Loksabha Election : भाजपच्या जाहीरनाम्यावर टीका करताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना रशियाचे राष्ट्राध्यक्ष वाल्दिमीर पुतीन यांच्याशी केली आहे. मोदी लोकशाही उध्वस्त करून हुकूमशाहीकडे जात आहेत, अशीही टीका शरद पवारांनी यावेळी केली.
भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भाजप मुख्यालयात या जाहीरनाम्याचे अनावरण करण्यात आलं. भाजपने आपल्या जाहीरनाम्यात वन नेशन वन इलेक्शन, लोकसंख्या नियंत्रण आणि समान नागरिकत्व संहिता कायद्यांना प्राधान्य दिले आहे. मात्र या जाहीरनाम्यावरुन आता शरद पवारांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे.
धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानिमित्त शरद पवार हे अकलूजमध्ये होते. माढा लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील अशी लढत होणार आहे. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवारांनी, पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांच्यात काहीच फरक नाही अशी टीका केली.
"पंतप्रधान हे त्यांच्या पदाची अप्रतिष्ठा करत आहे. आपला कार्यक्रम सांगण्या ऐवजी नेहरुंवर टीका करत आहेत. त्यांचा भाषण ऐकलं ते म्हणतात की विरोधी पक्षाचा एकही उमेदवार निवडून देऊ नका. ही लोकशाहीमध्ये सत्ताधाऱ्यांप्रमाणे विरोधी पक्ष असावा लागतो. यामुळे रशियाचा पुतीन आणि भारताचा नरेंद्र यांच्यात फरक वाटत नाही," असं शरद पवार म्हणाले. 'भाजपने जाहीरनाम्यात काय आश्वासन दिले यावर भाष्य करणे आता योग्य नाही. नुसते आश्वासने देणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.
"भाजपने आश्वासन काय दिले याबद्दल भाष्य न करणे योग्य होईल. अनेक प्रश्नांचे आश्वासन दिले आणि ते पूर्ण केले नाही. पाठीमागील जाहीरनाम्यातील आश्वासन अपूर्ण आहेत. त्यावर सविस्तर बोलू. आमच्या एकत्रित होण्याचा संदेश एका मतदारसंघ पुरता नाही तो सगळ्या राज्यात जातो. महाराष्ट्राचे चित्र बदलत आहे. मागील निवडणुकीत आम्हाला कमी जागा मिळाल्या होत्या. पण यंदा चित्र वेगळं असेल," असे शरद पवरांनी स्पष्ट केलं.आर्थिकस्थिती हालाखीची असलेल्या पालकांना हेरायचे अन् मुलांना..
PM Modi PUTIN Sharad Pawar Russia Marathi News
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
चिराग पासवान को बिहार का मुख्यमंत्री बनाएंगे मांझी, पूर्व सीएम के बयान से NDA में मचेगा बवालतनराम मांझी ने कहा कि यह चुनाव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का चुनाव है.
और पढो »
'आपका सपना ही मोदी का संकल्प है', MP के होशंगाबाद में बोले प्रधानमंत्री नरेंद्र मोदीPM Modi Hoshangabad Rally: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी रविवार को मध्य प्रदेश के होशंगाबाद पहुंचे. जहां पिपरिया में एक जनसभा को संबोधित करते हुए उन्होंने कहा कि आपका सपना ही मोदी का सपना है.
और पढो »
भीम UPI, पंच तीर्थ और आदिवासी राष्ट्रपति...अंबेडकर जयंती पर MP की धरती से दलित वोट साध गए PM मोदी!प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने होशंगाबाद, मध्य प्रदेश की रैली में उपस्थित लोगों की सराहना की और डॉ.
और पढो »
MI vs CSK सामन्यात आकडेवारी मुंबईच्या बाजूने पण...; पाहा कशी असेल संभाव्य Playing 11IPL 2024 MI vs CSK Head to Head Records: मुंबई इंडियन्सचा संघ आज घरच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्जच्या संघाविरुद्ध खेळणार आहे. मुंबईच्या संघ 5 पैकी 3 सामने गमावून पॉइण्ट्स टेबलमध्ये टॉप पाच संघांमध्येही नाही.
और पढो »
Satara LokSabha : साताऱ्यात उदयनराजे वेटिंगवर... कॉलर उडवली खरी पण महायुतीचा तिढा कायम?Udayanraje On waiting in Satara : साताऱ्यात मविआकडून शशिकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र महायुतीचा घोळ संपता संपत नाही. सातारचा तिढा कसा सुटतो? ते पहावं लागणार आहे.
और पढो »
Lok Sabha Elections : गृहमंत्री अमित शाह का छत्तीसगढ़ दौरा आज, खैरागढ़ में करेंगे सभा; भूपेश को देंगे चुनौतीपीएम नरेंद्र मोदी और रक्षामंत्री राजनाथ सिंह की जनसभाओं के बाद अब रविवार 14 अप्रैल को केंद्रीय गृहमंत्री अमित शाह छत्तीसगढ़ के राजनांदगांव लोकसभा क्षेत्र के खैरागढ़ जिले में प्रवास पर रहेंगे।
और पढो »