इरफान पठाणने (Irfan Pathan) आता भारतीय क्रिकेटने हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) भूतकाळात दिलं तितकं महत्व देण्याची गरज नसल्याचं स्पष्ट मत मांडलं आहे.
इरफान पठाणने आता भारतीय क्रिकेटने हार्दिक पांड्याला भूतकाळात दिलं तितकं महत्व देण्याची गरज नसल्याचं स्पष्ट मत मांडलं आहे.भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू इरफान पठाणने अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यावर जोरदार टीका केली आहे. बीसीसीआयने मागील काही वर्षात दिली त्याप्रमाणे त्याला वागणूक देणं बंद केलं पाहिजे असं इरफान पठाण म्हणाला आहे. आपलं मत परखडपणे मांडणाऱ्या इरफान पठाणने हार्दिकने गेल्या काही वर्षात भारतीय संघासाठी फार चांगली कामगिरी केली नसल्याकडे लक्ष वेधलं.
हार्दिक पांड्या भारतीय संघाकडून 2023 वर्ल्डकपमध्ये अखेरचा खेळला आहे. बांगलादेशविरोधातील सामन्यात घोट्याला दुखापत झाल्याने तो वर्ल्डकपमधून बाहेर पडला होता. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेतही तो खेळू शकला नव्हता. आपण जानेवारी महिन्यात फिट झालो होतो, पण खेळण्यासाठी संधी नव्हती असं नंतर त्याने म्हटलं होतं. अखेर मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून तो आयपीएलमध्ये खेळत आहे.
इरफान पठाणने परखड शब्दांत मत मांडताना बोर्डाने हार्दिक पांड्याचा प्रभाव अगदी कमी आहे याचा विचार करणं गरजेचं असल्याचं सांगितलं आहे."मला असं वाटतं की, भारतीय क्रिकेटने आता स्पष्ट केलं पाहिजे की हार्दिक पांड्याला आतापर्यंत दिली तितकी प्राथमिकता देण्याची गरज नाही. आणि जर तुम्हाला आपण प्राथमिक अष्टपैलू खेळाडू आहोत असं वाटत असेल तर तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर तसा प्रभाव निर्माण करायला हवा. अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर अपेक्षित कामगिरी केलेली नाही.
"सर्वात प्रथम म्हणजे त्याने संपूर्ण वर्ष खेळायला हवं. तो स्वत: निवडू शकत नाही. भारतीय क्रिकेटने हे करणं बंद केलं पाहिजे. एखाद्या खेळाडूला प्राथमिकता देणं थांबवा, अन्यथा तुम्ही मोठ्या स्पर्धा जिंकू शकणार नाही. ऑस्ट्रेलिया गेल्या अनेक वर्षांपासून टीम गेमवर लक्ष केंद्रीत करत आहे. ते प्रत्येकाला सुपरस्टार बनवत आहेत. एक नव्हे तर प्रत्येकजण सुपरस्टार आहे. जर तुम्ही तसं केलं नाही तर मोठ्या स्पर्धा जिंकणार नाही," असं पठाण म्हणाला आहे.Ricky Ponting: 2003 वर्ल्डकपवेळी माझ्या बॅटमध्ये स्प्रिंग...
Irfan Pathan IPL Hardik Pandya Ipl Hardik Pandya News Hardik Pandya Irfan Pathan
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीतून माघार घेऊनही नाशिकमध्ये भुजबळांची नवी खेळी? पाहा का उडालीय खळबळ...Loksabha Election 2024 Nashik : दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु असतानाच नाशिकमधून आली राजच्याच्या राजकारणाती मोठी बातमी. छगन भुजबळ यांची खेळी की आणखी काय?
और पढो »
IPL 2024 : मुंबई इंडियन्समध्ये 'नाराजीनाट्य', पांड्याच्या कॅप्टन्सीवर आरोप? संघातील बड्या खेळाडूची खळबळजनक पोस्टMohammad Nabi Instagram story : हार्दिक पांड्याच्या कॅप्टन्सीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना आता मुंबईच्या (Mumbai Indians) स्टार गोलंदाजाने केलेल्या इन्टाग्राम पोस्टमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
और पढो »
दोन देशात MDH आणि Everestच्या मसाल्यांवर बंदी; आता केंद्र सरकारने उचलले मोठे पाऊलMDH Masala Ban: दोन देशांनी भारतीय कंपन्यांच्या मसाल्यांवर बंदी घातल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता केंद्र सरकारनेही मोठी पावलं उचलली आहे.
और पढो »
DC vs MI: 'सुपरस्टार ट्रीटमेंट देना बंद करे...' हार्दिक पांड्या पर भड़के पूर्व भारतीय क्रिकेटर, दे डाली BCCI को सलाहभारत के पूर्व हरफनमौला खिलाड़ी इरफान पठान ने BCCI भारतीय क्रिकेट बोर्ड से हार्दिक पांड्या को सुपरस्टार ट्रीटमेंट देना बंद करने और उनके साथ किसी अन्य क्रिकेटर की तरह व्यवहार करने का आग्रह किया है। पूर्व क्रिकेटर और वर्तमान कमेंटेटर इरफान पठान ने बीसीसीआई द्वारा राष्ट्रीय टीम सेटअप में एमआई कप्तान हार्दिक पांड्या को प्राथमिकता देने पर सवाल उठाया...
और पढो »
बारामतीकरांना पाणी पुरवणाऱ्या दोन्ही धरणातील पाणी बंद; असं अचानक झालं तरी काय?बारामती विरुद्ध भोर असा नवा वाद होण्याची शक्यता आहे. धरणाच्या पाण्यावरुन वाद पेटला आहे.
और पढो »