Vikrant Massey Announces Retirement: विक्रांत मेस्सी याने अभिनय क्षेत्रातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने पोस्ट करत हा निर्णय जाहिर केला आहे.
बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सी यांने एक मोठी घोषणा केली आहे. विक्रांतने इन्स्टाग्राम पोस्ट करत तो अभिनय क्षेत्रातून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले आहे. त्याच्या या निर्णयाने असंख्य चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. कारकिर्दीच्या शिखरावर असताना विक्रांतने हा निर्णय घेतल्याने त्याच्या चाहत्यांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 1 डिसेंबर रोजी त्याने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
विक्रांत मेस्सी याने आत्तापर्यंत अनेक उत्तम कलाकृतींमध्ये भूमिका साकारल्या आहेत. अनेक चित्रपटातील त्याच्या भूमिकांसाठी त्याचे कौतुकही करण्यात आले होते. 1 डिसेंबर रोजी विक्रांतने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे की, नमस्कार, गेले काही वर्ष आणि येणारे वर्ष खूप चांगले जाणार आहेत. तुम्ही दिलेल्या पाठिंब्यासाठी मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. मात्र, मी जसा जसा पुढे जातोय तशी मला जाणीव होतेय की आता रिकेलिब्रेट करण्याचा आणि घरी जाण्याची वेळ आली आहे.
येणाऱ्या 2025 या वर्षात आपण शेवटचे एकमेकांना भेटणार आहोत. जोपर्यंत योग्य वेळ येत नाही. मागील दोन चित्रपट आणि अनेक वर्षांच्या आठवणींसाठी पुन्हा एकदा धन्यवाद. या दरम्यान प्रत्येक गोष्टीसाठी मी सदैव ऋणी आहे, असं विक्रांतने म्हटलं आहे.अलीकडेच विक्रांतने द साबरमती रिपोर्टच्या प्रमोशनदरम्यान त्याला सतावणाऱ्या चिंतेबद्दल जाहीरपणे बोलला होता. त्याचा 9 महिन्याचा मुलगा वर्धनच्या सुरक्षेसंदर्भात त्याने चिंता व्यक्त केली होती. साबरमती रिपोर्ट हा 2002च्या गोध्रा ट्रेन अग्निकांडवर आधारित आहे.
विक्रांतने म्हटलं होतं की, मला धमक्या दिल्या जात आहेत. सोशल मीडियावरुनही मला धमक्या येत आहे. या लोकांना माहितीये की मी 9 महिन्यांपूर्वीच वडील झालो आहे. माझ्या मुलाला अजून चालताही येत नाही त्याचे नाव यासगळ्यात घेण्यात येत आहे. त्याच्या सुरक्षेसाठी मला चिंता वाटत आहे. आपण कोणत्या समाजात वावरत आहोत? भीती वाटत नाही तर वाईट वाटतंय, असं विक्रांत मेस्सी याने म्हटलं होतं.महाराष्ट्र
Vikrant Massey Vikrant Massey Announces Retirement Vikrant Massey Retires From Acting Vikrant Massey Latest Instagram Post Vikrant Massey Latest News Vikrant Massey Upcoming Movies Vikrant Massey Movies Vikrant Massey Son Photos Vikrant Massey Wife Photos Vikrant Massey Networth Vikrant Massey Age
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
नागपूरमध्ये राऊतांच्या कारला अपघात! रात्री प्रचारावरुन परतताना ट्रकने दिली धडकMaharashtra Assembly Election: राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी नेत्यांकडून झाडल्या जात असतानाच नागपूरमधून मोठी बातमी समोर आली आहे. ही सारी घडामोड बुधवार रात्रीची आहे.
और पढो »
'पुढचा CM ठरलाय, हायकमांडने...'; बोलता बोलता आठवलेंनी नावच सांगून टाकलं! शिंदेंबद्दलही गौप्यस्फोटWho Will Be Next CM Ramdas Athawale Revealed Name: निवडणुकीच्या निकालाला 72 तास उलटून गेल्यानंतरही मुख्यमंत्री कोण यासंदर्भात संभ्रम कायम असतानाच आठवलेंनी थेट भाजपा पक्षश्रेष्ठींचा उल्लेख करत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
और पढो »
मोठी बातमी! 'BJP आमदारां'ची संख्या 132 वरुन 137 वर... फडणवीसांसाठी लवकरच Good News?Maharashtra Assembly Election 2024: राज्याच्या राजकारणामध्ये सध्या वेगवान घडामोडी घडत असतानाच ही बातमी समोर आली असून यामुळे फडणवीसांचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग अधिक सुखकर होणार आहे.
और पढो »
भाजपाचं धक्कातंत्र! राज्यातील 40 नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; पाहा निलंबित नेत्यांची संपूर्ण यादीMaharashtra Assembly Election: विधानसभेच्या निवडणुकीमधील मतदानाला दोन आठवड्यांचा कालावधी शिल्लक असतानाच भारतीय जनता पार्टीने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला असून या निर्णयाची माहिती त्यांनी एका पत्रकातून दिली आहे.
और पढो »
'टीम इंडियाचा सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे गौतम गंभीर, तो फार...'; Ex कॅप्टन स्पष्टच बोललाBorder Gavaskar Trophy 2024: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान सुरु होणारी आगामी कसोटी मालिका भारतासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असतानाच आता हे विधान समोर आल्याने भारताचं टेन्शन वाढलं आहे.
और पढो »
'शिंदे फडणवीसांना CM करण्यासाठी तयार नसले तर आमच्याकडे...'; आठवलेंचा थेट इशाराRamdas Athawale Warning Meaning To Eknath Shinde Party: मुख्यमंत्री पदावरुन चर्चा आणि शक्यतांबद्दल बोललं जात असतानाच आठवलेंनी फडणवीसांचा उल्लेख करत शिंदेंच्या शिवसेनाला सूचक इशारा दिला आहे.
और पढो »