बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजपा खासदार कंगना रणौतने (Kangana Ranaut) एका मुलाखतीत दावा केला की, जर भारताचं नेतृत्व भक्कम नसतं तर शेतकरी आंदोलनादरम्यान देशात बांगलादेशसारखी स्थिती निर्माण झाली असती.
बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजपा खासदार कंगना रणौतने एका मुलाखतीत दावा केला की, जर भारताचं नेतृत्व भक्कम नसतं तर शेतकरी आंदोलनादरम्यान देशात बांगलादेशसारखी स्थिती निर्माण झाली असती.बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजपा खासदार कंगना रणौतने एका मुलाखतीत शेतकरी आंदोलनावर बोलताना केलेल्या विधानांवरुन वाद रंगला आहे. शेतकरी आंदोलनादरम्यान महिलांवर बलात्कार झाले होते असा दावा कंगनाने केला होता. यानंतर भाजपानेही या विधानाचा पक्षाशी काही संबंध नसल्याचं म्हटलं होतं.
कंगनाला बलात्काराचा फार अनुभव आहे असं पंजाबचे माजी खासदार आणि शिरोमणी अकाली दलचे प्रमुख सिमरनजित सिंग मान म्हणाले आहेत."तुम्ही तिला बलात्कार कसे होतात हे विचारु शकता. म्हणजे लोक बलात्कार कसे होतात हे सांगू शकतात. तिला बलात्काराचा फार अनुभव आहे," असं ते म्हणाल्याचं वृत्त इंडिया टुडेने दिलं आहे. त्यांच्या या विधानाची खातरजमा झालेली नाही.
कंगना रणौतन आपल्या मुलाखतीत आरोप करताना म्हटलं होतं की, शेतकरी आंदोलनादरम्यान मोठा हिंसाचार झाला. त्याठिकाणी बलात्कार झाले आहेत, अनेकांच्या हत्यादेखील झाल्या आहेत. केंद्र सरकारने कृषी संबंधित तीन विधेयक माघारी घेतले नसते तर देशात आणखी काही भयंकर घटना घडल्या असत्या."आपल्या देशाचे सर्वोच्च नेतृत्व मजबूत नसते, तर या लोकांनी पंजाबला बांगलादेश बनवले असते. शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली जे काही चालू होते, ते संपूर्ण देश पाहत होता. निषेधाच्या नावाखाली हिंसाचार कसा पसरवला गेला.
भाजपा नेतृत्वाने आपल्याला या विधानाबद्दल फटकारलं आहे अशी माहिती कंगनाने दिली आहे."मी संघाचा अंतिम आवाज नाही. असं वाटण्याइतका मी काही वेडा नाही," असंही ती म्हणाली. कंगना रणौत राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री आहे. हिमाचल प्रदेशच्या मंडीमधून निवडणूक जिंकत ती खासदार झाली आहे.भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानींची घसरण, अव्वल स्थानावर कोण? पाहा टॉप 10 यादी
Kangana Ranaut Farmer Protest Farmer Agitation
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
महाराष्ट्रासह इतर राज्यांना काहीच का दिलं नाही? अर्थमंत्री म्हणाल्या, ‘काँग्रेसने 2004 ला असंच…’Nirmala Sitharaman On Budget allocation : केंद्रिय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला आणि इतर राज्यांना काहीच मिळालं नाही, असा आरोप करणाऱ्या विरोधी पक्षातील नेत्यांना अर्थमंत्र्यांनी खणखणीत उत्तर दिलं.
और पढो »
'बहिणीविरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं,' अजित पवारांच्या विधानावर सुप्रिया सुळेंनी 2 शब्दांत दिलं उत्तरSupriya Sule on Ajit Pawar: मी माझ्या बहिणीच्या (सुप्रिया सुळे) विरोधात सुनेत्राला (Sunetra Pawar) उभं करायला नको होतं. पण त्यावेळेस केलं गेलं. पार्लमेंट्री बोर्डाने तो निर्णय घेतला होता असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत.
और पढो »
महाराजांच्या पुतळ्याच्या पायाशी अपघात झालेला चालेल का? शशांक केतकरने जन्माष्टमीच्याच दिवशी का विचारला हा सवाल?अभिनेता शशांक केतकरने जन्माष्टमीनिमित्त विचारला सवाल आताची युवा पिढी फार चोखंदळ असल्याचं सांगितलं.
और पढो »
ऑलिम्पिकमध्ये पदक हुकलं, पण भारतात पाऊल ठेवताच विनेशला मिळणार गोल्ड मेडल; पाहा नेमकं प्रकरण काय?ऑल्मिपिकच्या फायनलमध्ये विनेश फोगाटचं 100 ग्रॅम वजन जास्त भरल्याने भारताचं सुवर्णपदक हुकलं. पण असं असलं तरीही भारतात येताच विनेश फोगाटला सुवर्णपदक दिलं जाणार आहे.
और पढो »
या इवल्याश्या देशाने अपात्र खेळाडूला पदक परत मिळवून दिलं; मग भारताला हे का शक्य नाही?Vinesh Phogat Olympics 2024 Disqualification: विनेश फोगाट प्रकरणात मोदी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना थेट एका छोट्याश्या देशामधील खेळाडूबरोबर असं घडलेलं तेव्हा त्यांनी का केलेलं याची आठवण करुन देण्यात आली आहे.
और पढो »
कोलकाता प्रकरणावर पोस्ट केल्यामुळे अभिनेत्रीला बलात्काराची धमकी, पाठवले अश्लिल मॅसेजकोलकातामधील डॉक्टर बलात्कार प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरून टाकलं आलं. या प्रकरणावर अनेकजण आपला संताप व्यक्त करत आहे. या प्रकरणानंतर अभिनेत्री मिमी चक्रवर्तीला बलात्काराची धमकी मिळाली आहे.
और पढो »