Vasai Murder Video: प्रियकराने प्रेयशीची भररस्त्यात निर्घृणपणे हत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
वसईत दिवसा-ढवळ्या एका तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली. ब्रेकअप केल्याच्या रागातून प्रियकराने तरुणीवर लोखंडी पान्याने वारंवार वार केले. या घटनेत तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. वसई पूर्व येथील चिंचपाडा परिसरात मंगळवारी सकाळी साडे आठच्या सुमारास ही घटना घडली आहे. मुंबई नजीकच्या शहरात अशा प्रकारची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे तरुण तिच्यावर वार करत असताना नागरिक हे दृश्य पाहूनही काहीच न घडल्यासारखे पुढे जात होते. कोणीच आरोपीला थांबवले नाही.
दोन वर्षांचे नाते तुटले, दोघांचे ब्रेकअप झाले याच रागात आरोपी होता. गेल्या काही वर्षांपासून ते शेजारी शेजारी राहत होते. गेल्या एक महिन्यांपासून त्यांच्यात वाद-विवाद होते. त्यामुळं त्यांचे ब्रेकअप झाले. पण आरोपीला संशय होता की तरुणीचे दुसऱ्या कोणासोबत प्रेमसंबंध होते. त्याच रागातून आरोपीने तिच्यावर इंडस्ट्रीअल पान्याने वार केले. आरोपीने तिच्यावर तब्बल 15-16 वार केले. या हल्ल्यात तरुणीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचे सीसीटीव्ही व्हिडिओदेखील समोर आले आहेत.
सीसीटिव्ही फुटेजमध्ये, पीडीत तरुणी रस्त्यावरुन जात असताना आरोपी मागून येतो आणि तिच्या डोक्यात वार करतो. त्यानंतर ती खाली कोसळल्यानंतर तो आणखी तीव्रतेने तिच्यावर वार करतो. तो वार करत असताना सुरुवातीला एक गृहस्थ त्याला अडवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, तो त्यांनाही न जुमानता तिच्यावर वार करणे सुरूच ठेवतो. मात्र हा प्रकार पाहून आजूबाजूला जमलेले लोक फक्त घडलेला प्रकार बघत असतात. तर, काही नागरिक लोक ये-जा करताना दिसत आहेत.
Vasai Murder Video वसई मर्डर केस Vasai Crime Vasai Murder CCTV Footage महाराष्ट्र मुंबई Murder Murder In Vasai Boyfriend Stabs Girlfriend To Death Boyfriend Stabs Girlfriend Iron Spanner Bystanders Film Incident Of Murder In Vasai Murder News Vasai News Marathi News मर्डर वसईत खून बॉयफ्रेंडने वार केला गर्लफ्रेंडचा मृत्यू बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंड वर लोखंडी पान्याने केले वर लोकांनी वसईत खूनाची घटना केली कॅमेऱ्यात कैद खून बातम्या वसई बातम्या मराठी बातम्या
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
पावसाळी सुट्टीसाठी माथेरानचा बेत आखताय? ही माहिती वाचून होऊ शकतो हिरमोडMatheran news : माथेरान आणि जवळपासच्या भागांमध्ये असणां निसर्गसौंदर्य, शहरीकरणापासून दूर असणारी अनेक ठिकाणं आणि पावसाळ्यामध्ये बहरणारं इथलं सौंदर्य कायमच सर्व वयोगटातील प्रेक्षकांना अकर्षित करत असतं.
और पढो »
पंतप्रधानपदी विराजमान होताच मोदींचा पहिला मोठा निर्णय; शेतकऱ्यांना थेट फायदाPM Modi First Decision : देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर मोदी नेमका कोणता निर्णय घेणार याचीच उत्सुकता अनेकांना लागून राहिली होती; आणि अखेर पंतप्रधान मोदींनी मोठा निर्णय घेतलाच...
और पढो »
Alka Yagnik यांच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, 'मला आवाज...'अलका याग्निक यांना व्हायरल अटॅकच्या त्रास झालाय. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्याला चाहत्यांना आणि सहकलाकारांना मोठ्या आवाजापासून दूर राहण्याचा सल्ला दिलाय.
और पढो »
'शेअर बाजारात 30 लाख कोटींचा तोटा पण एकीलाच 521 कोटी नफा'; अमित शाहांच्या अडचणी वाढणार?Manipulation Of Stock Market: भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवणाऱ्या सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबी च्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन लोकसभा निकालाच्या आधी आणि नंतरच्या परिस्थितीवरुन भाष्य करत गंभीर आरोप केले आहेत.
और पढो »
मोदींना भाजपामधूनच विरोध? राऊतांचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'BJP च्या बैठकीत..'Sanjay Raut Claim About Modi: पत्रकारांनी नरेंद्र मोदी आणि संरसंघचालक मोहन भागवत यांच्यासंदर्भात प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी भाजपाचा उल्लेख करत खळबळजनक दावा केला.
और पढो »
Yami Gautam आणि आदित्य धरच्या घरी राजकुमारचे आगमन; मुलाचं नाव सांगते म्हणाले...Yami Gautam gave birth to baby boy : यामीचा नवरा आणि लोकप्रिय दिग्दर्शक आदित्य धरनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याची माहिती दिली आहे.
और पढो »