मुंबईसह ठाणे, रायगडला 'या' तारखेपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा; एकाच महिन्यात दुसऱ्यांदा अलर्ट

Heat Wave Alert In Maharashtra समाचार

मुंबईसह ठाणे, रायगडला 'या' तारखेपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा; एकाच महिन्यात दुसऱ्यांदा अलर्ट
Maharashtra NewsMaharashtra Heat WaveHeat Stroke At Maharashtra
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 49 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 54%
  • Publisher: 63%

Maharashtra Heat Wave: महाराष्ट्रातील नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. आता हवामान विभागाने पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.

महाराष्ट्रात सध्या उन-पावसाचे वातावरण पाहायला मिळतेय. तर, राज्याच्या काही भागात गेल्या दोन दिवसांपासून पावसाळी वातावरण पाहायला मिळतोय. विदर्भातील नागपुराततर अवकाळी पाऊसदेखील बरसला. मात्र, एकीकडे अवकाळी पावसाने शेतकरी चिंतेत असताना राज्यातील काही भागात मात्र उन्हाळ्याच्या झळा वाढत आहेत. हवामान विभागाने राज्याच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे. ठाणे, मुंबई, पालघर या भागातील नागरिकांनाही दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यातील काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. 27 एप्रिल ते 29 एप्रिलपर्यंत कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. या काळात नागरिकांनी काळजी घ्यावी, असं अवाहनही हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे. भारतीय हवामान विभागाच्या अधिकारी सुष्मा नायर यांनी बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे, रायगड आणि मुंबईतील काही ठिकाणी चक्रीवादळा सारखी स्थिती निर्माण झाल्यामुळं तापमानात वाढ होणार आहे. 27 आणि 28 एप्रिल रोजी तापमानात कमालीची वाढ होणार आहे. त्यामुळं नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे.दरम्यान, एप्रिल महिन्याच्या मध्यातच उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण झाले आहेत. या महिन्यात दुसऱ्यांदा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

उष्णतेच्या झळा वाढत असल्याने भारतीय प्रादेशिक हवामान विभागाने नागरिकांना दुपारी 12 ते 3 यावेळेत घराबाहेर न पडण्याचे अवाहन केले आहे. तसंत, भरपूर पाणी प्या आणि शरीर हायड्रेट ठेवा, भडक रंगाचे कपडे वापरू नका त्याऐवजी कॉटनचे ड्रेस वापरा. घराबाहेर निघताना टोपी किंवा स्कार्फ बांधा.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra News Maharashtra Heat Wave Heat Stroke At Maharashtra Maharashtra Heat Heat Wave Alert Maharashtra Heat Wave News उष्णतेच्या लाटेचा इशारा Mumbai Heat Wave Mumbai News Today

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Maharashtra Weather News : मतदानाच्या दिवशी राज्यातील 'या' जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा, 'इथं' वादळी पावसाचं सावटMaharashtra Weather News : मतदानाच्या दिवशी राज्यातील 'या' जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा, 'इथं' वादळी पावसाचं सावटMaharashtra Weather News : राज्यासह सध्या संपूर्ण देशात लोकशाहीच्या उत्सवाला सुरुवात झालेली असतानाच हवामानाचा आढावा घेऊन मतदारांनी आरोग्याची काळजी घेत मतदानासाठी जावं असं आवाहन करण्यात येत आहे.
और पढो »

Maharashtra Weather News : 'या' वेळेत घराबाहेर पडूच नका; कोकणासह मुंबईत उष्णतेच्या लाटेमुळं इशाराMaharashtra Weather News : 'या' वेळेत घराबाहेर पडूच नका; कोकणासह मुंबईत उष्णतेच्या लाटेमुळं इशाराMaharashtra Weather News : मुंबई, ठाणे, कोकणकरांना हवामान विभागाचा इशारा. तापमान 40 अंशांचा आकडा ओलांडणार... या इशाऱ्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.
और पढो »

ऊन, वारा, पाऊस... राज्यातील तापमान क्षणाक्षणाला बदलतय; मुसळधार पावसासह उष्णतेच्या लाटेचा इशाराऊन, वारा, पाऊस... राज्यातील तापमान क्षणाक्षणाला बदलतय; मुसळधार पावसासह उष्णतेच्या लाटेचा इशारामुंबईसह महाराष्ट्रात पारा चाळिशी गेला आहे. कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. कर, दुसरीकडे राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे.
और पढो »

पालकांसाठी महत्त्वाची बातमी, 'या' कारणासाठी बसचालकांचा आंदोलनाचा इशारापालकांसाठी महत्त्वाची बातमी, 'या' कारणासाठी बसचालकांचा आंदोलनाचा इशाराSchool Bus : पालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकाने शाळेबद्दल घेतलेल्या एका निर्णयाच्या विरोधात बसचालकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
और पढो »

Maharashtra Weather Update : कुठे उन्हाळा तर कुठे पाऊस, महाराष्ट्राच्या वातावरणात मोठा बदलMaharashtra Weather Update : कुठे उन्हाळा तर कुठे पाऊस, महाराष्ट्राच्या वातावरणात मोठा बदलराज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. भर एप्रिल महिन्यात एका बाजूला उष्णतेची लाट तर दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसाचा जोर पाहायला मिळत आहे.
और पढो »

घराबाहेर पडणं टाळा! विदर्भात वादळी पाऊस, कोकणात उष्णतेच्या तीव्र झळा; हवामान विभागाचा इशाराघराबाहेर पडणं टाळा! विदर्भात वादळी पाऊस, कोकणात उष्णतेच्या तीव्र झळा; हवामान विभागाचा इशाराMaharashtra Weather News : राज्याच्या हवामानात होणारे बदल सातत्यानं चिंता वाढवत असून, विदर्भ आणि मराठवाडा भागापुढं काहीशी संकटं वाढताना दिसत आहेत.
और पढो »



Render Time: 2025-02-13 12:03:07