मुख्यमंत्र्यांनी अर्शद नदीमला दिली कार भेट, पण गोल्ड मेडलपेक्षा अख्ख्या पाकिस्तानमध्ये 'नंबर प्लेट'ची चर्चा!

Pakistan समाचार

मुख्यमंत्र्यांनी अर्शद नदीमला दिली कार भेट, पण गोल्ड मेडलपेक्षा अख्ख्या पाकिस्तानमध्ये 'नंबर प्लेट'ची चर्चा!
Arshad NadeemGold Medalist Arshad NadeemHonda Civic Car
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 84 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 65%
  • Publisher: 63%

Pakistan gold Medalist Arshad Nadeem : गोल्ड मेडलिस्ट अर्शद नदीम याला अनेक भन्नाट गिफ्ट मिळतायेत. पण मुख्यमंत्री मरियम नवाजने अनोखं गिफ्ट दिलंय.

मुख्यमंत्र्यांनी अर्शद नदीमला दिली कार भेट, पण गोल्ड मेडलपेक्षा अख्ख्या पाकिस्तानमध्ये 'नंबर प्लेट'ची चर्चा!

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भालाफेक क्रीडा प्रकारात भारताच्या नीरज चोप्रा याने सिल्वर मेडल जिंकलं अन् पाकिस्तानच्या अर्शद नदीम याने गोल्ड मेडल पटकावलं. ऑलिम्पिकच्या फायनल सामन्यात अर्शद नदीमने सर्वोत्तम कामगिरी केली. दुसऱ्या थ्रोमध्ये नदीमने तब्बल 92.97 मीटर भाला फेकला आणि ऑलिम्पिकमध्ये नवा इतिहास रचला. नदीमच्या या कामगिरीमुळे पाकिस्तानला तब्बल 32 वर्षांनंतर पदक तर 40 वर्षांनंतर सुवर्ण पदक मिळालं आहे.

पाकिस्तानमधील अनेक उद्योगपती, नेत्यांनी अर्शद नदीमला बक्षीसं जाहीर केली आहेत. यात काही विचित्र बक्षीसही मिळत आहेत, ज्यामध्ये अर्शदच्या सासऱ्याने त्याला चक्क म्हैस गिफ्ट केलीये. तर अतरंगी भेटवस्तू देखील अर्शदला मिळताना दिसतायेत. अशातच आता पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज शरीफ यांनी अर्शदची घरी जाऊन भेट घेतली अन् त्याला गिफ्ट दिलं. मरियमने अर्शदच्या घरी जाऊन त्याचं कौतूक केलं. त्यावेळी गिफ्ट म्हणून आलिशान होंडा सिविक कार त्याला दिली. पण चर्चा सुरू गाडीच्या नंबर प्लेटची..

मरियम नवाज शरीफ यांनी भेट म्हणून दिलेल्या गाडीची नंबर प्लेट फार युनिक ठरली. PAK 92.97 अशी गाडीची नंबर प्लेट होती. अर्शदने 92.97 मीटर भाला फेकून रेकॉर्ड रचला होता. याचीच आठवण म्हणून त्याला अनोखी नंबर प्लेट देखील मिळाली आहे. पाकिस्तानमध्ये सध्या गोल्ड मेडल पेक्षा या नंबर प्लेटची चर्चा सुरू आहे. CM Maryam Nawaz has also gifted Arshad Nadeem with brand new Honda Civic car with the number PAK 97.92दरम्यान, अली फाऊंडेशनच्या माध्यमातून मी त्याला 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करतोय, असं अभिनेता आणि गायक अली जफर याने म्हटलं होतं. तर पाकिस्तानचे उद्योगपती अली शेखानी यांनी अर्शद नदीमला ऑल्टो कार गिफ्ट केली. पण पाकिस्तानातली सर्वात स्वस्त कार गिफ्ट केल्याने आता उद्योगपती अली शेखानी ट्रोल होताना दिसतायेत. अर्शद नदीला आतापर्यंत 150 मिलिअन पाकिस्तान रुपयांची बक्षिसं मिळाली आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Arshad Nadeem Gold Medalist Arshad Nadeem Honda Civic Car Unique Number Plate Number Plate PAK 97.92 Pakistan Gold Medalist Pakistan Gold Medalist Arshad Nadeem Pakistan News

