रामधून, गळ्यात रुद्राक्षाची माळ आणि कपाळावर टिळा, कानपूरमध्ये टीम इंडियाचा असं झालं स्वागत.. Video

Cricket समाचार

रामधून, गळ्यात रुद्राक्षाची माळ आणि कपाळावर टिळा, कानपूरमध्ये टीम इंडियाचा असं झालं स्वागत.. Video
RamdhunRudraksha MalaTilak
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 48 sec. here
  • 17 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 75%
  • Publisher: 63%

India vs Bangladesh 2nd Test : बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया कानपूरमध्ये दाखल झाली. कानपूरमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंचं जोरदार स्वागत झालं. गळ्यात रुद्राक्षाची माळ घालून टिळा लावत खेळाडूंचं स्वागत झालं.

चेन्नई कसोटीतील दमदार विजयानंतर टीम इंडिया आता बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी सज्ज झालीय. येत्या 27 तारखेपासून कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर भारत आणि बांगलादेशदरम्यान दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. या कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया कानपूरमध्ये दाखल झाली. कानपूरच्या हॉटेलमध्ये टीम इंडियाचं भव्य स्वागत करण्यात आलं. हॉटेलमध्ये रामधुन वाजवली जात होती, खेळाडूंच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ घालून आणि कपाळावर टीळा लावून स्वागत करण्यात आलं. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

भारत-बांगलादेश दरम्यानचा दुसरा कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. क्रिकइंफोने दिलेल्या रिपोर्टनुसार हा सामना काळ्या मातीच्या खेळपट्टीवर खेळवला जाणार आहे. काळ्या मातीच्या खेळपट्टीवर चेंडू जास्त उसळी घेत नाही. खेळपट्टी काहीशी सपाट असते, सामना जससजा पुढे सरकतो तशी खेळपट्टी धीमी होत जाते. चेन्नईच्या लाल मातीच्या खेळपट्टीवर चेंडूला उसळी मिळत होती. त्यामुळे टीम इंडिया तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरली होती.

आता काळ्या मातीची खेळपट्टी पाहाता टीम इंडिया तीन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरण्याची शक्यता आहे. असं झालं तर कुलदीप यादव आणि अक्षर पटेलपैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे. बांगलादेशचा संघही तीन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरेल. शाकिब अल हसन आणि मेहदी हसन मिराज यांच्याबरोबरच डावखुला फिरकी गोलंदाज तैजुल इस्लामला संधी मिळण्याची शक्यता आहे.2021 मध्ये कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडिअमवर शेवटचा सामना खेळवला गेला होता. न्यूझीलंडने दमदार फलंदाजी करत भारताविरुद्धचा हा सामना ड्रॉ केला होता.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Ramdhun Rudraksha Mala Tilak Team India Virat Kohli Guatam Gambhir Rishabh Pant India Vs Bangladesh Kanpur Virat Kohli Video रामधुन रुद्राक्ष माळा तिलक विराट कोहली गौतम गंभीर भारत विरुद्ध बांगलादेश

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Virat Kohli Rohit Sharma: 'विराट-रोहितने दलीप ट्रॉफी खेळली तर काय...', भारताच्या दिग्गज खेळाडूचं मोठं विधानVirat Kohli Rohit Sharma: 'विराट-रोहितने दलीप ट्रॉफी खेळली तर काय...', भारताच्या दिग्गज खेळाडूचं मोठं विधानरोहित शर्मा आणि विराट कोहलीने दलीप ट्रॉफीत खेळायला हवं होतं असं मत भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनाने मांडलं आहे.
और पढो »

उच्चांकी दरवाढीनंतर आज सोनं झालं स्वस्त; 18,22 आणि 24 कॅरेटचे दर जाणून घ्याउच्चांकी दरवाढीनंतर आज सोनं झालं स्वस्त; 18,22 आणि 24 कॅरेटचे दर जाणून घ्याGold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा घट झाली आहे. आज काय आहेत सोन्याचे भाव जाणून घ्या
और पढो »

आर अश्विनच्या फिरकीसमोर बांगलादेशचं लोटांगण, टीम इंडियाचा मोठा विजयआर अश्विनच्या फिरकीसमोर बांगलादेशचं लोटांगण, टीम इंडियाचा मोठा विजयपहिल्या सामन्यात विजय मिळवल्याने टीम इंडियाने सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली आहे. टीम इंडियाचा या सामन्यात 280 धावांनी विजय झाला आहे.
और पढो »

अश्विन- जडेजाच्या जोडीने बांगलादेशला फोडला घाम, पहिल्या दिवशी टीम इंडियाची मोठी आघाडीअश्विन- जडेजाच्या जोडीने बांगलादेशला फोडला घाम, पहिल्या दिवशी टीम इंडियाची मोठी आघाडीटीम इंडियाचे दिग्गज फलंदाज आउट झाल्याने टीम संकटात असताना अश्विन आणि जडेजा हे दोघे खऱ्या अर्थाने टीम इंडियाचे संकटमोचक ठरले.
और पढो »

हॅपी बर्थ डे ATM, भारतातील पहिली एटीएम मशीन कोणत्या बँकेची आणि कधी सुरु झाली?हॅपी बर्थ डे ATM, भारतातील पहिली एटीएम मशीन कोणत्या बँकेची आणि कधी सुरु झाली?ATM Hisotry : नवनवी तंत्रज्ञानामुळे आपलं आयुष्य आणखी सोपं झालं आहे. कधी काळी खात्यातून पैसे कढण्यासाठी भल्या मोठ्या रांगा लावाव्या लागत होत्या. पण यानंतर तंत्रज्ञान विकसित झालं आणि थेट मशिनमधून पैसे मिळायला लागले. याला एटीएम असं नाव देण्यात आलं.
और पढो »

IND vs BAN : बांगलादेशविरुद्ध टीम इंडियाचा स्कॉड जाहीर, पहिल्या कसोटीसाठी 'या' खेळाडूंना संधीIND vs BAN : बांगलादेशविरुद्ध टीम इंडियाचा स्कॉड जाहीर, पहिल्या कसोटीसाठी 'या' खेळाडूंना संधीIND vs BAN squad announced : बांगलादेशचा संघ भारताच्या दौऱ्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळेल. यातील पहिल्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाचा स्कॉड जाहीर झालाय.
और पढो »



Render Time: 2025-02-13 11:29:42