अनेकांनाच धक्का; अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर 2700 वरून 11.90 रुपयांवर पोहोचला आणि....

Ambani Group समाचार

अनेकांनाच धक्का; अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर 2700 वरून 11.90 रुपयांवर पोहोचला आणि....
Mukesh AmbaniMarathi NewsNews
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 72 sec. here
  • 20 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 91%
  • Publisher: 63%

Business news : भारतीय उद्योग जगतातून मोठी माहिती समोर. अंबानींचं नाव पुढे. नेमकं घडलंय काय? जाणून घ्या सविस्तर वृत्त आणि व्यवहारासंदर्भातील माहिती...

भारतीय उद्योग जगतामध्ये सातत्यानं नवे बदल होत असतानाच एक नवी माहिती समोर आली आहे. यामध्ये एका अशा कराराची चर्चा सुरू आहे, ज्यासंदर्भातील माहिती मिळताच अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. निमित्त ठरतंय ते म्हणजे या व्यवहारामध्ये खर्ची घालण्यात आलेली रक्कम आणि त्यानंतरच्या घडामोडी.

एकिकडे अंबानी समुहाला विविध क्षेत्रांमध्ये उंचीवर नेणाऱ्या मुकेश अंबानी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबानं व्यवसाय क्षेत्राच्या नजरा वळवलेल्या असतानाच त्यांचे बंधू अनिल अंबानी मात्र वेगळ्या कारणामुळं चर्चेचा विषय ठरले. सातत्यानं मिळणारं अपयश, आर्थिक डबघाई, ही त्यामागची काही महत्त्वाची कारणं. आता याच अनिल अंबानींच्या हातून आणखी एक कंपनी गेल्याचं म्हटलं जात आहे.

कर्जामुळं संकटात असणारी अनिल अंबानी यांची ही कंपनी त्यांनी गमावली असून, रिलायन्स कॅपिटलचाच भाग असणाऱ्या या कंपनीसाठी सर्वाधिक बोली लावली ती म्हणजे हिंदूजा समुहाशी संलग्न असणाऱ्या इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्स या कंपनीनं. NCLT च्या आदेशांनंतर या कंपनीनं 2750 रुपये एस्क्रो अकाऊंटमध्ये ट्रान्सफर केले असून, अंतिम तारखेपूर्वीच हा संपूर्ण व्यवहार करण्यात आला. सदर व्यवहारानंतर या कंपनीकडून बँकांची एक बाईंडिंग शिटही जमा करण्यात आली असून, यामध्ये व्यवहाराच्या अनुषंगानं बँकांच्या कर्जाचीही माहिती दिली आहे.

हे धनाढ्य जोडपं म्हणजे अनिल अंबानींचे नवे शेजारी; ब्रिटनच्या महाराणीची कार खरेदी करणाऱ्या या कुटुंबाची श्रीमंती किती? स्वस्त दरात कर्ज खरेदी करण्यासाठी म्हणून या समुहानं अनेक बँकांकडे विचारणा केली होती. पण, त्यांच्या हाती निराशाच लागली. आताच्या घडीला ही कंपनी एकूण रकमेपैकी 7300 कोटी रुपये जमवू शकली असून, इथून पुढील रकमेची जमवाजमव करण्यासाठी आता नव्यानं आखणी केली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. ब्लूमबर्गच्या माहितीनुसार बँकांनी हिंदूजा समुहाला कर्जासंदर्भात मदत न केल्यास आता हा समुह बाँडच्या माध्यमातून रक्कम गोळा करण्यावर भर देऊ शकतो.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Mukesh Ambani Marathi News News News In Marathi Business News Anil Ambani Company Anil Ambani Net Worth Anil Ambani Reliance Capital Anil Ambani Wealth Anil Ambani Property Hinduja Group On Anil Ambani Company Who Buy Anil Ambani Company Anil Ambani Debt Reliance Share अनिल अंबानी रिलायन्स कॅपिटल मुकेश अंबानी

