Maharashtra Weather Alert: राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रीय झाला आहे. विदर्भात या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.
ऑगस्टमध्ये विश्रांती घेतलेला पाऊस सप्टेंबरमध्ये चांगलाच सक्रीय झाला आहे. राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर वाढला आहे. तर, सप्टेंबर महिन्यात देशभरात चांगला पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भात आज रविवार 1 सप्टेंबर रोजी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
सप्टेंबर महिन्यात प्रत्येक आठवड्यात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होईल. त्यामुळं देशभरात लक्षणीय प्रमाणात पाऊस होणार आहे. सप्टेंबर महिन्यात बाप्पाचे आगमन होत आहे. बाप्पाच्या आगमनालादेखील वरुण राजाची हजेरी असणार आहे. मुंबईत आज 1 सप्टेंबर रोजी ढगाळ वातावरण राहणार आहे. तर, विदर्भात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.
नागपुरात सोसाट्याच्या वाऱ्यासह दमदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागपूर,चंद्रपूर,आणि यवतमाळ या जिल्ह्यांना 1 सप्टेंबर रोजी रविवारी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. अमरावती वर्धा आणि गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पश्चिम व मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी 1-2 सप्टेंबर रोजी पावसाची शक्यता आहे.
रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा जिल्ह्याला 1 ते 4 सप्टेंबर दरम्यान जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 3 ते 4 सप्टेंबर आणि कोल्हापूर जिल्ह्यात 4 सप्टेंबरला यलो अलर्ट देण्यात आला आहे.ड्रग्ज प्रकरणात तरुणाला अडकवण्याचा मुंबई पोलिसांचा प्रयत्न CCTV मध्ये कैद; स्वत:च्या खिशातून पुडी काढून..
Maharashtra Weather Update Maharashtra News Today Maharashtra Rain Alert Maharashtra Rain Update Weather Today At My Location महाराष्ट्र पाऊस महाराष्ट्र रेन अलर्ट महाराष्ट्र अपडेट
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
काळजी घ्या! राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, 'या' 2 जिल्ह्यांना रेड अलर्टMaharashtra Weather Alert: ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस पुन्हा एकदा पाऊस सक्रीय झाला आहे. आज कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट जाणून घेऊया.
और पढो »
घाटमाथ्यावर आज मुसळधार पाऊस बरसणार; पुणे, साताऱ्याला रेड अलर्टMaharashtra Weather Alert: आज पुणे आणि सातारा परिसरात रेड अलर्ट देण्यात आला आहे. पाहूयात आजचे हवामान
और पढो »
ऑगस्टमध्ये पावसाचा जोर ओसरणार; 'या' तारखेनंतर पुन्हा गडागडाटासह पाऊस परतणार!Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने दडी मारली आहे. जुलैमध्ये पावसाने हाहाकार माजवल्यानंतर आता पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे.
और पढो »
मुंबईत आज पावसाची शक्यता नाहीच; ठाणे, पालघरला यलो अलर्ट, कसं असेल राज्याचे आजचे हवामान?Maharashtra Weather Update: राज्यात ऑगस्टमध्ये पावसाने यंदा ओढ दिली आहे. मात्र, ऑगस्टअखेर पाऊस पुन्हा परतणार आहे.
और पढो »
Pune Rain : पुण्यात तुफान पाऊस; भिडे पूल पाण्याखाली गेलाPune Rain Update: पुण्यात जोरदार पाऊस पडत आहे. पुण्यात धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने भिडे पूल पाण्याखाली गेला आहे.
और पढो »
पुढचे 4 दिवस महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, 'या' जिल्ह्यात अलर्ट जाहीर, मुंबईचं हवामान कसं?Weather Update : IMD च्या म्हणण्यानुसार, पुढील काही दिवसांत महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरातच्या काही भागांमध्ये खूप मुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
और पढो »