Kurla Bus Accident : कुर्ला इथं सोमवारी झालेल्य़ा बेस्ट बस अपघातानंतर अखेर घटनास्थळावरील काही दृश्य समोर आली आणि अनेकांनाच हादरा बसला.
मुंबई तील कुर्ला इथं झालेल्या बेस्ट बसच्या अपघात ात आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार 7 जणांचा मृत्यू ओढावला. अतिशय भीषण अशा या अपघात ात काही कळायच्या आतच परिस्थिती इतकी बिघडली, की निष्पापांवर काळानं घाला घातला. याच भीषण अपघात ातली भीषण दृश्य आता समोर येण्यास सुरुवात झाली असून, घटनास्थळी बसच्या चाकाखाली माणुसकीसुद्धा चिरडली आणि तिचा अंत झाला. हेच सांगणारा एक व्हिडीओ नव्यानं समोर आला आहे. जिथं, अपघात ात मरण पावलेल्या महिलेचे दागिने चोरीला जात असल्याचं स्पष्ट दिसत आहे.
कुर्ल्यात झालेल्या भयानक अपघातात फक्त माणसंच नाही तर माणुसकीचाही क्रूर अंत झाला. असं म्हणण्यास कारणीभूत ठरतोय तो म्हणजे एक व्हिडीओ. कुर्ल्यात भरधाव बेस्ट बसनं अनेकांना चिरडलं. त्यात कनिस अन्सारी या महिलेचाही जागीच मृत्यू झाला. मृत्यू झाल्यावर अज्ञात इसमाने त्यांच्या हातातील बांगड्या काढून घेतल्या. मोबाईल कॅमेरात ही चोरी कैद झाली आहेत.
हा अज्ञात इसम मदतीच्या बहाण्यानं मृत महिलेच्या बांगड्या काढत होता. मोबाईलवर व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीला नंतर ही बाब लक्षात आली. बांगड्या चोरणारा व्यक्ती कोण हे मात्र अद्याप कळू शकलं नाही. मात्र मृत महिलेच्या हातातल्या बांगड्या चोरणारा हा व्हिडिओ पाहताना कोणाच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल हे खरं.दरम्यानत कनिस अन्सारी या तिथं एका दवाखान्यात काम करत होत्या. सोमवारी त्यांना रात्री 8 वाजता दवाखान्यात पोहोचायचं होतं, पण काही कारणास्तव त्यांना उशीर होत असल्याचा निरोप आला.
खेळायला गेला तो परत आलाच नाही... इमारतीच्या बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खड्डयात पडून 7 वर्षीय मुलाचा मृत्यू सदर अपघातातील आणखी एक CCTV फूटेज समोर आलं असून हे CCTV फुटेज त्या बसमधील असल्याचं सांगितलं जात आहे. बस जात असताना अचानक अपघात झाला आणि त्यानंतर बसमध्ये उडालेली खळबळ, प्रवाशांमध्ये पसरलेलं भीतीचं वातावरण या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे.सोमवारी झालेल्या कुर्ला बस अपघातानंतर या प्रकरणावर 5 सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. ही समिती घटनेची माहिती आणि तपास करुन अहवाल सादर करेल असं सांगण्यात आलं असून, सध्या बेस्ट बस चालक पोलिसांच्या ताब्यात आहे.
कुर्ला कुर्ला बस अपघात मुंबई अपघात मराठी बातम्या Accident Best Mumbai BEST Bus Kurla Kurla Railway Station BEST Bus Accident Accident News
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Maharashtra Exit Poll: राज ठाकरेंच्या पदरी निराशाच? 'मनसे'ला किती जागा मिळणार पाहिलं?Maharashtra Exit Poll 2024 How Many Seats Raj Thackeray MNS Will Get: महाराष्ट्रातील विधानसभेच्या मतदानानंतर एक्झिट पोलची एकडेवारी समोर आलेली असतानाच मनसेला किती जागा मिळणार यासंदर्भातील संभाव्य आकडेवारी समोर आली आहे.
और पढो »
मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीविषयीची सर्वात मोठी अपडेट; मध्यरात्री 12 नंतर...Maharashtra Assembly Election Result : विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला आणि राज्यातील सत्तास्थापनेच्या गणितांनी सर्वांच लक्ष वेधलं.
और पढो »
Udaipur News: उपराष्ट्रपति जगदीप धनखड़ पहुंचे समोर बाग, पत्नी डॉ सुरेश धनखड़ भी साथ मौजूदUdaipur News: उपराष्ट्रपति जगदीप धनखड़ आज उदयपुर प्रवास पर हैं. उप राष्ट्रपति जगदीप धनखड़ समोर बाग Watch video on ZeeNews Hindi
और पढो »
Video: अचानक झाली अजित पवारांच्या हेलिकॉप्टरची तपासणी; बॅगेतील वस्तू पाहून सारेच थक्कVideo Election Commission Check Ajit Pawar Helicopter Bags: सोमवारी आणि मंगळवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या बॅगा हेलिपॅडवर तपासण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलेलं असतानाच आता हा व्हिडीओ समोर आला आहे.
और पढो »
हजारो चाहत्यांचा घेराव अन् लपून बसलेली दीपिका; लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच समोर आला अभिनेत्रीचा Videoदीपिका पदुकोणने सप्टेंबरमध्ये मुलगी दुआला जन्म दिला, त्यानंतर अभिनेत्री पहिल्यांदाच दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये दिसली. मुलीच्या जन्मानंतरचा हा पहिलाच दीपिकाचा सार्वजनिक कार्यक्रम आहे.दीपिकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
और पढो »
नागपूरमध्ये राऊतांच्या कारला अपघात! रात्री प्रचारावरुन परतताना ट्रकने दिली धडकMaharashtra Assembly Election: राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी नेत्यांकडून झाडल्या जात असतानाच नागपूरमधून मोठी बातमी समोर आली आहे. ही सारी घडामोड बुधवार रात्रीची आहे.
और पढो »