Maharashtra Loksabha Nivadnuk Nikal: महाराष्ट्रात अनपेक्षित असा निकाल लागला आहे. अनेक दिग्गजांचा पराभव झाला आहे. भाजपलादेखील अपेक्षित यश मिळालेलं नाहीये.
देशात एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत भाजपला मात्र अपेक्षित मत मिळालेलं नाहीये. तसंच, राज्यातही महायुतीला मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या नाराजीचा काही प्रमाणात फटका बसला आहे. मात्र, असे असलं तरी दोन शेतकरी नेत्यांच्या उमेदवारीचा फायदा शिवसेना शिंदे गटाला झाला असून महाविकास आघाडीला तोटा झाला आहे.
महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजपला मोठा फटका बसला आहे. राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघापैकी काही मतदारसंघात धक्कादायक निकाल लागले आहेत. अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोर जावे लागले आहेत. राज्यात भाजपला 9 जागा, शिवसेनेला 7 जागा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 1 जागा मिळाली आहे. म्हणजेच महायुतीला एकूण 17 जागा मिळाल्या आहेत. दोन शेतकरी नेत्यांच्या उमेदवारीचा फायदा शिवसेनेना शिंदे गटाला झाला आहे.
हातकणंगलेमध्ये शिवसेनचे धैर्यशिल माने यांनी ठाकरे गटाचे सत्यजित पाटील यांचा केवळ १३४२६ मतांनी पराभव केला. या ठिकाणी राजू शेट्टी तिसऱ्या नंबरवर गेले असले तरी त्यांना १ लाख ७९ हजार ८५० मते मिळाली. दुसरीकडे बुलढाणा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे प्रतापराव जाधव विजयी ठरले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार प्रतापराव जाधव केवळ २९ हजार ४७९ मतांनी विजयी झाले. तर, त्यांच्या विरोधात असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांना 318862 मते मिळाली आहेत.
दरम्यान, राजू शेट्टी यांनी पराभवानंतर खंत व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मला लोकसभेत जायचं होतं पण शेतकऱ्यांनी देखील मला म्हणावी तशी साथ दिली नाही, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून राजू शेट्टी यांचा दारुण पराभव झाल्यानंतर हा पराभव राजू शेट्टी यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. धार्मिक ध्रुवीकरण आणि पंतप्रधान पदाचा मुद्दा या विचारधारेमध्ये अनेक माणसं बळी पडली त्यामुळे असा निकाल आला अस देखील राजू शेट्टी म्हणालेत.
Sharad Pawar On Government Loksabha Election 2024 Loksabha Nivadnuk Nikal 2024 Raju Shetty राजू शेट्टी लोकसभा निकाल महाराष्ट्रात कोणाला किती मते महाराष्ट्र निकाल 2024 महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2024 भाजप लोकसभा निकाल Loksabha Election Loksabha Election Result 2024
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
दोन बॉयफ्रेंडसोबत महिला डॉक्टर हॉटेल रुममध्ये नको त्या अवस्थेत असतानाच नवरा आला अन्...विवाहित डॉक्टर महिला दोन प्रियकरांसह हॉटेलमध्ये आक्षेपार्ह परिस्थितीत रंगेहाथ पकडल्या गेली आहे. त्यानंतरचा हायव्होल्टेज ड्रामाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
और पढो »
विधान परिषद निवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या दोन उमेदवारांची नावं जाहीर; पक्षानं कोणावर सोपवली जबाबदारी?Maharashtra Politics 2024 : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा टप्पा संपल्यानंतर अखेर पुढे ढकलण्यात आलेल्या शिक्षक, पदवीधर निवडणुकीसाठीच्या घडामोडींना वेग आला आहे.
और पढो »
Pune Porsche Accident: ससूनच्या 'त्या' 2 डॉक्टरांनी आरोपीच्या रक्ताचं काय केलं? पोलिसांनी सांगितला घटनाक्रमकल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा ब्लड रिपोर्ट बदलल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे.
और पढो »
पुण्यातील हिट अँड रन प्रकरणी दोन डॉक्टरांना अटक; ब्लड रिपोर्टची अदलाबदल करणं भोवलंकल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा ब्लड रिपोर्ट बदलल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे.
और पढो »
आनंद दिघे नावावरुन दोन शिवसैनिक समोरासमोर; शिंदे विरुद्ध ठाकरे वाद कुठपर्यंत जाणार?Shinde Vs Thackeray: आनंद दिघे म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचे विश्वासू आणि कडवे शिवसैनिक. ठाण्यात शिवसेनेला रुजवण्यात दिघेंचा सिंहाचा वाटा हे सर्वांनाच माहिती आहे. पण आता आनंद दिघेंवरून मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केलाय. त्यामुळे आनंद दिघे नावावरुन दोन शिवसैनिक समोरासमोर आले आहे.
और पढो »
'तुम्ही ना प्रचार केलात, ना संघटनेच्या कामात रस दाखवता,' भाजपाने आपल्याच माजी केंद्रीय मंत्र्याला पाठवली नोटीसभारतीय जनता पक्षाने माजी केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांना नोटीस बजावली आहे. त्यांना या नोटीशीवर दोन दिवसात उत्तर देण्यास सांगण्यात आलं आहे.
और पढो »