Deepak Kesarkar on Chhatrapati Shivaji Maharaj Statue: मालवणमधील राजकोट किल्ल्यावर (Rajkot Fort) उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा (Chhatrapati Shivaji Maharaj Statue) कोसळल्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरु असताना दीपक केसरकर यांनी एक आक्षेपार्ह विधान केलं आहे.
Deepak Kesarkar on Chhatrapati Shivaji Maharaj Statue: मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरु असताना दीपक केसरकर यांनी एक आक्षेपार्ह विधान केलं आहे.मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरु असताना दीपक केसरकर यांनी एक अजब विधान केलं आहे. वाईटातून चांगल घडायचं असेल म्हणून अपघात झाला असावा असं दीपक केसरकर म्हणाले आहेत.
शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर राज ठाकरेंचं 'ते' जुनं विधान पुन्हा चर्चेत, म्हणाले होते 'समुद्रात महाराजांचा...'"नौदलाने उभारलेला पुतळा अपघातग्रस्त झाला याचं दुःख आहे. अरबी समुद्रातील पुतळा उभारणीचं काम काही तांत्रिक गोष्टींमुळे थांबलं, त्यामुळे इथे हा पुतळा उभारला गेला. नौदलाला विश्वासात घेऊन पुन्हा या ठिकाणी स्मारक उभारलं गेलं तर ते चांगलं असेल. याबाबत मुंबईला गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करेन. या ठिकाणी आता 100 फुटी पुतळा असावा," असंही केसरकर म्हणाले आहेत.
आता 100 फुटी पुतळा उभारला तर ते यथायोग्य स्मारक ठरेल. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला जशा व्यवस्था आहेत तशी येथेही झाल्यास चांगलं होईल. बोलणारे काम करत नाहीत आणि काम करणारे बोलत नाहीत. 100 फुटी पुतळा उभा राहिल्यास पंतप्रधानांना पुन्हा बोलावता येईल. तो राष्ट्राचा सन्मान असेल असंही ते म्हणाले आहेत. पुढे ते म्हणाले,"स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या धर्तीवर हा पुतळा पुन्हा महाराष्ट्र शासन उभा करू शकतो. भव्य असं स्मारक उभारताना परिसराचा विकास करू. हा अपघात आहे. वाईटातून चांगलं घडायचं असेल म्हणून हा अपघात झाला असेल. संपूर्ण परिसराचा विकास करणे आणि पुतळा उभा करणे ही खरी आदरांजली असेल"."झालेली घटना योग्य नाही, छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. तो पुतळा उभारला तेव्हा त्या कार्यक्रमाला आम्हीसुद्धा होतो.
पुढे ते म्हणाले की,"मी जिल्हाधिकाऱ्यांशी यासंदर्भात बोललो. त्यांनी मला सांगितलं की, ताशी 45 किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहत होता. यामुळे पुतळ्याचं नुकसान झालं आहे. उद्या तिथे नौदलाचे अधिकारी येणार आहेत. पालकमंत्री रवींद्र चव्हाण घटनास्थळी जात आहेत. नौदलाचे अधिकारी आणि आमचे काही अधिकारी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिमाखात उभा राहील यासाठी उद्या पाहणी करू. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्यदैवत असून हा पुतळा आम्ही तात्काळ उभारू".
Chhatrapati Shivaji Maharaj Chhatrapati Shivaji Maharaj Statue Rajkot Fort Malvan
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'3 वर्षांचं काम 6 महिन्यात केलं'; शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर मूर्तीकाराची मुलाखत व्हायरलShivaji Maharaj Statue Collapses Sculpture Artist Interview: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मागील वर्षी 4 डिसेंबर रोजी नौदल दिनामित्त या पुतळ्याचं अनावरण झालं होतं. अवघ्या आठ महिन्यांमध्ये हा पुतळा कोसळल्यानंतर मूर्तीकाराची मुलाखत व्हायरल झाली आहे.
और पढो »
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळला, डिसेंबर 2023 मध्ये झालं होतं अनावरणSindhudurga : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा कोसळला आहे. हा पुतळा नेमका कशामुळे कोसळला हे मात्र स्पष्ट झालेलं नाही.
और पढो »
शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर राज ठाकरेंचं 'ते' जुनं विधान पुन्हा चर्चेत, म्हणाले होते 'समुद्रात महाराजांचा...'मालवणमधील राजकोट किल्ल्यावर (Rajkot Fort) उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा (Chhatrapati Shivaji Maharaj Statue) कोसळल्याने राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. यादरम्यान राज ठाकरेंनी केलेलं एक जुनं विधान पुन्हा चर्चेत आलं आहे.
और पढो »
मध्यरात्र उलटल्यावर शहरातील पाच पुतळे... शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर राज ठाकरे यांची पोस्ट चर्चेतकिल्ले सिंधुदुर्गावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलाय... त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
और पढो »
महाराष्ट्रात रिव्हर राफ्टिंगचा थरार! थ्रील अनुभवायचा असाल तर कोकणातील या पर्यटनस्थळाला नक्की भेट द्या...महाराष्ट्रात रिव्हर राफ्टिंगचा थरार अनुभवायचा असेल तर कोलाडला नक्की भेट द्या.
और पढो »
रत्नागिरितील देउडमधील कातळशिल्प अखेर संरक्षित स्मारक; या कातळशिल्पात नेमकी कसली चित्रGeoglyphs In Konkan: रत्नागिरीतील देऊडमध्ये सापडलेली कातळशिल्प अखेर संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
और पढो »