भाजपाने रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रत्नागिरी सिंधुदुर्गमधून मतदासंघावरुन महायुतीमध्ये पेच होता.
शिंदे गटानेही या मतदारसंघावर दावा केला होता. त्यात नारायण राणेंनी या जागेवर हक्क सांगितला होता. यामुळे शिंदे गट आणि भाजपात संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण अखेर शिंदे गटाने माघार घेतली असून, भाजपाने रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर करत चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तेरावी यादी जाहीर केली आहे. या यादीत नारायण राणे यांच्या नावाचा उल्लेख आहे. दरम्यान भाजपाने ही यादी जाहीर करण्याच्या काही वेळ आधीच शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत त्यांनी जर नारायण राणेंना उमेदवारी जाहीर झाली तर महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांना पाठिंबा देऊ असं जाहीर करत अप्रत्यक्षपणे माघार घेतली होती. यानंतर नारायण राणेच रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून निवडणूक लढतील हे स्पष्ट झालं होतं.
दरम्यान महाविकास आघाडीने रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून विनायक राऊत यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. त्यामुळे येथे विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे अशी लढत होईल हे स्पष्ट झालं आहे.उदय सामंत यांनी बुधवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर गुरुवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांचे बंधू किरण सामंतही उपस्थित होते. किरण सामंत यांनी नरेंद्र मोदींना पाठिंबा असेल अशी पोस्ट करत आधीच माघार घेण्याचे संकेत दिले होते.
पत्रकार परिषदेत उदय सामंत यांनी सांगितलं की,"गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील जागावाटपावर चर्चा सुरु आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मतदारसंघाबात 8 दिवसांपूर्वी किरण सामंत यांनी पोस्ट शेअर करत नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी माघार घेत असल्याचं सांगितलं होतं. यानंतर भाजपाच्या एका नेत्याने त्या संदर्भातील निर्णय थोड्या दिवसांनी घ्यावा अशी विनंती केली होती. त्यामुळे काल संध्याकाळपर्यंत यासंदर्भात चर्चा सुरु होती".
पुढे ते म्हणाले की,"मीदेखील 4 दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन धनुष्यबाणाला जागा मिळावी अशी विनंती केली होती. तसंच किरण सामंत यांचं नाव घेत सर्व आकडेवारी सादर केली होती. यानंतर एकनाथ शिंदे यांच्याशी बोललो होतो. काल रात्री पुन्हा एकदा सर्वांशी चर्चा झाली. अमित शाह यांच्याशीही चर्चा करण्यात आली. तिकीट वाटपावर चर्चा सुरु असताना उद्या फॉर्म भरण्याची वेळ आहे. अशा स्थितीत अद्यापही उमेदवार जाहीर न झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे.
Loksabha Election 2024 Narayan Rane BJP Ratnagiri Sindhudurg
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
LokSabha : साताऱ्यात उमेदवारी, उदयनराजेंची कॉलर टाईट; नाशिकचं काय?Maharastra Loksabha Election 2024 : सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आल्यावर उदयनराजेंची कॉलर टाईट झालीय. पण नाशिकमध्ये अद्याप सावळा गोंधळ पहायला मिळतोय.
और पढो »
'नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर न होण्यामागे नागपूरच्या अदृश्य शक्तींचा हात'Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्प्याचं मतदान दोन दिवसांवर आलंय. पण अद्याप महायुतीत काही जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. विशेषत: रत्नागिरी-सिंधुदर्ग जागेवरुन भाजप-शिवसेनेत रस्सीखेच सुरु आहे.
और पढो »
Loksabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात उमेदवारी अर्जांची चर्चा देशातील राजकारणात पैशांचा पाऊस...Loksabha Election 2024 Live Updates : राज्याच्या राजकारणात आज मोठ्या घडामोडी. कुठे होणार सभा... कुठे रंगणार चर्चा... पाहा सर्व अपडेट्स एका क्लिकवर
और पढो »
BJP Candidate List: लोकसभा चुनाव के लिए भाजपा की एक और सूची; रत्नागिरी-सिंधुदुर्ग से नारायण राणे को टिकटBJP Candidate List: लोकसभा चुनाव के लिए भाजपा की एक और सूची; रत्नागिरी-सिंधुदुर्ग से नारायण राणे को टिकट
और पढो »
Loksabha : माढ्याच्या राजकारणात ट्विस्ट, करमाळ्याचे नारायण आबा पाटील फुंकणार तुतारीNarayan Patil In Sharad Pawar Group : करमाळ्यात महायुतीला मोठा धक्का बसला आहे. शिंदे गटाचे माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे आता माढ्याच्या राजकारणात (Madha Loksabha Political Scenario) मोठा ट्विटस पहायला मिळतोय.
और पढो »
शिंदे सरकारच्या 10% आरक्षणावरुन मराठ्यांना धक्का! कोर्ट म्हणालं, 'शैक्षणिक प्रवेश, नोकऱ्या..'Maratha Aarakshan High Court Verdict Instruction: मराठा समाजाला राज्य सरकारने 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर या प्रकरणी उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणी 13 जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
और पढो »