Mumbai Local Train Update: प्रवाशांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. हार्बर मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
मुंबई शहरात प्रवास करण्यासाठी परवडणारे व जलद साधन म्हणजे मुंबई लोकल. मुंबई लोकलही सर्वसामान्यांची लाइफलाइन आहे. लोकल विस्कळीत झाल्यास प्रवाशांना फार मनस्ताप करावा लागतो. सोमवारी सीएसएमटी स्थानकात लोकल घसरली होती. आज त्याच ठिकाणी ब्लॉक घेऊन चाचणी घेण्यात आली. मात्र, अद्यापही हार्बर मार्गावरील वाहतूक सुरू झाली नाहीये.
हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. ज्या ठिकाणी सोमवारी दुर्घटना घडली तिथेच पुन्हा एकदा आज चाचणी घेण्यात आली. त्याच ठिकाणी दुरुस्तीनंतर आज रिकामी लोकल चालवण्यात आली. मात्र त्याच ठिकाणी पुन्हा रेल्वेचा डबा घसरल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं हार्बर मार्गावरील वाहतूक सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. काही काळासाठी हार्बर रेल्वे मार्गावरील सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सीएसएमटी स्थानकात ज्या ठिकाणी लोकल घसरली, त्याच ठिकाणी आज ब्लॉक घेऊन चाचणी करण्यात येत होती. त्या ठिकाणी असलेल्या एका पॉईंट वर दुरुस्ती करून पुन्हा एकदा रिकामी लोकल चालवण्यात आली. पण ही रिकामी लोकल देखील पुन्हा त्याच ठिकाणी घसरली. लोकलचा एक डबा घसरला आहे.चाचणी दरम्यान चालवण्यात आलेली ही लोकल पूर्णतः रिकामी होती आणि यामुळे पुन्हा एकदा हार्बर मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. वडाळा ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णतः बंद आहे.
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे विभाग बचाव पथक कामाला लागलं आहे. तातडीने ट्रॅक सामुग्रीची जमवाजमव केली जात आहे. दुरुस्तीच्या कामासाठी प्लॅटफॉर्म पूर्णपणे रिकामा केला आहे. काम पूर्ण होण्यासाठी साधारण दोन तास लागू शकतात, अशी माहिती देण्यात येतेय. त्यामुळं प्रवाशांसाठी पनवेल, खारघरला जाणाऱ्या लोकल फलाट क्रमांक 3 वरुन सोडल्या जाणार आहेत. तसंच, सुट्टीचा दिवस असल्याने प्रवाशांची गर्दी कमी आहे.
Mumbai Local News CSMT Station Mumbai Local Train CSMT Vadala Central Railway Mumbai Local Train Update Mumbai Local Train News In Marathi मुंबई लोकल न्यूज अपडेट.
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, लवकरच वाहतूक कोंडीतून होणार सुटका, कसं ते जाणून घ्या...Kashedi Tunnel: मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आता मुंबईतून गोवा किंवा कोकणात जाताना वाहूतक कोंडीची समस्या भेडसवणार नाही. कसं ते जाणून घ्या...
और पढो »
मुंबईची तहान भागवणाऱ्या तलाव्यात 20 टक्केच साठा, मे महिन्यात पाणीकपातीची वेळ?Mumbai News : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मे महिन्याला सुरुवात होणार आहे अशात तुमची तहान भागवणाऱ्या तलावाची स्थिती काय आहे जाणून घ्या.
और पढो »
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीतून माघार घेऊनही नाशिकमध्ये भुजबळांची नवी खेळी? पाहा का उडालीय खळबळ...Loksabha Election 2024 Nashik : दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु असतानाच नाशिकमधून आली राजच्याच्या राजकारणाती मोठी बातमी. छगन भुजबळ यांची खेळी की आणखी काय?
और पढो »
Indian Railway : काय सांगता? कोकणात जाणाऱ्या वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस रद्द?Indian Railway : कमीत कमी वेळात कोकण आणि अगदी गोव्यापर्यंत पोहोचवणाऱ्या या रेल्वेगाड्यांसंदर्भात का घेण्यात आला हा निर्णय? पाहा सर्वात मोठी बातमी...
और पढो »
Ram Navami 2024 : रामनवमीनिमित्त नाशिकमध्ये वाहतूक मार्गात बदल; 'हे' मार्ग बंद, पर्यायी मार्ग कोणते?Nashik News : नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रामनवमीनिमित्त शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आली आहे.
और पढो »
वेटिंग लिस्टची कटकट संपणार; सर्वांना मिळणार रेल्वेचे कन्फर्म तिकिट, केंद्रीय मंत्र्यांनी दिले संकेतConfirm Train Ticket: कन्फर्म रेल्वे तिकिट मिळवण्यासाठी नागरिकांना खूप आटापिटा करावा लागतो, मात्र, केंद्रीय मंत्र्यांनी एक आनंदाची बातमी दिली आहे.
और पढो »