Mumbai Local Train Update: मुंबईकरांचा प्रवासाचा वेळ आता वाचणार आहे. हार्बर मार्गावरील लोकलचा वेळ वाचणार आहे.
पावसाळा म्हटलं की लोकलला होणारा विलंब नेहमीचा आहे. लोकलला होणाऱ्या विलंबामुळं अनेकांना घरी पोहोचणे कठिण जाते. तसंच, ऑफिसमध्येही लेटमार्क लागतो. मात्र, या वर मध्य रेल्वेने तोडगा काढला आहे. हार्बर रेल्वेचा आता लोकलचा वेग 80kmph ते 95 kmph पर्यंत वेग वाढवण्यात येणार आहे. टिळकनगर ते पनवेलदरम्यान आता लोकल रखडणार नाहीये. या मंगळवारपासून हा बदल करण्यात आला आहे. तसंच, या बदलामुळं प्रवाशांची पाच मिनिटे वाचणार आहेत. 3 जून रोजी यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली होती.
मध्य रेल्वेकडून सीएसएमटी ते पनवेलदरम्यान 188 सेवा आणि सीएसएमटी ते बेलापूर दरम्यान 79 सेवा चालवण्यात येतात. सीएसएमटी ते पनवेल दरम्यान 80 मिनिटांचा वेळ लागतो. तर, सीएसएमटी ते बेलापूर दरम्यान 65 मिनिटांचा वेळ लागतो. त्यामुळं लोकलचा स्पीड 105Kmphपर्यंत वाढवावा अशी मागणी होती. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून सुरक्षिततेच्या कारणास्तव 95 Kmphपर्यंत वेग वाढवण्यासाठी मंजुरी देण्यात आली. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्निल निला यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही हा बदल या मंगळवारपासून लागू केला आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, लोकलचा वेग ताशी 105 केल्याने दोन ट्रेनमधील अंतर ठेवणे कठिण गेले असते. त्यामुळं लोकलचा वेग ताशी 95 करावा, असे ठरवण्यात आले. रेल्वेचा वेग वाढवण्याबरोबरच मध्य रेल्वेकडून रेल्वे रुळांबाबतची परीक्षण केले जाणार आहे. जेणेकरुन लोकलमध्ये अडथळा येणार नाही.सीएसएमटी ते टिळकनगर या स्थानकांदरम्यान लोकलचे अंतर वाढवण्यात येणार नाहीये. कारण रेल्वे स्थानकांतील अंतर कमी आहे. त्यामुळं यादरम्यान अंतर वाढवण्यात आलेले नाहीये.
कुर्ला ते मानखुर्द दरम्यानच्या प्रवासाचा वेग वाढवावा, अशी मागणी अनेक प्रवाशांनी केली होती. सध्या हार्बर मार्गावरील गाड्यांना कुर्ला आणि सीएसएमटी दरम्यान प्रवासासाठी 33 मिनिटे लागतात. मात्र, दोन्ही मार्गावरुन समान अंतर असूनही मेन लाइनवरुन कुर्ल्यापर्यंत जाण्यास 30 मिनिटे लागतात, असं नागरिकांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर, मध्य रेल्वेने पनवेलला जाण्यासाठी अधिक गाड्या चालवण्याची गरज आहे, असी मागणीही प्रवाशांकडून केली जात आहे.Video : 'आधी अयोध्येत गळती, आता पुरातन बाणगंगेची तोडफोड...
Mumbai Local Train Update Mumbai Local News Update मुंबई लोकल ट्रेन अपडेट मुंबई लोकल मध्य रेल्वे Harbour Line Harbour Line Update Mumbai News Today
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
पावसाळ्यातही मुंबईकरांचा प्रवास सुस्साट होणार? लोकल सेवा ठप्प होऊ नये म्हणून रेल्वे सज्जMumbai Local Train Update: मुंबई लोकलही मुंबईकरांची लाइफलाइन आहे. मात्र पावसाळ्याच्या दिवसांत मुंबईकरांच्या लोकलचा वेग मंदावतो.
और पढो »
Mumbai News : मुंबईकरांचा प्रवास वेगवान पण, 'या' वेळेतच कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यावरून प्रवासास परवानगीMumbai News : मुंबईला जागतिक स्तरावरील शहराचा दर्जा देऊ पाहणारे अनेक प्रकल्प सध्या नागिरकांच्या सेवेत आले असून, त्यातील एक महत्वाकांक्षी प्रकल्प आता आणखी अद्ययावत पद्धतीनं नागरिकांसाठी सज्ज झाला आहे.
और पढो »
Maharashtra Weather News : 'या' भागांमध्ये मंदावला मान्सून; 'इथं' मात्र जोरदार हजेरी, राज्यातील पर्जन्यमानाचं सविस्तर वृत्तMaharashtra Weather News : महाराष्ट्रात दाखल झालेल्या मान्सूननं सध्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये हजेरी लावलेली असतानाच या नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग काही अंशी मंदावल्याचं पाहायला मिळत आहे.
और पढो »
दीड तासांचे अंतर 20 मिनिटांत कापता येणार; मुंबईतील 'या' महत्त्वाच्या रस्त्याचे काम प्रगतीपथावरMumbai News Today: मुंबईकरांचा प्रवास वेगवान व्हावा यासाठी प्रशासनाकडून रस्ते, उड्डाणपुल आणि मेट्रोचे जाळे परसवण्यात येत आहेत.
और पढो »
Lok Sabha Election Result 2024: बंगाल में अभिषेक बनर्जी ने बनाया रिकॉर्ड, 7.10 लाख वोटों के बड़े अंतर से जीतेतृणमूल के राष्ट्रीय महासचिव अभिषेक बनर्जी ने डायमंड हार्बर सीट से 7.
और पढो »
Rohit Sharma: अमेरिकेच्या समुद्रकिनाऱ्यावर लेकीसोबत वेळ घालवतोय हिटमॅन, फोटो झाले व्हायरलRohit Sharma: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये रोहित शर्मा त्याची मुलगी समायरासोबत दिसतोय. वडील आणि लेक दोघेही समुद्रकिनारी बसलेले दिसतात.
और पढो »