Ram Mandir : रामलल्ला दलदलीत? अयोध्येतील राम मंदिरात पावसानंतर नेमकी काय परिस्थिती? पुजाऱ्यांच्या दाव्यामुळं खरं चित्र समोर
अयोध्येतील राम मंदिर ाची उभारणी आणि मागोमाग थाटामाटात झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर सर्वसामान्य भाविकांसाठी मंदिरात दर्शनाची सुरुवात झाली. दर दिवशी मोठ्या संख्येनं भाविकांची गर्दी या मंदिर परिसरात पाहायला मिळाली. राम मंदिर ामुळं अयोध्या नगरीसुद्धा फुलून निघाली. इथं पर्यटनाला वेग मिळाला आणि रातोरात चित्र बदलण्यास सुरुवात झाली. ही झाली नाण्याची एक बाजू. पण, जे राम मंदिर जगभरात चर्चेचा विषय आहे, त्याच राम मंदिर ात पहिल्या पावसानंतर दिसणारं चित्र काहीसं अपेक्षाभंग करणारं आहे.
नाण्याची दुसरी बाजू काहीशी त्रासदायक आहे हेच राम मंदिरातील सद्यस्थितीमुळं लक्षात येत आहे. उत्तर भारतात आतापर्यंत पावसानं हजेरी लावली नव्हती. पण, आता, जेव्हा पाऊस उत्तर भारतामध्ये धडकला आहे, तेव्हाच या पहिल्या पावसानं राम मंदिरालाही चिंब भिजवलं आहे. इतकंच नव्हे, तर या मंदिराच्या छतातून थेट रामलल्लाच्या गाभाऱ्यापर्यंत पाणी पाझरत असल्याचा दावा मंदिरातील मुख्य पुजाऱ्यांनी केला आहे.
Maharashtra Weather News : किनारपट्टीसह पश्चिम घाटात सरीवर सरी; मुंबईत मात्र काळ्या ढगांचा चकवा, पाऊस गेला तरी कुठं? रामलल्लाच्या मूर्तीसमोर जिथं पुजारी बसण्याची जागा आणि व्हीआयपी दर्शनाचं स्थान आहे, तिथंच पावसाचं पाणी छतातून पाझरत असल्यामुळं मंदिरातील अनेक पदाधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. संपूर्ण देशातून निष्णांत अभियांत्रिकी कौशल्य असलेल्यांनी हे मंदिर उभारलं, पण पावसामुळं छतातून पाणीगळती होऊ शकते हे त्यांच्या लक्षात कसं आलं, ही आश्चर्याचीच बाब आहे असं म्हणताना आचार्य सत्येंद्र दास यांनी मंदिर उभारणीमध्ये हलगर्जीपणा केला गेला आहे असाही गंभीर आरोप केला.
भारतातील सर्वाधिक खर्च करून उभारण्यात आलेल्या मंदिरांमध्ये राम मंदिराचा समावेश असून, या मंदिराचा निर्मिती खर्च साधारण 1800 कोटींच्या घरात गेल्याचं म्हटलं जातं. जवळपास 70 एकरांच्या भूखंडावर या मंदिराचा विस्तीर्ण परिसर पसरला असून, त्यापैकी 2.7 एकर भूभागावर मंदिराची मुख्य इमारत उभी असून, त्याची उंची 161 फूट इतकी आहे. सध्या मात्र भव्यतेचं दुसरं रुप असणाऱ्या या मंदिराचं प्रत्यक्ष चित्र मात्र अनेकांचीच चिंता वाढवून जात आहे हे नाकारता येत नाही.
Ram Mandir Ram Mandir Leakage Ram Temple Roof Started Leaking अयोध्या राम मंदिर छत सत्येंद्र दास राम मंदिर गर्भगृह Ayodhya News Ram Temple News Satyendra Das News UP News राम मंदिर Rain Monsoon Marathi News
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
पहिल्याच पावसात मुंबई तुंबली, पुणे बुडालं... जबाबदार कोण?Mumbai-Pune Heavy Rain : पहिल्याच पावसात मुंबई आणि पुण्यात दाणादाण उडाल्याचं पाहायला मिळालं... मुंबईत सखल भागात पाणी साचलं. पुण्यामध्ये तर हाहाकार पाहायला मिळाला.. मुंबई पुण्यामध्ये ही अवस्था का झालीय, यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केलाय.
और पढो »
पृथ्वीची फिरण्याची गती मंदावली! 24 नाही तर 25 तासांचा एक दिवस होणार, एका वर्षात 365 पेक्षा कमी दिवस येणार24 नाही तर 25 तासांचा एक दिवस होणार आहेत. कधी पासून होणार हा बदल जाणून घेऊया.
और पढो »
'मुलाने घराबाहेर काढलं, पण तू स्वप्न पूर्ण केलंस', तरुणाने सुरक्षारक्षकाची अयोध्येला जाण्याची इच्छा केली पूर्ण, VIDEO व्हायरलViral Video: जेव्हा सुरक्षारक्षकाने सोशल मीडिया इन्फ्यूएन्सर भगतला आपलं अयोध्या राम मंदिराला भेट देण्याचं स्वप्न आहे सांगितलं, तेव्हा त्याने लगेच ते पूर्ण करण्याचं ठरवलं.
और पढो »
T20 World Cup 2024: क्रिकेट प्रेमींना जागरण अटळ? पाहा किती वाजता खेळवल्या जाणार USA मधील मॅचेसटीम इंडियासाठी वर्ल्डकपचं मिशन लवकरच सुरु होणार आहे. यावेळी टीम इंडियाचा पहिला सामना आयरलँडविरूद्ध होणार आहे.
और पढो »
महाराष्ट्रातील एकमेव मंदिर जिथं समुद्राच्या लाटा गणपतीच्या मूर्तीला करतात चरणस्पर्श; कोकणातील प्रसिद्ध पर्यटनस्थळकोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात असलेल्या गणपतीपुळे मंदिराला भाविक मोठ्या संख्येने भेट देत असतात.
और पढो »
Pune Porche Accident: अपघातानंतर 'त्याला' मारहाण करणारे नागरिक अडचणीत; मुलाच्या पालकांनी केली मोठी मागणीPune Porche Accident: पुणे पोर्शे अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाला मारहाण करणाऱ्या नागरिकांवर कारवाई होणार?
और पढो »