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

आधी म्हैस आता 'ही' कार, पाकिस्तानचा गोल्डन बॉय अर्शद नदीमला विचित्र बक्षीसं...सोशल मीडियावर खिल्लीआधी म्हैस आता 'ही' कार, पाकिस्तानचा गोल्डन बॉय अर्शद नदीमला विचित्र बक्षीसं...सोशल मीडियावर खिल्लीArshad Nadeem : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भालाफेक क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक जिंकणाऱ्या गोल्डन बॉय अर्शद नदीमचं पाकिस्तानात जोरदार स्वागत करण्यात आलं. यादरम्यान त्याला अनेक बक्षीसं भेट दिली जात आहेत, पण या बक्षीसांची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे.
और पढो »

जरा अजबच आहे पण...; 50000 कर्मचाऱ्यांना पगारासोबत न मागता दिली 10 दिवसांची सुट्टी, खरं कारण भीतीदायकजरा अजबच आहे पण...; 50000 कर्मचाऱ्यांना पगारासोबत न मागता दिली 10 दिवसांची सुट्टी, खरं कारण भीतीदायकJob News : एखाद्या कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांनी सुट्ट्यांवरून कायमच बोंब असते. पण, सध्या सूरतमधील एका कंपनीनं मात्र कर्मचाऱ्यांना धक्काच दिला आहे.
और पढो »

ऑलिम्पिकमध्ये पदक हुकलं, पण भारतात पाऊल ठेवताच विनेशला मिळणार गोल्ड मेडल; पाहा नेमकं प्रकरण काय?ऑलिम्पिकमध्ये पदक हुकलं, पण भारतात पाऊल ठेवताच विनेशला मिळणार गोल्ड मेडल; पाहा नेमकं प्रकरण काय?ऑल्मिपिकच्या फायनलमध्ये विनेश फोगाटचं 100 ग्रॅम वजन जास्त भरल्याने भारताचं सुवर्णपदक हुकलं. पण असं असलं तरीही भारतात येताच विनेश फोगाटला सुवर्णपदक दिलं जाणार आहे.
और पढो »

महाराष्ट्रातील सर्वात मोठी राजकीय घडामोड; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची पुन्हा भेटमहाराष्ट्रातील सर्वात मोठी राजकीय घडामोड; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची पुन्हा भेटMaharashtra politics : शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली...याभेटीमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय..
और पढो »

महाराष्ट्रात रिव्हर राफ्टिंगचा थरार! थ्रील अनुभवायचा असाल तर कोकणातील या पर्यटनस्थळाला नक्की भेट द्या...महाराष्ट्रात रिव्हर राफ्टिंगचा थरार! थ्रील अनुभवायचा असाल तर कोकणातील या पर्यटनस्थळाला नक्की भेट द्या...महाराष्ट्रात रिव्हर राफ्टिंगचा थरार अनुभवायचा असेल तर कोलाडला नक्की भेट द्या.
और पढो »

पंजाब मुख्यमंत्री ने अरशद नदीम को दिए 86 लाख की कार, जानें 'PAK-9297' क्यों रखा गया इस गाड़ी का नंबरपंजाब मुख्यमंत्री ने अरशद नदीम को दिए 86 लाख की कार, जानें 'PAK-9297' क्यों रखा गया इस गाड़ी का नंबरपेरिस ओलंपिक 2024 (Paris Olympics) में गोल्ड जीतकर पाकिस्तान लौटने पर अरशद नदीम का स्वागत समारोह किया गया था, जिसमें उन्हें होंडा सिविक कार गाड़ी दी गई.
और पढो »



Render Time: 2025-02-16 01:55:05