OM Parvat: ओम पर्वतावरील बर्फ गायब झाला आहे. वाढत्या तापमानामुळं ही घटना घडली असल्याचं बोललं जात आहे.
उत्तराखंडच्या पिथौरागढ येथील ओम पर्वत हे अनेक पर्यटकांसाठी आकर्षण आहे. येथे भेट देण्यासाठी देशभरातून पर्यटक येतात. या पर्वतावर दिसणारे ओम हे अक्षर पाहण्यासाठी लाखो पर्यटकांची झुंबड उडते. मात्र, देशभरातली पर्यटकांना निराश करणारी एक बातमी समोर येत आहे. ओम पर्वत ावरील सर्व बर्फ वितळण्यात आला आहे. त्यामुळं पर्वतावर दिसणारा ओम हा शब्दच गायब झाला आहे. आता फक्त तिथे निर्जन असा डोंगर दिसत आहे. वाढते तापमान आणि ग्लोबल वार्मिग यामुळं ही घटना घडली असावी, असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
पिथौरागढ जिल्ह्यात चीनच्या सीमेरेषेलगतच्या नाभीढांगपासून ओम पर्वतचे भव्य दिर्शन होते. सध्या संपू्र्ण जगात तापमान वाढीच्या समस्याला सामोरे जात आहे. तापमान वाढीमुळं हिमालय क्षेत्रातील बर्फ वेगाने वितळत आहे. त्यामुळंच ओम पर्वतावरील बर्फदेखील गायब झाला आहे. हिमालयमध्ये घडलेल्या या घटनेमुळं प्रत्येकजण चिंतेत आहे.हिमालयात सतत होणारे बांधकाम, वाढते तापमान, निसर्गासोबत छेडछाड यासगळ्यामुळं निसर्गाचा र्हास होत आहे. त्यामुळंच तापमानात वाढ होत आहे.
देशातील तापमान जर 3 डिग्री सेल्सियसपर्यंत वाढले तर 90 टक्के हिमालय वर्षभरातच वितळून जाईल. एका नवीन संशोधतान चिंतेत टाकणारा खुलासा करण्यात आला आहे. याबाबतचे आकडे क्लायमेटिक चेंज जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. तापमान वाढीचा सर्वात गंभीर परिणाम हा हिमालयाच्या परिसरात होणार आहे. पिण्याचे पाणी आणि सिंचनासाठीही पाणी शिल्लक राहणार नाही, असा दावा करण्यात आला आहे.
सध्या भारत 80 टक्के हीट स्ट्रेसचा सामना करत आहे. जर हे थांबवायचे असल्यास पेरीस अॅग्रीमेंटतर्गंत वाढते तापमान दीड डिग्री सेल्सिअसपर्यंत कमी करणे आवश्यक आहे. जर तापमान 3 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचले तर अवस्था आणखी बिघडू शकते. हा अहवाल इंग्लंडच्या विद्यापिठ ईस्ट आंग्लियाने दिला आहे. हे सर्व अहवाल भारत, ब्राझील, चीन, मिस्त्र, इथियोपिया आणि घाणावर फोकस करतात.
Pithoragarh Uttarakhand Om Parvat Without Snow Global Warming Rising Temperature In Himalayas Rising Temperature In Uttarakhand Rising Temperature Himalaya 3 Degree Celsius India Drought Flooding Loss Of Crop 90 Percent Himalaya Will Face Year Long Drought A ओम पर्वत ओम पर्वत बर्फ
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Uttarakhand : बर्फ पिघलने से ओम पर्वत से गायब हुआ ॐ, अब रह गया बस काला पहाड़बर्फ पिघलने से विश्व प्रसिद्ध ओम पर्वत से ॐ गायब हो गया है।
और पढो »
महायुतीत काय चाललंय काय? अजित पवारांना BJP कार्यकर्त्यांनीच दाखवले काळे झेंडेAjit Pawar Black Flags By BJP: अजित पवारांच्या आजच्या बैठकी आणि दौऱ्यावर यापूर्वीच एकनाथ शिंदेंच्या गटाने बहिष्कार टाकलेला असतानाच आता भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले आहेत.
और पढो »
ओम पर्वत से गायब हुआ ओम, जानें इस छोटा कैलाश कहलाने वाले पर्वत की कहानीOm Parvat : छोटा कैलाश कहे जाने वाले ओम पर्वत को लेकर एक बड़ी खबर आ रही है. उत्तराखंड के पिथौरागढ़ जिले में स्थित इस पर्वत पर हर साल बर्फ से ओम बनता है, लेकिन इस साल ऐसा नहीं हुआ.
और पढो »
Bundi News: Om Birla ने की जनसुनवाई लोगों की समस्या का किया समाधान | Latest NewsBundi News: लोकसभा अध्यक्ष ओम बिरला( Om Birla) ने बूंदी में जनसुनवाई की। इस दौरान बड़ी संख्या में लोग समस्या लेकर पहुंचे। अधिकारियों के साथ मिलकर मौके पर निस्तारण किया गया।
और पढो »
राज्यात चाललंय काय? कराडच्या आश्रमात देहविक्री, गतीमंद मुलींकडून मालिश आणि...Satara : बदलापूरच्या घटनेनंतर महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. राज्यात मुलींवरील अत्याचाराच्या घटनेतही गेल्या काही दिवसात वाढ झालीय. त्यातच आता साताराच्या निराधार आश्रमात देहविक्रीचा व्यवसाय सुरु असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
और पढो »
शिक्षणाची ऐशी की तैशी! दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचं चाललंय काय? केंद्र सरकारनं स्पष्टच सांगितलं....Education News : इयत्ता दहावी आणि बारावी ही शैक्षणिक वर्ष पुढील कारकिर्दीच्या दृष्टीनं अतीव महत्त्वाची असतात. पण, विद्यार्थ्यांचा या शैक्षणिक वर्षांकडे पाहण्याचा दृष्टीकोन मात्र आता काही वेगळं सांगून जात आहे.
और पढो »