Mhada Lottery 2024: म्हाडाची मुंबई मंडळाची सोडत जाहीर झाल्यानंतर आता कोकण मंडळाची सोडत जाहीर करण्यात येणार आहे. जाणून घ्या प्रक्रिया
अलीकडेच म्हाडाच्या मुंबई मंडळाची सोडत जाहिर झाली आहे. मुंबईत घराचे स्वप्न पाहणाऱ्यांना आता हक्काचे घर मिळाले आहे. मुंबईनंतर आता कोकण मंडळानेही लॉटरी काढली आहे. म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे 12 हजार 626 सदनिकांच्या विक्रीसाठी आज शुक्रवारी 12 वाजता सोडत जाहीर होणार आहे. म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते गो-लाइव्ह कार्यक्रमातर्गंत अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. या सोडतीत ठाणे शहर व जिल्हाा, कल्याण, टिटवाळा, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातील ओरोस, वेंगुर्ला आणि मालवण येथील घरांचा समावेश आहे. या सोडतीत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गंत अत्यल्प उत्पन्न गटासाठी 9883 सदनिका, 15 टक्के एकात्मिक शहर योजनेअंतर्गंत 512 सदानिका, 20 टक्के सर्वसमावेशक योजनेंतर्गंत एकूण 661 सदनिका आहेत. तसंच, मंडळाच्या विखुरलेल्या 131 सदनिकांचाही समावेश आहे.
दरम्यान, म्हाडा कोकण मंडळाच्या घरांची विक्री प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर करण्याचा निर्णय कोकण मंडळाने घेतला आहे. त्यानुसार, प्रथम प्राधान्य योजनेंतर्गंत या घरांची विक्री करण्यात येणार आहे. शेवटच्या घराची विक्री होईपर्यंत अर्ज विक्री-स्वीकृती आणि ताबा प्रक्रिया सुरू राहणार. या घरांसाठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात 11ऑक्टोबरपासून होणार आहे. तर, ही प्रक्रिया 10 डिसेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. यानंतर या लॉटरीची सोडत 27 डिसेंबर रोजी काढली जाणार आहे.
Mhada Lottery 2024 Mhada Lottery News Mhada Konkan Board Lottery 2024 Marathi News News Marathi म्हाडा मुंबई लॉटरी म्हाडा ताज्या बातम्या म्हाडा लेटेस्ट न्यूज म्हाडा लॉटरी मराठी बातम्या ताज्या बातम्या म्हाडा कोकण मंडळ लॉटरी
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Big News : लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल करण्याची शेवटी तारीख जाहीर; 4500 खात्यात जमा होणारआता फक्त अंगणवाडी सेविकांमार्फत लाडकी बहीण योजनेसाठी आलेलेच अर्ज स्वीकारले जात आहेत. ऑनलाईन ॲप द्वारे देखील अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. ज्या महिलांना या योजनेचे अर्ज भरायचे आहेत, त्यांना अंगणवाडी सेविकांकडे जाऊनच अर्ज भरावे लागणार आहेत. तेव्हाच त्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे.
और पढो »
Maharashtra Board HSC SSC Exam 2025: ऑनलाइन अर्ज भरण्याच्या तारखा जाहीर; मोजावे लागणार अधिक पैसेMaharashtra Board HSC SSC Exam 2025 Online Application Time Table: राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ऑनलाइन माध्यमातून अर्जभरण्यासंदर्भातील माहिती दिली.
और पढो »
TATA कडून विविध पदांची भरती जाहीर, मुंबईत नोकरी आणि 1 लाखपर्यंत पगार; 'येथे' पाठवा अर्जJobs in TATA 2024: चांगल्या पद आणि पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्वाची अपडेट आहे. टाटा इंडस्ट्रीमध्ये अंतर्गत येणाऱ्या टाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडांमेंटल रिसर्चमध्ये टीआयएफआरमध्ये विविध पदे भरली जाणार आहेत.
और पढो »
कोणाला लागणार म्हाडाची लॉटरी? कुठे पाहता येईल निकाल, नाव जाहीर झाल्यानंतर पुढे काय? जाणून घ्याMumbai Mhada Lottery 2024: म्हाडा मुंबई मंडळाची आज 2030 घरांसाठीची सोडत जाहीर करण्यात येणार आहे. कुठे पाहता येणार निकाल? वाचा
और पढो »
आजपासून वेगवान प्रवासाचा श्रीगणेशा; कोस्टल रोड- सी लिंक मार्गे मरीन ड्राईव्ह ते वांद्रे अवघ्या 12 मिनिटांतMumbai Coastal Road : मरिन ड्राईव्हहून वांद्रे गाठा अवघ्या 12 मिनिटांत; समुद्राच्या लाटांहूनही ऊंच मार्ग मुंबईकरांच्या सेवेत. जाणून घ्या सर्व अपडेट...
और पढो »
Horoscope : 'या' 5 राशीच्या लोकांना होणार अचानक धनलाभ, असा असेल आजचा दिवसआजचा दिवस कसा असेल जाणून घ्या, कारण तसा दिनक्रम तयार करणे फायदेशीर ठरेल.
और पढो »