Maharashtra Political News : प्रकाश आंबेडकर यांचा निशाणा कोणावर? जाणून घ्या राजकीय वर्तुळातील एका महत्त्वाच्या नेत्याच्या सूचक विधानामागे दडलंय तरी काय
विधानसभा निवडणुकीची अधिकृत तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नसली तरीही राज्यात विविध पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. सत्ताधारी त्यांचं संख्याबळ वाढवण्यावर भर देतानाच केंद्रीय सूत्रधारांकडून फोडाफोडीचं राजकारण केलं जात असल्याचा विरोधकांचा आरोप होत आहे, तर तिथं काही नेते या सत्ताकारणामध्ये स्वत:ची ठाम भूमिका मांडण्याच्या प्रयत्नांच सत्ताधारी आणि विरोधकांच्या निर्णयांवर नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत.
दरम्यान, सध्या अनेक चर्चांना वाव मिळू शकतो कारण ठरेल ते म्हणजे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांचं एक सूचक विधान. काँग्रेसने वंचितला सोबत घेतलं असतं तर आज राहुल गांधी पंतप्रधान असले असते असा मोठा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. झी २४ तासच्या 'टू द पॉईंट' मुलाखतीत आंबेडकरांनी हा दावा केलाय. 'काँग्रेसने वंचितला सोबत घेतलं असतं तर भाजपला रोखता आलं असतं. वंचित आणि काँग्रेसने मिळून भाजपला 220 जागांच्या वर जाऊ दिलं नसतं', असंही आंबेडकर म्हणाले. तसंच जर भाजपच्या 20 जागा कमी झाल्या असत्या, तर मोदी पंतप्रधान झाले नसते; राहुल गांधी पंतप्रधान झाले असते असा दावाही प्रकाश आंबेडकरांनी केला. वंचितला न घेतल्याने काँग्रेसने पंतप्रधानपदाची संधी गमावली असं ठाम मत त्यांनी मांडलं.अनेक राजकीय घडामोडींवर भाष्य करणाऱ्या प्रकाश आंबेडकर आंनी यावेळी जरांगे आणि निवडणुका यांवरही वक्तव्य केलं.
Prakash Ambedkar Pm Rahul Gandhi Maharashtra Vidhansabha Election 2024 Vidhansabha Election News Marathi News To The Point Exclusive Interview मुलाखत प्रकाश आंबेडकर राहुल गांधी विधानसभा निवडणूक पंतप्रधान भारत राजकारण टू द पॉईंट
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'नरेंद्र मोदी पाकिस्तानमध्ये आले तर...', Champions Trophy वर बोलताना माजी क्रिकेटरची हवेत फटकेबाजीChampions Trophy 2025 : पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानात आले तर भारतीय संघ चॅम्पियन ट्रॉफीसाठी पाकिस्तानमध्ये खेळण्यासाठी येऊ शकतो, असं पाकिस्तानचा माजी क्रिकेटर बासित अली याने म्हटलं आहे.
और पढो »
'... तर लाडक्या बहिणींना 3000 रुपयेही देऊ' मुख्यमंत्र्यांचं विधान; भावांचाही केला उल्लेखLadki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांचं सूचक विधान. भावांचा उल्लेख करत ते नेमकं काय म्हणाले? जाणून घ्या सविस्तर वृत्त
और पढो »
'कंगनाला बलात्काराचा फार अनुभव, तिलाच...', शिरोमणी अकाली दलच्या प्रमुखांनी अभिनेत्रीला दिलं उत्तरबॉलिवूड अभिनेत्री आणि भाजपा खासदार कंगना रणौतने (Kangana Ranaut) एका मुलाखतीत दावा केला की, जर भारताचं नेतृत्व भक्कम नसतं तर शेतकरी आंदोलनादरम्यान देशात बांगलादेशसारखी स्थिती निर्माण झाली असती.
और पढो »
विधानसभेसाठी पीएम मोदींनी फुंकलं रणशिंग, महिनाभरात मोदी तिसऱ्यांदा महाराष्ट्रातMaharashtra Politics : विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वारंवार महाराष्ट्रात येत आहेत. लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 18 पेक्षा जास्त सभा महाराष्ट्रात घेतल्या होत्या.
और पढो »
शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी तुम्ही माफी मागणार का? CM शिंदे म्हणाले 'मी एकदा...'Eknath Shinde on Chhatrapati Shivaji Maharaj Statue: मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा कोसळल्या प्रकरणी विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केला आहे.
और पढो »
काँग्रेस नेत्याने संपूर्ण कुटुंबासह संपवलं जीवन, आधी बाहेरुन दरवाजा बंद केला, नंतर आतून कडी लावली अन्...; कारणही उघडकोणालाही समजू नये यासाठी त्यांनी पुढच्या दरवाजाला कुलूप लावलं होतं. यानंतर मागच्या दरवाजाने घऱात प्रवेश करत आतूनही दरवाजा बंद केला.
और पढो »