Devendra Fadnavis on Anil Deshmukh: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावरील हल्ल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शंका व्यक्त केली आहे.
Devendra Fadnavis on Anil Deshmukh: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील हल्ल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी शंका व्यक्त केली आहे. आपला मुलगा निवडणुकीत पराभूत होत असल्याचं दिसत असल्याने ही स्टोरी तयार करत भाजपाला बदनाम केल्याचं दिसत आहे असा आरोपही त्यांनी केला आहे.
"अनिल देशमुख यांनी हिंदी चित्रपटातील सलीम-जावेद यांच्याप्रमाणे स्टोरी सुरु केल्या आहेत. आता असाच हल्ला ते दाखवत आहेत. मी पोलिसांची पत्रकार परिषद पाहिली, त्यातून तेथील चित्र स्पष्ट झालं आहे. 10 किलोचा दगड मारल्यावर विंडशिल्ड फुटली का नाही? 10 किलोचा दगड पडल्यावर बोनेटला साधा ओरखडा का आला नाही?," असे प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारले आहेत.
पुढे ते म्हणाले,"एकच दगड आत आला आहे. मागील काच फोडून तो आत आला आहे. मागून दगड मारला असेल तर मागे लागला पाहिजे, तो पुढे कसा लागला? रजनीकांतच्या चित्रपटातच असा दगड लागू शकतो. मागून फेतला आणि फिरुन पुढे येऊन डोक्याला लागला. जखम तर दिसत नव्हती. हे जे सगळं समोर आलं आहे. यातून हा सिनेमा तयार करण्यात आला हे दिसत आहे. आपला मुलगा निवडणुकीत पराभूत होत असल्याचं दिसत असल्याने ही स्टोरी तयार करत भाजपाला बदनामा केल्याचं दिसत आहे.
दरम्यान विरारमध्ये आज भाजपा आणि बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. बविआच्या कार्यकर्त्यांनी भाजपा नेते विनोद तावडे यांना तब्बल 4 तास घेरलं होतं. यावेळी हितेंद्र ठाकूर आणि क्षितीज ठाकूरही तिथे उपस्थित होते. विनोद तावडे 5 कोटी रुपये वाटण्यासाठी आले होते असा आरोप हितेंद्र ठाकूर यांनी केला. या संपूर्ण घटनेवर देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे.
"जेव्हा निवडणुकीत पराभव दिसू लागतो त्यावेळी जे प्रकार होतात त्यातीलच हा प्रकार आहे. विनोद तावडे आमचे राष्ट्रीय महामंत्री आहेत. ते तिथे केवळ कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी गेले होते. कोणताही पैसा किंवा आक्षेपार्ह गोष्टी त्यांच्याजवळ सापडलेल्या नाहीत. उलट त्यांच्यावरच हल्ला झाला आहे. तसंच आमचे नालासोपाऱ्याचे उमेदवार राजन नाईक यांच्यावरही हल्ला झाला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची जी इको सिस्टम आहे त्यांनी जो उद्या दिसणारा पराभव आहे तो कव्हर करण्यासाठी केलेलं हे कव्हर फायरिंग आहे.
Election Commisson Maharashtra Assembly Election Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
अनिल देशमुखांवर हल्ला, भाजपचा नेता म्हणतो 'ही स्टंटबाजी'Bjp Reaction On Anil Deshmukh Attack:माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक झाली आहे. या घटनेत अनिल देशमुख जखमी झाल्याचे व्हिडीओत दिसत आहे.
और पढो »
अभी-अभी महाराष्ट्र के इस बड़े नेता पर हुआ जानलेवा हमला, सिर पर आई गंभीर चोटमहाराष्ट्र के पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख पर जानलेवा हमला, कार पर हुआ पथराव, आगे बैठे देशमुख को सिर पर गंभीर चोट आई.
और पढो »
'डायरी ऑफ ए होम मिनिस्टर' से गरमाई महाराष्ट्र की सियासत... अनिल देशमुख ने अपनी किताब में फडणवीस पर लगाए गंभीर आरोपमहाराष्ट्र के पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख ने अपनी किताब में मुख्य रूप से चार आरोप लगाए हैं.
और पढो »
'आम्हाला घाबरवून...', अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाल्यानंतर सुप्रिया सुळेंकडून पहिली प्रतिक्रियाशरद पवारांच्या राष्ट्रवादी गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाल्यानतंर सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे.
और पढो »
महाराष्ट्र के पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख पर हमला, कार पर पत्थरबाजी में हुए जख्मीहमले में अनिल देशमुख गंभीर रूप से घायल हो गए. उन्हें इलाज के लिए काटोल अस्पताल ले जाया गया है.
और पढो »
Anil Deshmukh: महाराष्ट्र के पूर्व मंत्री अनिल देशमुख की कार पर पथराव, सिर पर लगी चोट के बाद अस्पताल में भर्तीमहाराष्ट्र के पूर्व मंत्री अनिल देशमुख उनकी कार पर पथराव के बाद घायल हो गए। राकांपा (शरद पवार) नेता की कार काटोल शहर से गुजर रही थी जब उन पर हमला हुआ।
और पढो »