वाल्मिक कराडला संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटक करण्यात आली. सीआयडीने त्याला बीडमधील तुरुंगात ठेवण्यात आले आहे. इतर चार आरोपींना बीड शहर पोलीस ठाण्यातून इतर ठिकाणी हलवण्यात आले आहेत.
Walmik Karad : संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील चार आरोपींना बीड शहर पोलीस ठाण्यातून इतर ठिकाणी हलवण्यात आलंय. वाल्मिक कराडला बीडमधील तुरुंगात आणण्यात आलं..त्यामुळे इतर चार आरोपींना इतर ठिकाणी हलवण्यात आलं.वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर पुढं काय होणार असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. वाल्मिक कराडला अजूनही संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहआरोपी करण्यात आलेलं नाही. सीआयडी आता वाल्मिकची चौकशी करतेयं. देशमुख हत्या प्रकरणात कराड लिंक काय आहेत याचा तपास सुरु आहे.
हे दखील वाचा... वाल्मिकच्या शरणागतीची स्क्रिप्ट कुणी लिहिली? शरणागतीसाठी वाल्मिकनं सेटिंग केल्याचा आरोप वाल्मिक कराडला सीआयडीनं पवनचक्की खंडणी प्रकरणात अटक केलीय. खरं तर वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्येप्रकरणातला संशयित आहे. वाल्मिकचे संतोष देशमुख प्रकरणातलं कनेक्शन शोधणं सीआयडीसमोर आव्हान असणार आहे.
संतोष देशमुखांच्या हत्येवेळी वाल्मिक कराड कुठं होता? आरोपींनी हत्येवेळी वाल्मिक कराडला फोन केला होता का? संतोष देशमुखांना वाल्मिक कराडनं धमकावलं होतं का? फरार आरोपींच्या वाल्मीक कराड संपर्कात होता का? वाल्मिक कराडशिवाय आणखी कोण या हत्येत आहे का? हे तपासणं सीआयडीसाठी आव्हान असणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधिमंडळात घोषणा केल्याप्रमाणं पोलीस महानिरीक्षक बसवराज तेली यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी गठीत करण्यात आलीये. त्यांच्या टीममध्ये दहा सर्वोकृष्ट अधिकारी दिल्याची माहिती आहे. सीआयडीनं वाल्मिक कराडला अटक केली. मात्र त्याला अजूनही संतोष देशमुख प्रकरणात सहआरोपी केलेलं नाही. सीआयडी आणि पोलीस त्याला सहआरोपी करतात का याकडं देशमुख कुटुंबीय आणि मस्साजोगच्या गावकऱ्यांचं लक्ष लागलंय. वाल्मिक कराडवर यापूर्वी 15 गुन्हे दाखल आहेत.
WALMIK KARAD SANTOSH DESHMUKH MURDER CID INVESTIGATION
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड चांगलेच चर्चेतसंतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडांच्या नावाचा वापर करणे सुरू झाल्याने त्याच्या ओळखीची ओळख करून घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
और पढो »
Santosh Deshmukh Murder: पोलिसांनी 'तो' कॉल कोणाला केला? खासदाराचा सवाल; म्हणाले, 'इलेक्शनच्या..'Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन खासदारांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
और पढो »
बीड आहे की बिहार! सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येमुळे खळबळ; काय आहे राजकीय कनेक्शन? वाल्मिकी कराड कोण?बीड जिल्ह्यातल्या संतोष देशमुख या सरपंचांच्या हत्या प्रकरणानं खळबळ उडाली आहे. खंडणीच्या वादातून झालेल्या हत्येचे राजकीय कनेक्शन असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
और पढो »
महाराष्ट्र सरपंच हत्या: सीआईडी ने गठित किया एसआईटी, 10 सदस्य टीम करेगी जांचमहाराष्ट्र सरकार ने बीड जिले के मस्साजोग गांव के सरपंच संतोष देशमुख की हत्या की जांच के लिए 10 सदस्यीय विशेष जांच दल (एसआईटी) का गठन किया है।
और पढो »
अतुल सुभाष आत्महत्याप्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; पत्नी निकितासह तिघांना अटकAtul Subhash Wife: AI इंजिनिअर अतुल सुभाषच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश आले आहे. पत्नी निकिताला अटक करण्यात आली आहे.
और पढो »
संतोष देशमुख हत्या प्रकरण: संभाजीराजे छत्रपतींनी मुंडे बंधू-भगिनींवर हल्लाबोल!संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुलगा मी चकित झालो. बीडमध्ये आज झालेल्या मुकमोर्चामध्ये संभाजीराजे छत्रपतींनी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढलेत आणि मुंडे बंधू-भगिनींवर हल्लाबोल केला आहे.
और पढो »