Mumbai Local Train Update: मुंबईकरांना आता प्लॅटफॉर्मवर बसूनही कोणती ट्रेन येणार याची माहिती मिळणार आहे. पश्चिम रेल्वेने मोठा बदल केला आहे.
: मुंबई लोकल ही मुंबईकरांची लाइफलाइन आहे. लोकल प्रवास सुखाचा व्हावा यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्नशील आहे. मुंबई पश्चिम उपनगरी रेल्वे डब्यांवर लवकरच पॅनोरमा डिजिटल डिस्प्ले बसवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आता रेल्वे प्लॅटफॉर्मकडेच्या बाजूने देखील सर्व माहिती समजणार आहे. ही माहिती इंग्रजी, मराठी आणि हिंदी अशा तिन्ही भाषांमध्ये ३ सेकंदांच्या अंतराने दिसणार आहे.
मुंबईकरांची लोकल चुकली ही पुढचं सगळं गणित बिघडतं. कधी कधी रेल्वेची उद्घोषणा झाली नाही तरी लोकल कोणी येणार हे कळत नाही तर, कधी प्लॅटफॉर्मवरील इंडिकेटरदेखील धोका देते. अशावेळी सकाळ सकाळ मुंबईकरांची तारांबळ उडते. तसंच, प्लॅटफॉर्मला कोणी लोकल लागली आहे, हे देखील कळत नाही. त्यासाठीच आता पश्चिम रेल्वेने काही बदल केले आहेत. पश्चिम रेल्वे आता लोकलवर डिजिटल डिस्प्ले लावणार आहे. लोकलवरच्या डिजिटल डिस्प्लेवर प्लॅटफॉर्मवर लागलेली लोकल कोणती आहे व किती डब्ब्यांची आहे, हे प्रवाशांना समजणार आहे.
उपनगरी रेल्वेच्या १२ डब्यांच्या गाडीच्या दर्शनी भागावर दोन्ही बाजूला मिळून एकूण आठ डिजिटल डिस्प्ले बसविण्यात येणार आहेत. ज्यामुळे प्रवाशांना ट्रेनचा क्रमांक, ट्रेन सुरू होण्यापूर्वी गार्डने दिलेली माहिती आता प्लॅटफॉर्मवर बसूनदेखील मिळविणे शक्य होणार आहे. सध्या एका गाडीवर असा डिस्प्ले बसविण्यात आला असून, येत्या काळात पश्चिम रेल्वेच्या आणखीन १० गाड्यांवर असे डिस्प्ले बसविण्यात येणार आहेत.
- डिस्प्लेची किंमत अंदाचे १.७५ लाख रुपये इतकी असून, रेल्वेच्या एका गाडीवर बसविण्याचा खर्च सुमारे १४ लाख इतकी असणार आहे.सरकार पाडण्यासाठी भाजपने 100 कोटींची ऑफर दिली होती; आमदाराच...
Mumbai Local Train News Mumbai Local Train Mumbai Local Train Update In Marathi मुंबई लोकल ट्रेन मुंबई लोकल अपडेट Mumbai Local Train News Mumbai Local Timetable
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
पुणेकरांना 55 मिनिटांत कोकणात तर, 75 मिनिटांत गोव्यात जाता येणार; प्रवास खर्च फक्त 1,991 रुपयेपुणेकरांचा कोकण प्रवास अगदी जलद आणि सुखकर होणार.
और पढो »
IPL 2025 आधी BCCI ने 'हा' नियम पुन्हा आणल्यास CSK ला कोट्यवधींचा फायदा; धोनीही लाभार्थीBenefit For CSK And Dhoni Ahead of 2025 IPL: लिलाव होण्याआधीच हा निर्णय बीसीसीआयने घेतला तर चेन्नईच्या संघाबरोबरच धोनीलाही याचा फार मोठा फायदा होणार आहे.
और पढो »
समृद्धी महामार्गाचा विस्तार, इगतपुरीपासून आणखी एक नवा मार्ग; कोणाला फायदा होणार?Samruddhi Mahamarg Route: समृद्धी महामार्गाचा आता लवकरच विस्तार होणार आहे. आणखी इगतपुरीपासून आणखी एक नवा मार्ग तयार होणार आहे.
और पढो »
खुशबु-संग्राम पुन्हा एकदा होणार आई-बाबा; शेअर केली Good Newsअभिनेत्री खुशबु तावडे दुसऱ्यांदा आई होणार असून तिने ही गुड न्यूज शेअर करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
और पढो »
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक, या स्थानकांत लोकल थांबणार नाहीMumbai Local Train Update: विविध कामांसाठी मध्य रेल्वेने मध्य व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक आयोजित केला आहे. कसं असेल लोकलचं वेळापत्रक वाचा
और पढो »
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक, या स्थानकांत लोकल थांबणार नाहीMumbai Local Train Update: विविध कामांसाठी मध्य रेल्वेने मध्य व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक आयोजित केला आहे. कसं असेल लोकलचं वेळापत्रक वाचा
और पढो »