माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची महत्वकांक्षी एक राज्य एक गणवेश योजना फसल्याने आता या योजनेत बदल करण्यात आला आहे.
माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची महत्वकांक्षी ' एक राज्य एक गणवेश ' योजना फसल्याने आता या योजनेत बदल करण्यात आला आहे.राज्यात ' एक राज्य एक गणवेश ' योजना सुरू करण्यात आली असली तरी सुसूत्रतेअभावी ही योजना फसली असल्याच समजत आहे. त्यामुळे राज्य सरकारने आता यासंदर्भात महत्त्वाचे पाऊल उचलले असून यापुढे मोफत गणवेश योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीकडे देण्यात येणार आहे.
थेट लाभार्थी योजनेअंतर्गत शाळा समितीकडे निधी दिला जाणार असून यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्र सुरू होताच योग्य मापाचे गणवेश मिळणार आहेत. शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे राज्यातील 45 लाख विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे.राज्यात 'एक राज्य एक गणवेश' योजनेची अंमलबजावणी 2024-2025 पासून सुरू झाली. शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इयत्ता पहिली ते आठवीतील सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन मोफत गणवेश पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मात्र, गणवेश तयार करण्याची जबाबदारी महिला बचत गटांकडे देण्यात आली आहे. अर्धे सत्र संपल्यावरही अनेकांना गणवेश मिळाले नाहीत. काहींना मापापेक्षा मोठे गणवेश मिळाले. त्यामुळे सरकारने या योजनेमध्ये महत्त्वपूर्ण बदल केला आहे. आता विद्यार्थ्यांना वेळेवर आणि नियमित गणवेशाचा पुरवठा व्हावा म्हणून थेट शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यात पैसे पाठवण्यात येणार आहेत.• वेट लाभार्थी योजनेअंतर्गत शाळा व्यवस्थापन समितीला निधीचे वाटप करण्यात येणार आहे.
One Uniform' Scheme महाराष्ट्र शाळा शाळा मोठा निर्णय सरकारी शाळा शालेय गणवेश एक राज्य एक गणवेश
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकात मोठे बदल, वाचा नवीन TimeTableMumbai Local Train TimeTable: मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
और पढो »
दिल्ली दरबारी नेमकं काय घडलं, कोणाच्या पारड्यात काय पडलं? अमित शाहंसोबतच्या बैठकीतील 5 मोठ्या गोष्टी समोरMaharashtra Assembly Election : या पाच गोष्टी, ते दोन फोटो आणि मुख्यमंत्रिपद... रात्री उशिरा घडलेल्या बैठकीनंतर महाराष्ट्रात राजकीय खलबतं; आताच्या क्षणाची मोठी बातमी
और पढो »
MHADA Lottery लांबणीवर; रिक्त घरांच्या विक्रीसाठी आखला नवा आराखडा, तुम्ही ठरणार का लाभार्थी?MHADA Lottery Latest Update : म्हाडाच्या घरांसाठीचे इच्छुक ते घरांचे लाभार्थी हा प्रवास सर करण्यासाठी तुम्हीही प्रयत्न करत आहात? पाहा म्हाडा सोडतीसंदर्भातील मोठी बातमी.
और पढो »
Mahayuti Oath Ceremony: महायुतीच्या शपथविधीबाबत सर्वात मोठी बातमी! फक्त तीन जण घेणार शपथMahayuti Oath Ceremony: महायुतीच्या शपथविधीबाबत सर्वात मोठी बातमी! फक्त तीन जण घेणार शपथ
और पढो »
मोठी बातमी! 'एक देश एक निवडणूक' विधेयकाला अखेर मोदी कॅबिनेटची मंजुरीएक देश, एक निवडणूक विधेयकाला गुरुवारी मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. सरकार आता हे विधेयक संसदेत सादर करेल. सध्या हिवाळी अधिवेशन सुरु असून पुढच्या आठवड्यात हे विधेयक संसदेत मांडलं जाण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे.
और पढो »
मुंबईकरांनो लक्ष द्या! 'हा' महत्त्वाचा मार्ग सहा महिन्यांसाठी वाहतुकीसाठी बंद, असे आहेत पर्यायी मार्गMumbai News Today: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. एक मार्ग सहा महिन्यांसाठी बंद करण्यात येणार आहे.
और पढो »