Pune Rainfall Update : एकीकडे पुण्यात 32 वर्षातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली असताना आता नदीपात्रातील गावांना धोका निर्माण झाला आहे.
पुणे जिल्ह्याला आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे आज सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलीये. हवामान विभागानं येत्या काही तासात पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. त्यामुळे शिरूर, भोर, वेल्हा, मावळ मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात सर्व शाळांना सुट्टी देण्यात आलीये. तर दुसरीकडे मुळा मुठा नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने पुणेकरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा पाण्याचा विसर्ग आज सायंकाळी 6 वाजता वाढवण्यात येणार असून नदीकाठच्या नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन पुणे महापालिकेकडून करण्यात आलं आहे. पुण्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी भारतीय लष्कर आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची मदत घेण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी करु नये असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे.
दरम्यान, पिण्याच्या पाण्यातून जलजन्य रोगांचा प्रसार होणे टाळण्यासाठी पुणे महापालिकामार्फत आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. मात्र, दक्षतेचा उपाय म्हणून नागरिकांनी इमारतींमधील जमिनीखाली व इमारतीवरील पाण्याच्या टाक्यांची साफसफाई करावी. तसेच, घरगुती वापरासाठी पिण्याचे पाणी उकळून व गाळून घ्यावे, असं आवाहन देखील पुणे महानगरपालिकेने केलं आहे.'76000 कोटी रुपये...
Pune Rain Pune Rain News Khadakwasla Dam Pmc Pune Rainfall Weather Report
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Pune Rain: पुणे पाण्यात! अजित पवारांचं पुणेकरांना आवाहन; म्हणाले, 'महत्त्वाच्या कारणांशिवाय...'Pune Rain News Today: पुणे शहराबरोबरच ग्रामीण भागात बुधवार रात्रीपासूनच जोरदार पाऊस पडत असून याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री अजित पवारांनी पुणेकरांना एक आवाहन केलं आहे.
और पढो »
Maharashtra Rain: पुणे में बारिश ने तोड़ा 32 साल का रिकॉर्ड, IMD ने जारी किया अलर्टMaharashtra Rain: Rain in Pune breaks 32 year record, IMD issues alert
और पढो »
Maharashtra: पुणे-ठाणे में पुल व सड़कें पानी में डूबीं, लोगों का हाल-बेहाल; तस्वीरों में देखें बाढ़ जैसे हालातMaharashtra: पुणे-ठाणे में पुल व सड़कें पानी में डूबीं, लोगों का हाल-बेहाल; तस्वीरों में देखें बाढ़ जैसे हालात Heavy rain in pune thane maharashtra road closed bridge went under water
और पढो »
एवढ्याश्या पावसात पुण्याच्या रस्त्यांच्या नद्या का झाल्या? पुणेकरांनीच सांगितलं खरं कारणPune Rain Update: हवामान विभागाने येत्या काही तासांत पुणे शहर आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यात नेमकी काय आहे पावसाची परिस्थिती
और पढो »
Pune Rain : पुण्यात पावसाचा 'रेड अलर्ट', 'या' तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीरPune Rain Red Alert : पुण्यात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आल्यानंतर आता मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
और पढो »
Maharashtra Rain Updates: भारी बारिश में Pune-Mumbai का बुरा हाल, सड़कों पर सैलाबमुंबई (Mumbai Flood) फिर पानी-पानी है. सुबह-सुबह सड़कों पर समंदर जैसी स्थिति है. चेंबूर की सड़कें नाले में बदली दिखाई दे रही हैं. मुंबई की सात झीलों में से एक विहार झील ओवरफ्लो हो चुकी है. मीठी नदी उफन रही है. पुणे (Heavy Rain In Pune) की हालत और बुरी है. कई सोसाइटियों में पानी घुस गया है. स्कूलों में छुट्टियां कर दी गई हैं.
और पढो »