महाराष्ट्रमध्ये पुढील तीन दिवसांमध्ये थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे.
Maharashtra Weather News : राज्यासह देशभरात पुढील तीन दिवसांमध्ये हवामानात होणारे बदल काहीसे अडचणी वाढवणारे. पाहा सविस्तर हवामान वृत्त...देशभरात सध्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंतच्या बहुतांश राज्यांमध्ये गारठा वाढत असून अरबी समुद्रातील कमी दाबाच्या प्रणालीचे होणारे कमीजास्त परिणाम वगळता गुजरातपासून मेघालयापर्यंत आणि काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत तापमानात काही अंशांची घट नोंदवली जात आहे. अर्थात काही भागांमध्ये मात्र सूर्य डोक्यावर आल्यानंतर तापमानवाढही नोंदवली जात आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये राज्यातील बहुतांश भागांमध्ये थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर भारतातील पर्वतीय क्षेत्रांमध्ये थंडीचा कडाका वाढत असला तरीही मैदानी भागांमध्ये मात्र किमान तापमानात 2 ते 3 अंशांची वाढ झाली आहे. इथं महाराष्ट्रातील उत्तर क्षेत्र, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये थंडीचा कडाका वाढत असला तरीही कोकण किनारपट्टी क्षेत्रासह मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये दिवसा तापमानात वाढ झाल्याचं पाहायला मिळणार आहे. राज्यात गारठा धीम्या गतीनं वाढणार असून पुढील तीन दिवसांमध्ये तापमानाचा आकडा 3 ते 5 अंशांनी कमी होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.बातमीमहाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्र बातम्या
Weather Maharashtra Cold Wave Temperature Forecast
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Maharashtra Weather News : काश्मीरमधील थंडीचा महाराष्ट्रावर कसा होतोय परिणाम? राज्याच्या कोणत्या भागांमध्ये गारठा आणखी वाढणार?Maharashtra Weather News : हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्याच्या बहुतांश भागांमध्ये थंडीचा कडाका वाढणार असून, ही थंडी काहीशी अडचणी वाढवताना दिसणार आहे.
और पढो »
राज्यात रविवारी ढगाळ वातावरण, तापमानात घट होणार; थंडीचा कडाका कधी वाढणार?Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात गारठा वाढला असला तरी रविवारपासून थंडीचा कडाका कमी होणार असण्याची शक्यता आहे.
और पढो »
Maharashtra Weather News : मोठ्या विश्रांतीनंतर राज्यात थंडीचा कडाका वाढला; पुढील 24 तासात 'इथे' वाढणार गारठाMaharashtra Weather News : राज्यात कुठे गुलाबी, तर कुठे बोचरी थंडी; पाहा तुमच्या जिल्ह्यात, शहरात आणि खेड्यात काय असेल हवामानाची स्थिती...
और पढो »
महाराष्ट्रात नाताळला कडाक्याची थंडी नाहीच, पुढील 10 दिवसांत गारठा कमी होणारमहाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला असला तरी पुढील 10 दिवस तापामानात वाढ होणार आहे.
और पढो »
दवबिंदू गोठले, हिमकण झाले... राज्यात थंडीच्या लाटेची तीव्रता आणखी वाढली; IMD च्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष नकोMaharashtra Weather News : मागील काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली असून, हवामान विभागानं महत्त्वाचा इशारा देत नागरिकांना सतर्क केलं आहे.
और पढो »
महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला, हाडं गोठवणारा गारठा कायम राहणारमहाराष्ट्रात देशाच्या उत्तरेकडे वाढलेल्या थंडीच्या पकडेमुळे हाडं गोठवणारा गारठा कायम राहणार आहे.
और पढो »