सेवेत येणार आहे.
और पढो »
प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, पश्चिम रेल्वेवर दोन दिवस ब्लॉक, 'या' लोकल रद्दMumbai Local Train Update: पश्चिम रेल्वेवर डहाणू-वैतरणादरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळं काही गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.
और पढो »
शीना बोराचा सांगाडा गायब? आरोपी Indrani Mukerjea चा धक्कादायक खुलासा, म्हणते 'सीबीआयने मुद्दामहून...'Indrani Mukerjea allegations on CBI : सीबीआयने जी हाडे शीना बोराचे अवशेष (Sheena Bora murder case) असल्याचे घोषित केले होते, ती गायब हाडे आता गायब असल्याने इंद्रानी मुखर्जीने धक्कादायक खुलासा केला आहे.
और पढो »
मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर 63 तासांचा मेगाब्लॉक, 930 लोकल रद्द, वेळापत्रक वाचाCentral Railway Special Block: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सलग तीन दिवस मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. यावेळी प्रवाशांना गरज असेल तरंच घराबाहेर पडण्याची विनंती मध्य रेल्वेने केली आहे.
और पढो »