Chhagan Bhujbal On Devendra Fadanvis Meet: छगन भुजबळ यांनी आज सागर बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी नेमकी काय चर्चा झाली हे त्यांनी सांगितलं आहे.
फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारानंतर राष्ट्रवादीच्या गोटात नाराजी असल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने ते नाराज आहेत. त्यांनी त्यांची नाराजी थेट बोलून देखील दाखवली आहे. असं असतानाच आज छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. सागर बंगल्यावर या दोन नेत्यांची भेट झाली. तब्बल अर्धा तास दोघांमध्ये चर्चा झाली. या भेटीत नेमकं काय घडलं याचे उत्तर छगन भुजबळ यांनीच दिलं आहे.
छगन भुजबळ व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर बैठक पार पडली. या बैठकीत ओबीसी आणि मंत्रिमंडळ या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे भुजबळांनी सांगितलं आहे. बैठकीनंतर भुजबळांनी माध्यमांसोबत संवाद साधला तेव्हा 8-10 दिवसानंतर पुन्हा मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भुजबळांनी म्हटलं आहे की, 'आज मी आणि समीर भुजबळ दोघांनी मुख्यंमंत्र्यांची भेट घेतली. अनेक गोष्टींवर चर्चा झाली. सामाजिक आणि राजकीय विषयदेखील होते. काय, काय घडलं आणि काय चालु आहे, यासंदर्भात चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, वर्तमानपत्र आणि मीडियाच्या माध्यमातूनबऱ्याचशा गोष्टी पाहिल्या आहेत. महायुतीला जो महाविजय मिळाला आहे त्यामागे ओबीसीचे पाठबळ आपल्याला मोठ्या प्रमाणात लाभलं. त्याचासुद्धा मोठा वाटा आहे. ओबीसींनी विशषेतः आपल्या महायुतीला जो आशीर्वाद दिला त्याचे आभार मानले पाहिजेच.
'राज्यात जे काही सुरू आहे. आत पाच सहा दिवस शाळा कॉलेजचा सुट्ट्या आहेत. राज्यात वेगळं वातावरण आहे. 8 ते 10 दिवस तुम्ही मला द्या. 8-10 दिवसानंतर आपण पुन्हा भेटू आणि आपण निश्चित यावर मार्ग काढू यावर, असं फडणवीस म्हणाले. तसंच, मला विनंती केली की ओबीसी नेत्यांना सांगा मी साधकबाधक विचार करत आहे. हा निरोप ओबीसी आणि ओबीसींनी पाठबळ देणाऱ्या घटकांना द्या,' असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.
Chhagan Bhujbal Devendra Fadanvis Chhagan Bhujbal News Devendra Fadnavis Chhagan Bhujbal Meets Devendra Fadnavis NCP BJP Maharashtra Politics Ajit Pawar
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'आम्ही सारखं लहान बाळाप्रमाणे बसून...,' भारताच्या दिग्गज खेळाडूने पृथ्वी शॉला स्पष्ट शब्दांत सांगितलं, 'उगाच जबरदस्ती...'श्रेयस अय्यरने पृथ्वी शॉला स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे. पृथ्वी शॉ अद्याप 25 वर्षांचा असून त्याच्याकडे पुन्हा फॉर्म मिळवण्याची संधी आहे असंही त्याने सांगितलं आहे.
और पढो »
अजित पवारांचं ठरलं! स्वत: फोन करुन 'या' 5 जणांना मंत्रिपदाची शपथ घेण्यास सांगितलं; भुजबळ, मुंडेंचा पत्ता कट?Maharashtra Cabinet NCP Ajit Pawar Miniters Full List: सर्वाधिक स्ट्राइक रेटच्या बाबतीत भारतीय जनता पार्टी खालोखाल असलेल्या अजित पवारांच्या पक्षाचे कोणते आमदार मंत्रिमंडळात असणार हे निश्चित झालं आहे.
और पढो »
राज्यसभेत सीटखाली नोटांचा बंडल सापडल्याने गदारोळ; संसदेत नेमकं काय काय नेण्यास परवानगी असते?राज्यसभेत काँग्रेस खासदाराच्या खुर्चीखाली नोटांचा बंडल सापडल्याने एकच गदारोळ झाला आहे. यानंतर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.
और पढो »
Kurla BEST Bus Accident मधील मृतांची संख्या वाढली! पोलिसांनी सांगितलं नेमकं घडलं कायKurla BEST Bus Accident: सोमवारी रात्री पावणे दहाच्या सुमारस घडलेल्या या भीषण अपघातानंतर एकच गोंधळ उड्याचं चित्र पाहायला मिळालं. या प्रकरणासंदर्भात पोलिसांनी काय म्हटलं आहे पाहूयात...
और पढो »
Kurla BEST Bus Accident मधील मृतांची संख्या दुप्पट! पोलिसांनी सांगितलं नेमकं घडलं कायKurla BEST Bus Accident: सोमवारी रात्री पावणे दहाच्या सुमारस घडलेल्या या भीषण अपघातानंतर एकच गोंधळ उड्याचं चित्र पाहायला मिळालं. या प्रकरणासंदर्भात पोलिसांनी काय म्हटलं आहे पाहूयात...
और पढो »
मुंबईत कोणत्या पक्षाचे किती आमदार निवडून आले? वाचा 36 विजयी उमेदवारांची संपूर्ण यादीमुंबईतील 36 निकालांचा नेमका काय निकाल लागला आहे हे एका क्लिकवर जाणून घ्या
और पढो »