Kokan Railway: कोकण रेल्वे आता थेट बोरीवलीपर्यंत जोडली जाणार आहे. तशी घोषणाच केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे.
कोकण रेल्वे आता थेट बोरीवलीपर्यंत जोडली जाणार आहे. केंद्रानेही यासाठी मंजुरी दिल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई-नायगाव-जूचंद्र असा नवा बायपास बांधून बोरीवली कोकण रेल्वे मार्गाला जोडण्यात येणार आहे. या कामाला पंतप्रधान मोदी यांच्या निर्देशानुसार मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी कांदिवली येथील मेळाव्यात ही माहिती दिली आहे.
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजप आणि महायुतीचे उमेदवार पियूष गोयल यांनी मेळावा घेतला होता. या मेळाव्यात रेल्वेमंत्री अश्वीनी वैष्णव यांच्याकडे बोरीवली स्थानक कोकण रेल्वेला जोडण्यात यावे. तसंच, गोरेगावचा हार्बर रेल्वेमार्ग बोरीवलीपर्यंत जोडण्यात यावा, अशी मागणी केली होती. त्यावर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या तिन्ही कामांना मंजुरी देण्यात आल्याचे सांगण्यात आले. पंतप्रधान मोदी यांच्या निर्देशानुसार, या तिन्ही कामांना मंजुरी देण्यात आल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, सध्या हार्बर रेल्वे पश्चिम मार्गावर गोरेगावपर्यंतच आहे. या मार्गाचा विस्तार करण्याचा रेल्वेचा मानस आहे. अनेकदा प्रवाशांनीही या हार्बर मार्ग बोरीवलीपर्यंत विस्तार केला जावा, अशी मागणी केली होती. त्यामुळं लवकरच या मार्गाचा विस्तार केला जाणार आहे. त्यामुळं पनवेलवरुन बोरीवलीपर्यंचा प्रवास सोप्पा होणार आहे.कोकणपर्यंत रेल्वे नेण्यात वसई येथे बायपासचा अडथळा आहे. तो दूर करण्यासाठी 176 कोटी मंजूर केले आहेत.
Railway Minister Ashwini Vaishnav Konkan Railway Route With Borivali Borivali To Konkan Railway Mumbai News Today Mumbai News Mumbai Latest News कोकण रेल्वे कोकण रेल्वे बातम्या बोरीवली कोकण रेल्वे अश्विनी वैष्णव Mumbai Local Mumbai Local Train Update Mumbai Local Train Update In Marathi
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
कोकण रेल्वेचा मोठा निर्णय; वाढत्या गर्दीमुळं 'या' स्थानकांदरम्यान धावणार विशेष रेल्वे; तातडीनं पाहा वेळापत्रकKonkan Railway News : दिलासा! प्रवाशांच्या हाकेला धावली कोकण रेल्वे.... आताच पाहा कुठून कुठपर्यंत धावणार या रेल्वेगाड्या....
और पढो »
Indian Railway: आता एकाच ट्रॅकवर धावणार बुलेट, हायस्पीड आणि एक्स्प्रेस, काय आहे रेल्वेची नवीन योजना?Indian Railway News: भारतीय रेल्वेने आता कात टाकली आहे. अनेक स्थानकात बदल करण्यात आले तर दुसरीकडे रेल्वे आता विद्युतवाहिणीवर धावत आहे. त्यातच आता रेल्वे आणखी एक नवीन योजना आखत आहे. यामध्ये भविष्यात रेल्वे, बुलेट ट्रेन आणि हायस्पीड रेल्वे एकाच ट्रॅकवर चालवण्याची योजना आहे.
और पढो »
खोळंबा! मध्य रेल्वेवर पंधरा दिवसांचा ब्लॉक, दादरपर्यंतच येणार गाड्या, पाहा नवं वेळापत्रकMumbai Central Railway News : मध्य रेल्वे सेवा साधारण 15 दिवसांसाठी खोळंबणार असल्याच्या सूचना रेल्वे प्रशासनानं दिल्या असून, रेल्वेच्या वेळापत्रकावर यामुळं परिणाम होताना दिसत आहे.
और पढो »
कोकण रेल्वेमध्ये निघालीय बंपर भरती, 56 हजारपर्यंत पगार; 'या' पत्त्यावर होईल मुलाखत!Konkan Railway Job: चांगले पद आणि पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांची भरती केली जाते. सध्या कोकण रेल्वेमध्ये विविध रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
और पढो »
Maharashtra Weather News : दमट हवामानामुळं कोकण पट्ट्याची होणार घुसमट; 'इथं' मात्र अवकाळीचं संकटMaharashtra Weather News : मुंबईपासून कोकणापर्यंत आणि विदर्भापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत काय आहे हवामानाची स्थिती? पाहा सविस्तर वृत्त...
और पढो »
Maharashtra Weather News : सूर्य आग ओकणार; तापमान 44 अंशांच्या पलिकडे जाणार; राज्यातील 'या' भागांना सर्वाधिक फटकाMaharashtra Weather News : महाराष्ट्रातील हवामानात सध्या सातत्यानं बदल होत असले तरीही राज्यातील उकाडा मात्र काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीय.
और पढो »