Navra Maza Navsacha 2: बहुप्रतिक्षित नवरा माझा नवसाचा या चित्रपटाची रिलीज डेट अखेर समोर आली आहे. पण यावेळी मात्र एक ट्विस्ट आहे.
नवरा माझा नवसाचा या चित्रपटाने असंख्य मराठी प्रेक्षकांच्या मनावर गारुड केलं आहे. सचिन पिळगावकर, अशोक सराफ, सुप्रिया पिळगावकर यांच्या अभिनयाने नटलेला हा चित्रपट लहान मुलांबरोबरच मोठ्यांचाही आवडीचा चित्रपट आहे. आता नवरा माझा नवसाचा या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नवरा माझा नवसाचा २ या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. मात्र आता या सिनेमात एक वेगळाच ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. यावेळी एसटीने नव्हे तर कोकण रेल्वेने प्रवास करुन नवस फेडला जाणार आहे.
नवरा माझा नवसाच्या या चित्रपटाची निर्मिती, कथा-पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगावकर यांनी केलं आहे. तर, सचिन पिळगावकर, अशोक सराफ, सुप्रिया पिळगावकर, स्वप्निल जोशी, हेमा इंगळे, निर्मिती सावंत, सिद्धार्थ जाधव, वैभव मांगले अशी मातब्बर कलाकारांची फौज असणार आहे. नवरा माझा नवसाच्या पहिल्या भागात आपण एसटीचा प्रवास अनुभवला मात्र, आता या प्रवासात ट्विस्ट असणार आहे. नवरा माझा नवसाचा भाग 2 मध्ये कोकण रेल्वेचा प्रवास अनुभवायला मिळणार आहे.
मुंबई येथील श्री सिद्धिविनायक मंदिर येथे चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. 20 सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सचिन पिळगावकर यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्टरही पोस्ट केले आहे. या पोस्टमध्ये एका ट्रेनच्या डब्यात अशोक सराफ, सचिन-सुप्रिया पिळगावकर, स्वप्निल जोशी, हेमा इंगळे दिसत आहेत. तसंच, पोस्टमध्ये लिहलं आहे की, मुंबईच्या सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन नवरा माझा नवसाचा 2 ही नॉनस्टॉप कॉमेडी निघाली आहे गणपतीपुळ्याला निघाली आहे. पण यावेळेला एसटी नव्हे तर कोकण रेल्वेने.
Sachin Pilgaonkar Supriya Pilgaonkar Marathi Movie Navra Maza Navsacha Navra Maza Navsacha 2 Ashok Saraf Hemal Ingale Ashok Saraf Movie Navra Maza Navsacha 2 Teaser Navra Maza Navsacha 2 Trailer Navra Maza Navsacha Full Movie Navara Maza Navsacha Cast
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
चीनमुळे पृथ्वीची फिरण्याची गती मंदावली, उत्तर, दक्षिण ध्रुव एकमेकांपासून दूरावलेThree Gorges Dam : जगातील सर्वात मोठे धरण हे चीन मध्ये आहे. या धरणाचा पृथ्वीवर मोठा परिणाम झाला आहे.
और पढो »
India vs Pakistan चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तारखा अखेर जाहीर, भारत पाकिस्तानात जाणार? रिपोर्टनुसार, 'सरकारच्या...'चॅम्पिअन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) पाकिस्तानमध्ये (Pakistan) होणार असून भारत दौरा करणार की नाही हा मोठा प्रश्न आहे.
और पढो »
MCA अध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची होणार, राज्यातला मोठा नेता आव्हान देणार?MCA Election : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक येत्या 23 जुलै रोजी होत आहे. यंदा या निवडणुकीत मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. कारण राज्यातला एक मोठा नेता या निवडणुकीत उतरणार असल्याची चर्चा आहे..
और पढो »
मध्यमवर्गीय, नोकरदारांची मजाच मजा! Budget 2024 मध्ये होणार NPS संदर्भातील 'हा' मोठा निर्णय?Budget 2024 Expectations: मध्यमवर्गीय कुटुबीयांच्या अपेक्षांमध्ये भर. तिसऱ्यादा सत्तेत येणाऱ्या मोदी सरकारकडून आणखी एका मास्टर स्ट्रोकची तयारी. जाणून घ्या तुम्हाला कसा होणार फायदा...
और पढो »
मुंबईत तयार होणार तिसरा सी-लिंक; प्रवाशांचा तासाभराचा वेळ वाचणार, असा असेल मार्ग?Nariman Point to Colaba Sea Way: कुलाब्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मदत होणार आहे. नरीमन पॉइंट ते कुलाबा पाच मिनिटांत पोहोचणे शक्य होणार आहे.
और पढो »
पृथ्वीची फिरण्याची गती मंदावली! 24 नाही तर 25 तासांचा एक दिवस होणार, एका वर्षात 365 पेक्षा कमी दिवस येणार24 नाही तर 25 तासांचा एक दिवस होणार आहेत. कधी पासून होणार हा बदल जाणून घेऊया.
और पढो »