लखनऊ कोर्टाने राहुल गांधी यांना 14 एप्रिल 2025 ला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिलेत. नाही तर त्यांच्यावर कठोर कारवाई होऊ शकते असं म्हटलं आहे.
लखनऊ कोर्टाने राहुल गांधी यांना 14 एप्रिल 2025 ला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिलेत. नाही तर त्यांच्यावर कठोर कारवाई होऊ शकते असं म्हटलं आहे.लखनऊ कोर्टाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना वीर सावरकर यांच्यावर केलेल्या वक्तव्याप्रकरणी 200 रुपयांचा दंड ठोठावला आहे.
त्यासोबत कोर्टाने दंडाची रक्कम वादी पक्षाचे वकील नृपेंद्र पांडे यांनी देण्यात यावी असा आदेश देखील दिला आहे. लखनऊ कोर्टाने राहुल गांधी व्यक्तिगतरित्या कोर्टात उपस्थित न राहिल्याने ही कारवाई केली आहे. तसेच कोर्टाने राहुल गांधी यांना 14 एप्रिल 2025 रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. जर राहुल गांधी या तारखेला कोर्टात उपस्थित राहिले नाहीत तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असं कोर्टाने म्हटलं आहे. या प्रकरणी वकील नृपेंद्र पांडेंनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांनी 17 डिसेंबर 2022 रोजी महाराष्ट्रातील अकोला येथे पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत एक वादग्रस्त विधान केलं होतं. ज्यामध्ये राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा उल्लेख 'ब्रिटिशांचे सेवक' आणि 'पेन्शनधारक' असा केला होता. या प्रकरणी कोर्टात सुनावणी सुरु आहे.सुनावणीदरम्यान, राहुल गांधी यांच्या वतीने वकील प्रांशू अग्रवाल हे कोर्टात उपस्थित होते. प्रांशू अग्रवाल यांनी राहुल गांधी यांना न्यायालयात हजर राहण्यापासून सूट मिळावी यासाठी अर्ज दाखल केला. ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, राहुल गांधी सध्या लोकसभेत विरोधी पक्षनेते पदावर आहेत. त्यासोबतच त्यांची दिल्लीत एक महत्त्वाची बैठक आणि इतर काही कार्यक्रम असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी उपस्थित राहावे लागणार आहे. त्यामुळे राहुल गांधी न्यायालयात हजर राहू शकले नाहीत. ते न्यायालयाच्या आदेशांचा आदर करतात. जाणूनबुजून न्यायालयात हजर राहण्यासाठी ते प्रयत्न करत नाहीत. राहुल गांधी यांनी वीर सावरकरांबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यांनी सावरकरांना 'ब्रिटिशांचे सेवक' आणि 'पेन्शनधारक' म्हटले होते. राहुल गांधींच्या या विधानाविरुद्ध नृपेंद्र पांडे यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठात धाव घेतली. राहुल यांच्या वक्तव्याबद्दल त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 153 आणि कलम 505 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी पांडे यांनी केली आहे.
Savarkar Lucknow Court Controversial Statement Rahul Gandhi Fine Swatantrya Veer Savarkar राहुल गांधी राहुल गांधी दंड राहुल गांधी सावरकर वक्त
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
मुंबई बँकेत १२२ कोटी रुपयांचा गबन, आरबीआयने प्रतिबंध आणलेमुंबईच्या न्यू इंडिया कोऑपरेटिव बँकेत १२२ कोटी रुपयांचा गबन झाल्याची घटना समोर आली आहे. बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्या आणि लेखा प्रमुख यांच्यावर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. आरबीआयने बँकेवर अनेक प्रतिबंध आणले आहेत.
और पढो »
सुरेश धस यांची आमदारकी धोक्यात? मुंबई हायकोर्टाने बजावली नोटीस; नेमकं प्रकरण काय?Suresh Dhas Court Case: मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरणानंतर सातत्याने प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत असलेलं नाव म्हणजे भाजपाचे आमदार सुरेश धस
और पढो »
शतकी खेळीनंतर विराटनं देवाबाबत मांडलेले विचार भारावणारे; काय आहे त्याच्या यशामागील प्रेमानंद महाराज कनेक्शन?Champions Trophy IND vs PAK: शतकी खेळीनंतर विराटनं देवाबाबत मांडलेले विचार भारावणारे; काय आहे त्याच्या यशामागील प्रेमानंद महाराज कनेक्शन?
और पढो »
130000000000 रुपयांचा ऑनलाईन दरोडा; लोकांना कॉम्प्युटर चालवता येईना त्या देशातला आरोपीCrypto Heist Shocking News : सर्वात मोठी फिल्मी चोरी; आकड्यांचा नुसता खेळ... हॅकरनं घातला तब्बल 130000000000 कोटींचा गंडा
और पढो »
मुंबईत पाणीबाणी! फेब्रुवारीतच धरणातील जलसाठा निम्म्यावर; पाऊस येईपर्यंत काय असेल अवस्था?Mumbai News : अरे बापरे! मे महिन्याआधीच मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा निम्म्यावर; पुढे काय?
और पढो »
मुंबईसह 'या' जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा, घराबाहेर पडताना काळजी घ्या, तापमानाचा पारा...Heatwave Alert In Maharashtra: महाराष्ट्रात उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण झाले आहेत. काय आहे हवामानाचा इशारा
और पढो »
