Ulhasnagar Crime News: उल्हासनगर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. क्षुल्लक कारणावरुन मित्रानेच मित्राची हत्या केली आहे.
देशात गुन्हेगारीचा आलेख वाढल्याचे चित्र आहे. क्षुल्लक कारणावरुन जवळच्याच लोकांकडून दिवसाढवळ्या हत्या घडत आहेत. कल्याणजवळच्या उल्हासनगर येथेही एक भयंकर हत्याकांड घडलं आहे. मित्रानेच जवळच्या मित्राची हत्या केली आहे. उल्हासनगरात दारू कमी दिल्याने मित्रानेच मित्राचा खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
वाढदिवसाच्या पार्टीत दारु कमी दिल्याच्या रागातून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आपल्याच मित्राच्या घरी जाऊन मारहाण करून इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून फेकून देऊन खून केल्याची खळबळजनक घटना दोन दिवसापूर्वी उल्हासनगरात घडली आहे. या प्रकरणातील तीन आरोपींना काल विठ्ठलवाडी पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे.
दोन दिवसापूर्वी कार्तिक वायाळे या तरुणाचा वाढदिवस होता. त्यावेळी त्याने आपल्या मित्रांना वाढदिवसाची पार्टी दिली होती. त्यावेळी पार्टीत दारु देण्यावरुन कार्तिकचा मित्र निलेश यांच्यात भांडण झाले होते. त्यावेळी कार्तिक याने निलेशच्या डोक्यावर बिअरची बाटली फोडली होती. या भाडणांचा राग मनात धरुन निलेश क्षीरसागर ,सागर काळे, धिरज नंदकुमार यादव या तिघांनी संगनमत करुन कार्तिक विरोधात कट रचला.
कार्तिकच्या मृत्यूप्रकरणी सुरुवातीला विठ्ठलवाडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. परंतु पोलिसांनी सखोल तपास केला असता हत्या झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी चिंचपाडा भागातून तिघांना अटक करण्यात आली आहे. मात्र झालेल्या प्रकाराने शहरात एकच खळबळ उडाली आहे.कल्याण मध्ये अतिशय वर्दळीच्या ठिकाणी एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. कल्याण पूर्वेतील शंभर फुटी चौक परिसरात या प्राणघातक हल्ल्याची घटना घडली आहे. चार ते पाच जणांनी संदीप राठोड या तरुणावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला केला आहे.
उल्हासनगर ताज्या मराठी बातम्या Ulhasnagar Crime News Today Live Ulhasnagar Crime News Live उल्हासनगर आजच्या बातम्या उल्हासनगर मराठी बातम्या आजच्या ताज्या बातम्या आजच्या बातम्या लाइव्ह तरुणाची हत्या Crime News Today In Marathi Crime News Ulhasnagar Murder News
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'पंचायत' फेम अभिनेत्यानं सैफ आणि करीनाच्या रिसेप्शन पार्टीत केलं होतं वेटरचं काम! मग नोकरी सोडली अन्...आता आपण कोणत्या अभिनेत्याविषयी बोलतोय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल... तर पंचायत मध्ये त्याचा गज्जब बेज्जती है यार हा डायलॉग चांगलाच हिट झाला आहे. आजही त्याचा हा डायलॉग सोशल मीडियावर चर्चेत असतो. खरंतर, अभिनयाच्या जगात स्वत: चं स्थान निर्माण केलं आहे.
और पढो »
शादी, बर्थ-डे पार्टी में दिखा रहे ‘जादू’, स्कूल, कॉलेज में भी मैजिकजयपुर। ‘नारियल में आग लगना, मटके में पानी उपर आना, हवन कुंड में अपने आप अग्नि प्रज्वलित होना… कुछ ऐसे ही मैजिक अब शहर की बर्थडे पार्टीज, स्कूल पार्टीज के साथ मैरिज आदि में देखने को मिल रहे हैं। इसके लिए खासतौर से मैजिशियन को बुलाया जा रहा है। जादूगर वैज्ञानिक तरीके से प्रयोग...
और पढो »
ईडी, सीबीआय, आयटी बाजूला ठेवून मैदानात या... राऊतांकडून फडणवीसांना चॅलेंन्जSanjay Raut On Devendra Fadanvis: देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावर संजय राऊतांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी फडणवीसांना थेट इशारा दिला आहे.
और पढो »
LokSabha Result: आपण चौथ्या पक्षामुळे अपयशी झालो, फडणवीसांचं विधान; हा चौथा पक्ष कोणता?Devendra Fadnavis on LokSabha Result: यशाचे बाप अनेक असतात, पण अपयश ताकदीने अंगावर घ्यायचं असतं, पचवायचं असतं आणि निर्धार करायचा असतो अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांना कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्यास सांगितलं आहे.
और पढो »
शरद पवार गटात यायचच असेल तर...; रोहित पवारांचा 'त्या' आमदारांना इशाराRohit Pawar News: रोहित पवार यांनी अजित पवार गटातील आमदारांच्या घरवापसीवर प्रतिक्रिया दिली आहे. तसंच, 15 दिवसांचा अल्टिमेटमदेखील दिला आहे.
और पढो »
'पाकिटमारी करून कीर्तिकरांची जागा चोरली' राऊतांचा हल्लाबोल, 'ते' पत्र अन् निवडणूक निकालावरून इशाराLoksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून निकालापर्यंत राज्यात दर दिवशी अनेक घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळालं. त्यातच निकालानंतर समोर आलेली ही आणखी एक मोठी बातमी...
और पढो »