पुणे पोर्शे अपघातात मोठा ट्विस्ट, आईने अखेर पोलिसांसमोर दिली कबुली, गुन्हे शाखेच्या हाती मोठं यश

Pune समाचार

पुणे पोर्शे अपघातात मोठा ट्विस्ट, आईने अखेर पोलिसांसमोर दिली कबुली, गुन्हे शाखेच्या हाती मोठं यश
Pune AccidentPune Porsche Accident
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 62 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 35%
  • Publisher: 63%

Pune Porsche Accident: पुणे पोर्शे अपघात प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. अल्पवयीन मुलाच्या जागी आईने स्वत:चं रक्त दिल्याची कबुली दिली आहे. मुलाच्या आई-वडिलांनी मिळूनच सगळा कट रचला होता.

: पुणे पोर्शे अपघात प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. अल्पवयीन मुलाच्या जागी आईने स्वत:चं रक्त दिल्याची कबुली अखेर दिली आहे. मुलाच्या आई-वडिलांनी मिळूनच सगळा कट रचला होता. पुणे पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये रक्ताचे नमुने बदलल्याच्या आरोपाखाली मुलाची आई शिवानी अग्रवालला अटक केली होती. त्यांच्याआधी हॉस्पिटमधील डॉक्टर आणि वॉर्डबॉयला अटक करण्यात आली होती. आतापर्यंत पोलिसांनी मुलाची आई, वडील आणि आजोबा यांना बेड्या ठोकल्या आहेत. यादरम्यान त्यांची चौकशी केली जात आहे.

पुणे पोलिसांकडून पोर्शे अपघात प्रकरणी चौकशी केली जात आहे. आज गुन्हे शाखेकडून मुलासमोर आईची चौकशी कऱण्यात आली. यावेळी सुरुवातीला शिवानी अग्रवालने उडवाउडवीची उत्तरं दिली. दरम्यान कठोरपणे चौकशी केली असता अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या जागी आपलं रक्त दिल्याची कबुली शिवानी अग्रवालने दिली आहे. आई शिवानी अग्रवाल आणि वडील विशाल दोघांनी मिळून हा कट रचला होता.

शिवानी आणि विशाल हे दोघे ही ससून रुग्णालयात अपघातादिवशी उपस्थित होते. ससूनच्या सीसीटीव्हीत विशाल अग्रवालही आढळला होता. दरम्यान माझा मुलगाच गाडी चालवत होता, याचीही आई-वडिलांनी चौकशीत कबुली दिली आहे.पुण्यातील कल्याणी नगर परिसरात एका आलिशान सुपरकारने 19 मे रोजी रात्री अडीच वाजताच्या सुमारास दोघांना उडवलं. हे दोघेही पीडित आपल्या दुचाकीवर होते. धडक इतकी भीषण होती की, दोघे हवेत उडाले आणि दुसऱ्या एका कारवर जाऊन पडले. यानंतर कार रस्त्याच्या शेजारी जाऊन धडकली आणि तिथेच थांबली.

या धडकेत अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर पोलिसांनी कारवाई करत अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं होतं. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर 15 तासातच त्याला जामीन मंजूर करण्यात आला. जामीन मंजूर करताना निबंध लिहिण्याची अट घातल्याने संताप व्यक्त झाला होता.विशाल अग्रवालला आज दुसऱ्या गुन्ह्यात अटक केली जाणार आहे. त्याची ब्लड सॅम्पल बदलल्याच्या गुन्ह्याप्रकरणी चौकशी केली जाईल.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Pune Accident Pune Porsche Accident

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

पुणे कार अपघातात धक्कादायक माहिती समोर, बिघाड असलेली पोर्शे कार दिली लेकाच्या हातीपुणे कार अपघातात धक्कादायक माहिती समोर, बिघाड असलेली पोर्शे कार दिली लेकाच्या हातीPune Porsche Accident Case : महागड्या पोर्श कारच्या अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या कारने दोघांचा जीव घेतला ती कार बिघाड असलेली होती. यानंतरही ती कार मुलाच्या हाती देण्याची चूक विशाल अग्रवालन केली.
और पढो »

'मी नाही ड्रायव्हर कार चालवत होता', अल्पवयीन मुलाच्या दाव्यावर पोलिसांचा खळबळजनक खुलासा! म्हणाले, 'घरापासून..''मी नाही ड्रायव्हर कार चालवत होता', अल्पवयीन मुलाच्या दाव्यावर पोलिसांचा खळबळजनक खुलासा! म्हणाले, 'घरापासून..'Pune Porsche Accident: पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात पुणे पोलिस आयुक्यांनी मोठा खुलासा करण्यात आला आहे.
और पढो »

Pune News : पुणे अपघात प्रकरणात मोठा ट्विस्ट, ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी दबाव टाकणाऱ्या 'त्या' 4 व्यक्ती कोण?Pune News : पुणे अपघात प्रकरणात मोठा ट्विस्ट, ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी दबाव टाकणाऱ्या 'त्या' 4 व्यक्ती कोण?Pune porsche accident Update : पुणे कार अपघात प्रकरणात आलाय नवा ट्विस्ट.. ज्या अल्पवयीन आरोपीचं ब्लड सॅम्पल बदललं. त्या जागी त्याच्याच आईचं ब्लड सॅम्पल घेतल्याचा संशय व्यक्त केला जातोय.
और पढो »

5 अटक, 2 CCTV अन् ब्लड रिपोर्ट; पुणे अपघात प्रकरणात नेमकं काय घडलं? आयुक्तांनी सांगितला घटनाक्रम5 अटक, 2 CCTV अन् ब्लड रिपोर्ट; पुणे अपघात प्रकरणात नेमकं काय घडलं? आयुक्तांनी सांगितला घटनाक्रमPune Police Commissioner Press Conference: पुण्यातील पोर्शे अपघात प्रकऱणी आतापर्यंत नेमकं काय घडलं आहे याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.
और पढो »

सॅम पित्रोदा यांचा अखेर राजीनामा, जयराम रमेश यांनी दिली माहिती, नेमकं प्रकरण काय?सॅम पित्रोदा यांचा अखेर राजीनामा, जयराम रमेश यांनी दिली माहिती, नेमकं प्रकरण काय?Sam Pitroda Resigns From Indian Overseas Congress Post : भाजपकडून होत असलेल्या जोरदार टीकेनंतर इंडियन ओवरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी राजीनामा दिला आहे.
और पढो »

पुणे पोर्शे कार हादसाः मां से बदला गया था नाबालिग आरोपी का ब्लड सैंपल, नाम सामने आने के बाद से फरारपुणे पोर्शे कार हादसाः सोमवार को पुणे पुलिस ने ब्लड सैंपल के साथ हेरफेर करने के मामले में दो डॉक्टरों को गिरफ्तार किया था।
और पढो »



Render Time: 2025-02-22 12:25:55