Zerodha app : शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भातील गोष्टींसाठी वापरता असणारं हे अॅप तुम्हीसुद्धा वापरताय? आताच पाहा तुम्हाला अकाऊंट लॉगईन करता येतंय ना...
लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यााधीपासूनच त्यासाठीची वातावरणनिर्मिती होताना दिसत आहे. शेअर बाजार ातही सोमवारी काहीशी अशीच परिस्थिती पाहायला मिळाली. जिथं निवडणुकीच्या निकालासाठी 24 तासांहूनही कमी वेळ शिल्लक असतानाच एक्झिट पोलनंतर सेन्सेक्समध्ये जवळपास 2500 अंकांची उसळी पाहायला मिळाली. इथं उसळीनंतर शेअर बाजार ातील गुंतवणूकीमध्ये अनेक घडामोडी घडत असतानाच गुंतवणुकदारांमध्ये मात्र काहीशी गोंधळाची परिस्थिती पाहायला मिळाली.
सोमवारी सकाळपासूनच देशातील सर्वात मोठ्या शेअर ट्रेडिंग अॅप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Zerodha मध्ये लॉगईन करताना अडचणी येत असल्याचं आणि काहींना लॉगईनच करता येत नसल्याचं पाहायला मिळालं. ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनं Zerodha चं लॉगईन होत नसल्यामुळं एकच गोंधळ पाहायला मिळाला आणि सोशल मीडियावरही लगेचच गुंतवणुकदारांनी आपल्या अडचणी निदर्शनास आणण्यास सुरुवात केली.
दरम्यान ही परिस्थिती पाहता कंपनीकडूनही तातडीनं हे अडथळे दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. सदरील Glitch आयएसपी संबंधित तांत्रिक अडचणींमुळं उदभवला असावा अशी शक्यता यावेळी वर्तवण्यात आली. त्याशिवाय तात्पुरत्या स्वरुपात पर्यायी Internet connection चा वापर करण्याचाही सल्लाही कंपनीकडून देण्यात आला.
सेबीकडून नियंत्रित केल्या जाणाऱ्या सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिस लिमिटेड आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड या दोन्ही डिपॉझिटरीसंदर्भातील चर्चा यानिमित्तानं सोशल मीडियावर सुरु झाल्या, जिथं त्यांची सेवा धीम्या गतीनं सुरु असल्याची बाब गुंतवणूकदारांनी तातडीनं समोर आणली.Full Scorecard →
Share Maket Zerodha App Zerodha App Down Zerodha App Download For Pc Zerodha App Download For Laptop Zerodha App Download For Ios Zerodha App Download For Mac Zerodha App Code झिरोधा शेअर बाजार मराठी बातम्या बातम्या
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Pune News : जेजुरीत धक्कादायक घटना, पॅराग्लायडिंग कोसळून तरुणी जखमीFemale Pilot Dies While Paragliding : पॅराग्लायडिंग साइटवरून उड्डाण करताच चालकाचे पॅराग्लायडरवरील (Paragliding Accident In Pune) नियंत्रण सुटल्याची ही दुर्घटना झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलीये.
और पढो »
Career Tips: या कोर्समुळे बदलेल तुमचं संपूर्ण जीवन, भविष्य राहील सुरक्षितLife Changing Course: बारावीचा निकाल लागल्यावर अनेक विद्यार्थी करिअरच्या वाटा शोधू लागतात. शिक्षण सुरु असताना एका टप्प्यावर आपल्याला करिअरची चिंता वाटू लागते. भविष्यात आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू नये म्हणून आता कोणता कोर्स करायचा? याचा विचार विद्यार्थी करु लागतात.
और पढो »
RCB Playoffs scenario : पंजाबचा पराभव करताच चमकलं आरसीबीचं नशिब, प्लेऑफमध्ये कसं पोहोचेल बंगळुरू?RCB Playoffs qualification scenario : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा पराभव करत त्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. मात्र, आता आरसीबीसाठी प्लेऑफ कितपत किचकट राहिल? पाहा समीकरण
और पढो »
मोदींच्या विकास कामांचं कौतुक करणारी रश्मिका मंधाना सोशल मीडियावर ट्रोल, युजर्स म्हणाले दुसरी 'कंगना'बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंधानाने (Rashmika Mandana) मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अटल सेतूवरुन (Mumbai Trans Harbour Link Atal Setu) प्रवास केला. यावेळी तीने पीएम मोदींच्या विकास कामांचं कौतुक केलं. पण यावरुन सोशल मीडियावर तिला चांगलंच ट्रोल केलं जात आहे.
और पढो »
भीषण उष्णतेला AC च जबाबदार; संशोधनातून धक्कादायक माहिती उघड, तुमचं नेमकं काय चुकतंय?यंदा उन्हाळ्याने भीषण उष्णतेचा उच्चांक गाठला आहे. माणसाला उष्माघाताचा त्रास होताना आपण ऐकलंच होतं पण उष्माघातामुळे बिबट्यासारख्या प्राण्याचाही मृत्यू झाला आहे. या प्रचंड उकाड्याला माणूस आणि त्याची कृतीच जबाबदार आहे.
और पढो »
Weather News : मान्सून भारतात दाखल होताच बदललं चित्र; महाराष्ट्रातील हवामानावर 'असा' होतोय परिणामMaharashtra Weather News : मान्सून भारतात पोहोचला असला तरीही अद्याप तो महाराष्ट्रात दाखल झालेला नाही. काय आहे राज्यातील हवामानाची स्थिती? पाहा...
और पढो »