मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनाम्याच्या चर्चेवर स्पष्टीकरण. बीड हत्या प्रकरणात त्यांच्यावर आरोप होत असले तरी मुंडे यांनी राजीनामा दिल्याची सूचना नाकारली आहे.
बीड हत्या प्रकरण ात मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत असतानाच त्यांच्या राजीनाम ्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र आता धनंजय मुंडे ंनी स्पष्ट केलं आहे.बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन महाराष्ट्र ाच्या राजकारण ात मोठा गदारोळ माजला आहे. वाल्मिक कराडला अटक करण्यात आली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम ाच्याची मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी उचलून धरली आहे. सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्या तब्बल एक तास चर्चा झाली.
तेव्हा धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, या सगळ्या चर्चांवर धनंजय मुंडेंनी स्पष्ट उत्तर दिलं आहे. धनंजय मुंडे यांनी सोमवारी अजित पवारांची भेट घेतली. या बैठकीत त्यांनी राजीनामा दिल्याच्या चर्चा सुरू होत्या. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे. या बैठकीसाठी धनंजय मुंडे हे मंत्रालयात आले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांनी मुंडेंची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना तुम्ही राजीनामा दिला आहे का? असा प्रश्न विचारला असता त्यांनी बिलकुल नाही, मी राजीनामा दिलेला नाही, असं ठाम स्वरात म्हटलं आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला ईडीने नोटीस बजावली असल्याची सूत्रांची माहिती आहे. याबाबतही मुंडे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी वाल्मीक कराडला ईडीने नोटीस दिली की नाही, याबद्दल मला काहीही कल्पना नाही, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.सोमवारी धनंजय मुंडे यांनी अजित पवारांची भेट देऊन बीड प्रकरणातील आपली बाजू स्पष्ट केल्याचं खात्रीलायक सूत्रांनी सांगितलं आहे. विरोधकांनी केलेल्या आरोपावर मुंडेंनी अजित पवारांसमोर खुलासा केला. या सर्व घटनाक्रमाशी आपला काहीही संबंध नसल्याचे मुंडे यांनी अजित पवारांना सांगितलं आहे. बीड प्रकरणात जोपर्यंत पुरावा मिळत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंवर कारवाई केली जाणार नाही, अशी भूमिका पक्षाने घेतल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. न्यायालयीन चौकशी, एसआयटी व सीआयडी चौकशी होईपर्यंत कारवाई केली जाणार नाही असं सांगण्यात येत आहे. तिन्ही चौकशीमध्ये जो दोषी असेल, त्याच्याविरोधात कारवाई केली जाणार आहे. हीच अजित पवारांची सोमवारच्या भेटीगाठींनंतरची भूमिका असल्याचं सांगण्यात येत आह
धनंजय मुंडे बीड हत्या प्रकरण राजीनाम अजित पवार महाराष्ट्र
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
धनंजय मुंडेंचा राजीनामा देण्याची रणनीती!सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर विरोधक धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी धनंजय मुंडेंना राजीनामा घेऊ द्यावी असा दावा काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
और पढो »
धनंजय मुंडे महायुतीत एकाकी पडले? आरोप आणि टीकांवर अखेर सोडलं मौन, म्हणाले 'माझी...'विरोधकांसह महायुतीच्या नेत्यांकडून टीका होत असताना धनंजय मुंडे एकाकी पडल्याची स्थिती आहे
और पढो »
भुजबळांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण!धनंजय मुंडेंच्या मदतीला छगन भुजबळ धावून आले आहेत.
और पढो »
पॉपकॉर्न पर जीएसटी दर में स्पष्टीकरणजीएसटी काउंसिल ने पॉपकॉर्न पर जीएसटी दर को लेकर स्पष्टीकरण जारी किया है।
और पढो »
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने फडणवीसांच्या भूमिकेवरुन निशाणा साधलाउद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेवरुन त्यांना निशाणा साधला आहे. परभणीत सोमनाथ सूर्यवंशी व बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांचे नक्की काय झाले? असा सवाल शिवसेनेनं फडणवीसांना केला आहे. या प्रश्नाचं उत्तर फडणवीस सरकारला देण्यात आलेले नाही. शिवसेना मंत्री धनंजय मुंडेंचा उल्लेख करत संतोष देशमुख प्रकरणावरुन 'सामना'तून टीका केली आहे.
और पढो »
सुरेश धसांचा गौप्यस्फोट: वाल्मिक कराडच्या दादागिरीचा प्रसारबीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुरेश धस यांनी Zee 24 तासच्या 'टू द पॉईंट' कार्यक्रमात धनंजय आणि पंकजा मुंडे यांना गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले की, वाल्मिक कराड यांच्यामुळे पंकजा मुंडेंचा पराभव झाला आणि त्यांनी निवडणुकीत माझ्या विरोधात काम केले.
और पढो »