शरद पवार यांनी तरुण पदाधिकाऱ्यांना भेटत पक्षाच्या भविष्याबद्दल म्हटले की, त्यांना सत्तेत जाण्यापेक्षा लढणे पसंत आहे. त्यांनी पुन्हा 1999 सालीची परिस्थिती निर्माण झाली असल्याचेही सांगितले.
शरद पवार ांचा पक्ष सत्तेत जाणार का अशी प्रश्न निर्माण झाल्या आहेत. मुंबईमध्ये तरुण पदाधिकाऱ्यांबरोबर शरद पवार ांची बैठक पार पडली. त्यामध्येच त्यांनी पक्षाच्या भविष्यासंदर्भात भाष्य केलं. राष्ट्रवादी काँग्रेस चे संस्थापक शरद पवार यांनी युवकांच्या बैठकीमध्ये एक सूचक विधान केलं आहे. मागील काही दिवसांपासून शरद पवार ांच्या खासदारांना 'बाप आणि लेकीला सोडून दादांकडे या' असा संदेश अजित पवारांच्या पक्षाकडून देण्यात आल्याची चर्चा आहे.
असं असतानाच शरद पवारांनी युवकांसमोर बोलताना पक्षाच्या भविष्यासंदर्भात भाष्य केलं आहे. शरद पवारांनी त्यांचा पक्ष सत्तेत जाणार असल्याच्या चर्चेवरही उत्तर दिलं. मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये शरद पवार बोलत होते. यावेळेस त्यांनी पक्षावर पुन्हा 1999 सारखी स्थिती निर्माण झाल्याचं म्हटलं आहे.सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारांचा पक्ष सत्तेत जाणार असल्याच्या बातम्या केवळ अफवाच आहेत, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. शरद पवारांनी तरुणांशी संवाद साधताना,'आपण जे सोबत येतील त्यांना घेऊन सत्तेत जाण्यापेक्षा लढणं पसंत करु,' असंही शरद पवारांनी म्हटलं आहे. पुढील 15 दिवसांमध्ये संघटनेत मोठे बदल आपल्याला पाहायला मिळतील, असं सूचक विधानही यावेळेस शरद पवारांनी केलं आहे.'1999 साली जी आपली परिस्थिती होती तीच आता निर्माण झाली आहे. आता माझ्याकडे देण्यासाठी काही नाही आणि गमावण्यासाठी देखील काही नाही,' असंही शरद पवारांनी तरुण सहकाऱ्यांना सांगितलं. त्याचप्रमाणे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणूनच सामोरे जाणार असल्याचंही शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे.खासदार अमर काळे यांनी मोठा दावा केला आहे. सोनिया दुहान यांच्याकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या 7 खासदारांना संपर्क साधण्यात आल्याचं ते म्हणाले आहेत. विरोधात बसून काय करणार आमच्यासोबत या असं सोनिया दुहान यांनी खासदारांना सांगितल्याचं अमर काळे म्हणाले आहेत. याची माहिती सुप्रिया सुळेंना दिल्याचंही अमर काळे म्हटलं आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मात्र हा दावा फेटाळून लावला आहे. आम्ही कधीही आमदार पळवले नाहीत, फोडले नाहीत असं ते म्हणाले आहेत
शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भविष्य सत्ता युवकांशी संवाद
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Birthday Special: दागिने, कोट्यवधींचं घर, Shares मध्ये मोठी गुंतवणूक... शरद पवारांची एकूण संपत्ती...Sharad Pawar Net Worth 2024 In Rupees: शरद पवारांचा आज 85 वा वाढदिवस असून मागील सहा दशकांपासून राज्याच्या राजकारणात सक्रीय असलेल्या पवारांची एकूण संपत्ती कितीये ठाऊक आहे का?
और पढो »
भारतात प्रथमच धरणाखालून जाणार रस्ता, पाण्याखाली खोदणार बोगदा; 'या' राज्याचा निर्णयHimachals Underwater Marvel: हिमाचल प्रदेश सरकारने गोविंद सागर धरणाखालून जाणार रस्ता बांधण्याचा विचार आहे.
और पढो »
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या शेड्युलबाबत मोठी अपडेट, 'या' देशात खेळवले जाणार भारताचे सामनेभारतीय संघ पाकिस्तानात जाणार नाही तर मग त्यांचे सामने कोणत्या देशात खेळवण्यात येणार याविषयी बरीच चर्चा होती, मात्र आता याविषयी एक मोठी अपडेट समोर आली आहे.
और पढो »
ऑस्ट्रेलियामध्ये टीम इंडियासोबत भेदभाव? प्रॅक्टिससाठी मिळाली खराब पिच, खेळाडूंना होतेय दुखापतबॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील चौथा सामना हा मेलबर्नमध्ये खेळवला जाणार असून हा सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलिया सध्या कुरापती करत असल्याचे समोर येत आहे.
और पढो »
ISROच्या स्पेडेक्स मिशनाचा यशस्वी प्रक्षेपणISROच्या स्पेडेक्स मिशनाचा यशस्वी प्रक्षेपण झाला आहे. या मिशनात दोन उपग्रहांची अंतराळात डॉकिंग आणि अनडॉकिंग करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
और पढो »
महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना परत केली जाणार 4 हजार 849 एकर जमीन!महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना परत केली जाणार असलेल्या 4 हजार 849 एकर जमिनीचा समावेश यात आहे. हे निर्णय मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत घेण्यात आले आहे.
और पढो »