शिवसेना आणि राष्ट्रवादीचे ओरिजनल मालक कोण? राज ठाकरेंच्या प्रश्नाची महाराष्ट्राच्या राजकारणात जबरदस्त चर्चा

Maharashtra Assembly Elections 2024 समाचार

शिवसेना आणि राष्ट्रवादीचे ओरिजनल मालक कोण? राज ठाकरेंच्या प्रश्नाची महाराष्ट्राच्या राजकारणात जबरदस्त चर्चा
Shiv SenaNCPRaj Thackeray
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 84 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 54%
  • Publisher: 63%

Raj Thackeray : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह बाळासाहेबांचं असल्याचं सांगून राज ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. राज ठाकरेंच्या या वक्तव्यानं शिवसेनेवर स्पष्टीकरण देण्याची वेळ आलीय. तर उद्धव ठाकरेंच्या पक्षानं राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर टीकेची झोड उठवलीये.

शिवसेना आणि राष्ट्रवादीचे ओरिजनल मालक कोण? राज ठाकरे ंच्या प्रश्नाची महाराष्ट्राच्या राजकारणात जबरदस्त चर्चा

राज ठाकरेंनीही पहिल्यांदा शिवसेना फोडल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय.शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण बाळासाहेबांचा असल्याचं सांगत राज ठाकरेंनी एका नव्या चर्चेला तोंड फोडलंय. गेल्या काही वर्षांत सुरु असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणावरुन राज ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा खरपूस भाषेत समाचार घेतला. धनुष्यबाण हा उद्धव ठाकरेंचा नाही असं राज ठाकरे म्हणाल्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चांगलंच जिव्हारी लागलंय. राज ठाकरेंच्या टीकेला ठाकरे समर्थकांनीही सडेतोड उत्तर दिलंय.

राज ठाकरेंनी शिवसेना फोडली होती असा टोला आदित्य ठाकरेंनी झी 24 तासच्या प्रचारसभेत लगावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही राज ठाकरेंच्या आरोपांना उत्तर दिलंय. शिवसेना आणि धनुष्यबाण गहाण होता तो आम्ही मुक्त केल्याचा दावा एकनाथ शिंदेंनी केलाय. अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्ष पळवल्याचा आरोप केला होता. राष्ट्रवादी हा पक्ष शरद पवारांचाच असल्याचं ते म्हणाले होते. राज ठाकरेंच्या या आरोपांना फारसं गांभीर्यानं घेत नसल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणालेत.

ऐन निवड़णुकीत राज ठाकरेंनी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे ओरिजनल मालक कोण हा प्रश्न उपस्थित केलाय. याचा फायदा राज ठाकरेंनी किती होईल सांगता येणारक नाही पण उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी थोडी सहानुभूती मात्र हमखास मिळणार आहे. दरम्यान, शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह प्रकरणी या आठवड्याच्या अखेर म्हणजे 8 नोव्हेंबरला निर्णय येणार आहे. पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं याचिका दाखल केली होती. त्यावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड त्यांच्या निवृत्तीच्या आधी निकाल देणार आहेत. 10 नोव्हेंबरला सरन्यायाधीश निवृत्त होत आहेत. त्याआधी 8 नोव्हेंबरला त्यांच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी ते निकाल देतील. मागच्या अनेक महिन्यांपासून या प्रकरणावर सुनावणी झालेली नाही.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Shiv Sena NCP Raj Thackeray Maharashtra Politics राज ठाकरे

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आणणार तिसरी आघाडी; परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार जाहीरमहाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आणणार तिसरी आघाडी; परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार जाहीरThird Alliance In Maharashtra : महाराष्ट्राच्या राजकारणात परिवर्तन महाशक्ती आपली ताकद दाखवणार आहे. महायुती आणि महाविकासआघाडीला टक्कर देण्यासाठी तिसऱ्या आघाडीने आपले उमेदवार जाहीर केले आहेत.
और पढो »

मोठा राजकीय भूकंप? 'शिवसेनेचं 2 ठिकाणी बोलणं, राऊत शाहांना भेटले'वर काँग्रेस म्हणाली, 'कोण कोणाला...'मोठा राजकीय भूकंप? 'शिवसेनेचं 2 ठिकाणी बोलणं, राऊत शाहांना भेटले'वर काँग्रेस म्हणाली, 'कोण कोणाला...'Maharashtra Assembly Election 2024: महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये वाद असल्याची जोरदार चर्चा असतानाच अन्य एका वेगळ्याच्या चर्चेला उधाण आलं आहे.
और पढो »

Maharashtra Vidhansabha Election : महायुतीकडून मनसेला बिनशर्त पाठिंबा? गोष्ट एका परतफेडीचीMaharashtra Vidhansabha Election : महायुतीकडून मनसेला बिनशर्त पाठिंबा? गोष्ट एका परतफेडीचीMaharashtra Assembly Election 2024 : राजकारणात सर्वकाही माफ असतं... कसं? महायुती आणि मनसेमधील या कथित परतफेडीचीच चर्चा...
और पढो »

महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंची भूमिका ठरणार महत्त्वाची; पुण्यातील 'या' 5 मतदार संघात मनसे उमेदवार उभे करणार?महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंची भूमिका ठरणार महत्त्वाची; पुण्यातील 'या' 5 मतदार संघात मनसे उमेदवार उभे करणार?Raj Thackeray : लोकसभा निवडणूक स्वबळावर राज ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिलाय. आगामी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची असणार आहे. पुण्यातील आठ पैकी पाच मतदारसंघात मनसे उमेदवार देण्याच्या तयारीत असल्यानं राज ठाकरे यांनी मिशन पुणे हाती घेतलंय.
और पढो »

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी रणनिती! राज ठाकरे यांचा मास्टरप्लान; महायुती आणि महाविकास आघाडीतील 'त्या' उमेदवारांना...महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी रणनिती! राज ठाकरे यांचा मास्टरप्लान; महायुती आणि महाविकास आघाडीतील 'त्या' उमेदवारांना...Maharashtra politics : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केलीय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रणनिती आखली आहे.
और पढो »

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा सस्पेंस! सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये फाईलने चेहरा लपवणारा 'तो' नेता कोण?महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा सस्पेंस! सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये फाईलने चेहरा लपवणारा 'तो' नेता कोण?Maharashtra politics : विधानसभा निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. अशातच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत.
और पढो »



Render Time: 2025-02-19 21:00:56