बाजारात सध्या सिमेंटच्या लसूणची विक्री केली जात आहे. यामुळे ग्राहकांची फसवणूक होत आहे.
Garlic Price Hike : स्वयंपाक घरात अत्यंत गरजेच्या असलेल्या लसणाचे दर सध्या गगनाला भिडले आहेत. अशातच लसणाचा काळाबाजार करणारे, चक्क सिमेंटचं लसूण विकत आहेत. बाजारात सिमेंटच्या लसणाची विक्री होत आहे. या विचित्र फसवणुकीमुळे ग्राहक आश्चर्यचिकत झाले आहेत.
अकोला शहरातील एका निवृत्त पोलीस कर्मचा-याच्या पत्नीनं घरासमोर आलेल्या फेरीवाल्याकडून पाव किलो लसूण खरेदी केलं. त्यामध्ये हुबेहुब लसणासारख्याच दिसणा-या लसणाच्या गाठी त्यांना दिसल्या. मात्र ती सोलली जात नसल्यानं त्यांनी ती चाकूनं कापली, तेव्हा सिमेंटला पांढरा रंग देऊन तयार केलेली ती बनावट लसूण असल्याचं उघड झालं. वजनात जास्त असल्यानं काळाबाजार करणारे अशी फसवणूक करत आहेत. त्यामुळे ग्राहकांनी सावधानता बाळगणं गरजेचं आहे.
स्वयंपाक घरात अत्यंत गरजेच्या असलेल्या लसणाचे भाव गगनाला भिडले असून लसूण विकत घेणे हे सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्या बाहेर गेले आहेत. यातच काही लसणाचा काळाबाजार करणाऱ्यांनी अजब शक्कल लढवीत नागरिकांची फसवणूक करण्याचे काम सुरू केले आहे.अकोला शहरातील बहुतांश भागात फेरीवाले रोज भाजीपाला विक्रीसाठी येत असतात यातीलच काही फेरीवाल्यांकडे बनावट लसुन विक्री करीत असल्याचे दिसून येत आहेय. अकोला शहरातील पोलीस विभागातून सेवानिवृत्त झालेल्या सुभाष पाटील यांची फसवणूक झाल्याची प्रकार उघडकीस आला आहेय..
आज सकाळी लसूण भाजी करिता वापरण्यासाठी घेतले असता यामधील एक लसणाची गाठ ही हुबेहूब ओरिजनल लसनासारखी दिसून आली मात्र होती ती आर्टिफिशियल पद्धतीने सिमेंटचा वापर करून बनवलेली. लसूण सोलताना त्याच्या पाकळ्या वेगळ्या होत नव्हत्या त्यामुळे सदर लसणाच्या गाठीला चाकूच्या सहाय्याने कापले असता ही गाठ सिमेंट पासून बनवली असून यावर पांढऱ्या रंगाचा वापर सुद्धा करण्यात आलाय हे त्यांच्या लक्षात आलं.
सदर लसणाच वजन सुमारे शंभर ग्रॅम एवढं आहेय. अकोला शहरांमध्ये सध्या लसणाचे भाव हे तीनशे ते साडेतीनशे रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचले असून काही लसणाची काळाबाजारी करणाऱ्या टोळ्या बाजारपेठेत सक्रिय झाल्या असून या टोळ्या फेरीवाल्यांच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहेय...अकोला शहरातील किरकोळ भाजीविक्रेते यांच्याकडून लसुन घेताना नागरिकांनी काळजीपूर्वक विकत घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहेय.
Cement Garlic Sale Of Cement Garlic In Akola Market Black Market Of Garlic Garlic Prices Increased लसूण लसूण सिमेंट
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Budget 2024 : बातमी पैशांची! यंदाच्या वर्षातील दुसरं बजेट शेअर बाजारातील गुंतवणुकदारांना फळणार की...?Budget 2024 : शेअर बाजारात अर्थसंकल्पाची घोषणा होण्याआधीच अनेक हालचालींना वेग आला असून, आता निर्मला सीतारमण नेमक्या कोणत्या घोषणा करतात याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.
और पढो »
पूजा खेडकरांच्या आधारकार्डमुळे पुण्यातील मोठं हॉस्पिटल अडचणीत? 'त्या' कागदपत्रांमुळे पोलखोलPooja Khedkar Case: पूजा खेडकर यांना नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र कसं मिळालं यासंदर्भातील तपास सुरु असतानाच आता पिंपरी-चिंडवडमधील एक मोठं रुग्णालयही या प्रकरणात अडचणीत येण्याची शक्यता आहे.
और पढो »
स्मार्टफोनच्या जगात मुकेश अंबानींचा धमाका! प्रीपेड प्लॅनपेक्षा स्वस्त फोनJioBharat J1 4G : स्मार्टफोनच्या जगात मुकेश अंबानी यांनी धमाका केलाय. प्रीपेड प्लॅनपेक्षा स्वस्त फोन बाजारात धुमाकूळ घालतोय.
और पढो »
लैंगिक सुखाची मागणी, ऊसाचं शेत, Lipstick, ब्लाउज अन् 9 हत्या... Serial Killer अटकेतPolice Found Serial Killer Who Killed 9 Women: मागील 14 महिन्यांपासून तीन गावांमध्ये महिलांची रहस्यमय पद्धतीने हत्या केल्याची तब्बल 9 प्रकरणं समोर आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला.
और पढो »
हिंडेनबर्गच्या अहवालाचा शेअर बाजारावर काय परिणाम होणार? तज्ज्ञांचा गुंतवणूकदारांसाठी महत्वाचा सल्लाHindenburg Research : शेअर बाजारात गुंतवणूक करणा-यांनी या प्रकरणात केंद्राने सत्य परिस्थिती समोर आणावी अशी मागणी केली आहे.आता सर्वांचं लक्ष आहे ते आठवड्याच्या सुरुवातीला होणा-या शेअर बाजारातल्या व्यवहारांवर.
और पढो »
Yashashree Shinde Murder Case: उरण स्टेशनजवळ सापडले 2 महत्त्वाचे पुरावे; मिळणार अनेक प्रश्नांची उत्तरंYashashree Shinde Murder Case Big Update: मागील दोन आठवड्यांपासून पोलीस या प्रकरणामध्ये तपास करत असताना शोध घेत असलेल्या त्या दोन गोष्टी पोलिसांना सापडल्या असून यामधून अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत.
और पढो »