शरद पवार यांनी दाऊद इब्राहिमची भेट घेतल्याचा खळबळजनक दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे. शरद पवार दुबईत जाऊन दाऊदला भेटले असा खळबळजनक दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. मुंबई येथील पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत.
1988-91 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार होते. त्यातील त्यांचा एक दौरा होता लंडनला. तिथून ते कॅलिफोर्नियाला गेले. तिथे ते दोन दिवस राहिले. त्यांची मीटिंग कोणासोबत झाली. त्याचा खुलासा त्यांनी केला पाहिजे असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. कॅलिफोर्नियामधून शरद पवार लंडनला पुन्हा आले. दोन दिवस लंडनमध्ये थांबले. तिथून दुबईला गेले आणि दुबईमध्ये त्यांची दाऊद इब्राहीमसोबत विमानतळावर भेट झाली. त्यांना तिथे सोन्याचा हार घालण्यात आला.
1988-91 या काळात शरद पवार मुख्यमंत्री होते. त्यामुळे त्यांना केंद्र सरकारची परवानगी असल्याशिवाय दौऱ्यावर जाता येत नाही. तेव्हा केंद्र सरकारने त्यांना कॅलिफोर्नियाच्या बैठकीत उपस्थित राहण्याची परवानगी दिली होती का ? शरद पवार यांना केंद्र सरकारने त्या वेळी परवानगी दिली असेल, तर मग दुबईत जाऊन दाऊद इब्राहिमला भेटण्याची परवानगी पण दिली होती का? आणि त्या बैठकांचा अहवाल केंद्र सरकारला दिला होता का? असे सवाल ॲड. आंबेडकर यांनी उपस्थित केले.डॉ.
भारताची आजची परिस्थिती आहे, ती 1990-2000 सालासारखी दिसत आहे. मध्यंतरी बॉम्ब ब्लास्ट होत होता, कोणाला तरी गोळी मारली जायची ते काही दिवसांपासून पुन्हा सुरू झाल्याचे दिसत आहे, असेही त्यांनी या वेळी म्हटले. बाबा सिद्दीकी यांची हत्या सुद्धा त्यामुळेच झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.मनोरंजन
Sharad Pawar Dubai Dawood Ibrahim Prakash Amdekar Big Secret Explosion प्रकाश आंबेडकर शरद पवार दाऊद इब्राहिम
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
मंत्रीपदाची ऑफर नाकारली; प्रकाश आंबेडकर यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठा गौप्यस्फोटझी २४ तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी १९८४ मध्ये राजीव गांधींच्या सरकारमध्ये मंत्रिपदाची ऑफर मिळाल्याची खबर केली. त्यांनी व्ही.पी.सिंग यांना दिला होता शब्द आणि त्यामुळे ही ऑफर नाकारली.
और पढो »
इस्रायल-हमास युद्धातली सर्वात मोठी बातमी! हमास चीफ याह्या सिनवार गाझामध्ये ठारYahya Sinwar: हमासला सर्वात मोठा दणका बसला आहे. गाझा युद्धात इस्रायली सैन्याने आपले सर्वात मोठे लक्ष्य साध्य केले आहे.
और पढो »
...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते; प्रकाश आंबेडकरांनी कोणाचा उल्लेख करत केला मोठा दावा?Maharashtra Political News : प्रकाश आंबेडकर यांचा निशाणा कोणावर? जाणून घ्या राजकीय वर्तुळातील एका महत्त्वाच्या नेत्याच्या सूचक विधानामागे दडलंय तरी काय
और पढो »
राजकारणाचा विजय झाला आणि न्याय मारला जातोय, बदलापूर एन्काऊंटर प्रकरणात सर्वात मोठा आरोपबदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे.
और पढो »
Bopdev Ghat Rape Case: 'तुमच्या पदाधिकाऱ्यावर महिलांचे अश्लील...'; चाकणकरांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोलBopdev Ghat Rape Case: सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी मंगळवारी सायंकाळी बोपदेव घाटात ज्या ठिकाणी ही घटना घडली तिथे जाऊन पहाणी करत स्थानिक पोलिसांना काही निर्देश दिले.
और पढो »
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा पक्षप्रवेश! शरद पवारांकडे मदत मागणाऱ्या काँग्रेसच्या बड्या नेत्याचा अजित पवार पक्षात प्रवेशMaharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड घडली आहे. शरद पवारांकडे मदत मागणाऱ्या काँग्रेसच्या बड्या नेत्याने अजित पवार गटात प्रवेश केला आहे.
और पढो »