NEET Scam Racket : NEET घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक माहिती आता समोर येतेय. नीट घोटाळ्याचं लातूरसह बीड कनेक्शनही समोर आलंय. या आरोपींनी आणखीही काही विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचं समोर आलंय. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत हे रॅकेट पसरलं असल्याचीही शक्यता वर्तवली जातेय.
NEET घोटाळ्याची राज्यातील व्याप्ती दिवसेंदिवस वाढायला लागलीय. लातूरनंतर आता याचे धागेदोरे बीड पर्यंत पोहोचल्याचं पाहायला मिळतंय. या प्रकरणी माजलगावमधल्या 7 शिक्षकांची चौकशी झाल्याची माहिती मिळतेय. ज्या शिक्षकांची मुलं लातूरला NEET च्या तयारीसाठी येत होती त्याच मुलांना आणि पालकांना आरोपी जलील पठाण आणि संजय जाधव हेरत असल्याचं समजतंय. त्यामुळे या घोटाळ्याची व्याप्ती ही संपूर्ण मराठवाड्यात पसरली असण्याची शक्यता वर्तवली जातेय..आरोपी संजय जाधव आणि जलील पठाण विद्यार्थी-पालकांना हेरत होते.
दुसरीकडे अटकेत असलेला आरोपी शिक्षक जलील खान पठाणचं निलंबन करण्यात आलंय. आरोपी शिक्षक संजय जाधव आणि जलील पठाणच्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर आलेत.जलील पठाणच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आली आहे. पठाणकडे बोगस अपंग प्रमाणपत्र आढळलंय. बोगस अपंग प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवल्याचा संशय आहे. संजय जाधवने त्याच्या शेतात 30 लाखांचा गाळ टाकल्याचं समोर आलं. बीडच्या नेकनुर भागातील 7 शिक्षकांनी पठाणच्या पत्नीच्या खात्यात पैसे पाठवल्याचंही समोर आलं आहे.
दरम्यान नीट घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार असलेला धाराशिव उमरग्याचा आयटीआय सुपरवायझर इरण्णा कोनगलवार पत्नीसह फरार झालाय. नांदेडच्या एटीएसने पहिल्या दिवशी चौकशी करून कोनगलवारला सोडून दिलं होतं. तेव्हापासून तो फरार झालाय..इरण्णा कोनगलवार पत्नीसह फरार आहे. संजय जाधव आणि जलील पठाणकडून मिळणारे पैसे कोनगलवार दिल्लीतील गंगाधरला पाठवत होता. दिल्लीतील एजंट गंगाधर हे पैसे डेहराडूनला पाठवत असल्याचं सूत्रांकडून कळतंय. दिल्लीतील एजंट गंगाधरही फरार झालाय.
NEET घोटाळ्यातील आरोपींबाबात धक्कादायक माहिती समोर येतंय. तपास यंत्रणांनी आरोपींच्या मुसक्या आवळायला सुरूवात केलीय. मात्र मेडिकल प्रवेशाचं स्वप्न उराशी बाळगून दिवसरात्र अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं काय?.. ज्यांचा प्रवेश दोन पाच गुणांनी हुकलाय अशा विद्यार्थ्यांच्या नुकसानीला जबाबदार कोण ? हे प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहे....महाराष्ट्र
Neet Neet Exam Scam Beed Connection Of NEET Exam Scam Marahtwada नीट परीक्षा बीड मराठवाडा नीट परीक्षा घोटाळा
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'शेअर बाजारात 30 लाख कोटींचा तोटा पण एकीलाच 521 कोटी नफा'; अमित शाहांच्या अडचणी वाढणार?Manipulation Of Stock Market: भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवणाऱ्या सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबी च्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन लोकसभा निकालाच्या आधी आणि नंतरच्या परिस्थितीवरुन भाष्य करत गंभीर आरोप केले आहेत.
और पढो »
Maharastra Unseasonal Rain : पुढील 48 तास महत्त्वाचे! राज्याच्या 'या' भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यताMaharastra Weather Update : दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असलेल्या कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आलीये.
और पढो »
अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या क्रुझ पार्टीची झलक आली समोर, 'बॅकस्ट्रीट ब्वॉयज' च्या परफॉर्मेन्सनं जिंकली मनंआता हे दुसरं प्री-वेडिंग पार्टी आहे. यावेळी संपूर्ण अंबानी कुटुंब हे इटली ते फ्रांस असा प्रवास लग्झरी क्रुजवरून करणार आहे.
और पढो »
नीट परीक्षा घोटाळ्याचं गुजरात कनेक्शन, 'ऑपरेशन NEET'मध्ये धक्कादायक गौप्यस्फोटOperation NEET : नीट परीक्षेच्या घोटाळ्याचं गोध्रा कनेक्शन उघडकीस आलंय. या सर्व घोटाळ्याचं केंद्र गोध्रा असल्याचं झी मीडियाच्या ऑपरेशन NEETमधून समोर आलंय. गुजरातमधील एका केंद्रावरून हा घोटाळा कसा घडवून आणला गेलाय याचा खुलासा झालाय.
और पढो »
'हसता पण येत नाही..'; आर्यन खानचा 'तो' व्हिडीओ होतोय ट्रोल...Shah Rukh Khan चा मुलगा Aryan Khan चा हसतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. KKR च्या आयपीएल 2024 च्या फिनालेमधील हा व्हिडीओ आहे.
और पढो »
विधानपरिषदेत बंडखोरीनं वाढवलं टेन्शन; नाशिक, कोकण, मुंबईमध्ये काय चित्र?मविआ आणि महायुतीनं लोकसभा निवडणूक राज्यात एकदिलानं लढल्या.. मात्र होऊ घातलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकांमध्ये मात्र महायुती आणि मविआचं बंडखोरीनं टेन्सन वाढवल्याचं दिसतंय
और पढो »