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

हिंडेनबर्गच्या अहवालाचा शेअर बाजारावर काय परिणाम होणार? तज्ज्ञांचा गुंतवणूकदारांसाठी महत्वाचा सल्लाहिंडेनबर्गच्या अहवालाचा शेअर बाजारावर काय परिणाम होणार? तज्ज्ञांचा गुंतवणूकदारांसाठी महत्वाचा सल्लाHindenburg Research : शेअर बाजारात गुंतवणूक करणा-यांनी या प्रकरणात केंद्राने सत्य परिस्थिती समोर आणावी अशी मागणी केली आहे.आता सर्वांचं लक्ष आहे ते आठवड्याच्या सुरुवातीला होणा-या शेअर बाजारातल्या व्यवहारांवर.
और पढो »

'माझ्या सर्वात मोठ्या शत्रूसाठी...'; 'ती' रडत, विव्हळ Olympics बाहेर पडल्यानंतर सिंधूची पोस्ट'माझ्या सर्वात मोठ्या शत्रूसाठी...'; 'ती' रडत, विव्हळ Olympics बाहेर पडल्यानंतर सिंधूची पोस्टPV Sindhu Post Olympics 2024: भारतीय बॅडमिंटनपटूने केलेली ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत असून तिने या पोस्टमध्ये एक फोटोही शेअर केला असून या पोस्टला लाखोंच्या संख्येनं लाईक्स आहेत.
और पढो »

'त्या' स्टंटबाज तरुणाचा नवा Video पहिल्यावर तुम्ही लोकलच्या दारातही उभे राहणार नाही'त्या' स्टंटबाज तरुणाचा नवा Video पहिल्यावर तुम्ही लोकलच्या दारातही उभे राहणार नाहीCentral Railway Viral Video: मध्य रेल्वेच्या अधिकृत एक्स हॅण्डलवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओमधील व्यक्तीबरोबर जे काही घडलं ते पाहून तुम्हाला धक्काच बसेल.
और पढो »

मज्जाच मजा..! Zomato आणि Swiggy वरून मागवता येणार दारू, 'या' राज्यात सुरू होणार होम डिलिव्हरीमज्जाच मजा..! Zomato आणि Swiggy वरून मागवता येणार दारू, 'या' राज्यात सुरू होणार होम डिलिव्हरीHome Delivery of Alcohol : एकीकडे ऑनलाईन खरेदीचं फ्याड वाढत असताना आता तळीरामांसाठी गुड न्यूज समोर आली आहे. देशातील काही राज्यात Zomato आणि Swiggy दारूची होम डिलिव्हरी सुरू करणार आहे.
और पढो »

कष्टाचं चीज! लेक CA झाल्याचं कळताच भाजीवाल्या काकूंना अश्रू अनावर; पाहा आजच्या दिवसातला सुरेख Videoकष्टाचं चीज! लेक CA झाल्याचं कळताच भाजीवाल्या काकूंना अश्रू अनावर; पाहा आजच्या दिवसातला सुरेख VideoVegetable Vendor Son becomes CA Viral Video : व्हिडीओ पाहून तुम्हालाही आठवेल आईनं मारलेली मिठी...; या काकू आणि त्यांच्या मुलावर कौतुकाचा वर्षाव.
और पढो »

कष्टाचं चीज! लेक CA झाल्याचं कळताच भाजीवाल्या काकूंना अश्रू अनावर; पाहा आजच्या दिवसातला सुरेख Videoकष्टाचं चीज! लेक CA झाल्याचं कळताच भाजीवाल्या काकूंना अश्रू अनावर; पाहा आजच्या दिवसातला सुरेख VideoVegetable Vendor Son becomes CA Viral Video : व्हिडीओ पाहून तुम्हालाही आठवेल आईनं मारलेली मिठी...; या काकू आणि त्यांच्या मुलावर कौतुकाचा वर्षाव.
और पढो »



Render Time: 2025-02-14 00:33:47