विराट कोहलीने ऑस्ट्रेलियन फॅन्सला सॅण्डपेपर कृतीची नक्कल करून उत्तर दिले. ऑस्ट्रेलियन फॅन्स विराटला चिडवत होते त्यांना विराटने सॅण्डपेपर कृतीची नक्कल करून उत्तर दिले.
विराटने रिकामे खिसे दाखवून ऑस्ट्रेलियन फॅन्स ला डिवचलं, स्मिथ च्या 'त्या' वादग्रस्त कृत्याची करुन दिली आठवण. IND VS AUS 5th Test : ऑस्ट्रेलियाची इनिंग सुरु असताना विराट मैदानात सॅण्डपेपर कृत्यावरून ऑस्ट्रेलियन फॅन्स ला डिवचलं आणि त्यांची खिल्ली उडवली. सिडनी टेस्ट सामन्याच्या तिसऱ्या दिवशी जसप्रीत बुमराहला दुखापत झाल्यामुळे मैदानात विराट कोहली टीम इंडियाचं नेतृत्व करताना दिसला.
सिडनी टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीची दुसरी इनिंग सुरु असताना भर मैदानात कर्णधार कोहलीने असे काही इशारे केले ज्याची सध्या सर्वत्र चर्चा होतं आहे. ऑस्ट्रेलियाची इनिंग सुरु असताना विराट मैदानात सॅण्डपेपर कृत्यावरून ऑस्ट्रेलियन फॅन्सला डिवचलं आणि त्यांची खिल्ली उडवली. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पाचवा टेस्ट सामना खेळवण्यात आला. या सामन्याच्या सुरुवातीला टॉस जिंकून टीम इंडियाने फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी टीम इंडियाने पहिल्या इनिंगमध्ये 185 धावा केल्या. तर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या पहिल्या इनिंगमध्ये 181 धावांवर ऑल आउट केले. टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला विजयासाठी मोठं आव्हान देण्याकरता फलंदाजीसाठी उतरली खरी मात्र ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजी अटॅक समोर 157 धावांवर ऑल आउट झाली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 158 धावांचं आव्हान मिळालं होतं, हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्स राखून पूर्ण केलं. दरम्यान दुसऱ्या इनिंगमध्ये भारतीय गोलंदाज ऑस्ट्रेलियाच्या केवळ ४ विकेट्स घेऊ शकले. दरम्यान स्टीव्ह स्मिथची विकेट पडल्यावर मैदानात विराट कोहलीने केलेल्या इशाऱ्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियन फॅन्स यांची मैदानावरील जुगलबंदी काही औरच असते. बऱ्याचदा ऑस्ट्रेलियन फॅन्स विराट कोहलीला चिडवताना दिसतात. तर विराट कोहली देखील त्याच्या स्टाईलने त्यांना उत्तर देत असतो. असंच काहीस मैदानात स्टीव्ह स्मिथची विकेट पडल्यावर झालं. स्टीव्ह स्मिथ आऊट झाल्यावर प्रेक्षक कोहलीला ओरडू लागले. तेव्हा विराटने सॅण्डपेपरच्या कृतीची नक्कल करत प्रतिक्रिया दिली. सध्या विराटचा हा व्हिडीओ व्हायरल होतोय. 2018 मध्ये कॅमेरून बॅनक्रॉफ्ट मैदानात अशी अॅक्शन करताना दिसला होता
विराट कोहली ऑस्ट्रेलियन फॅन्स स्मिथ टेस्ट क्रिकेट सिडनी टेस्ट
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
लग्नाच्या नावाखाली फसवणूक करणारा रॅकेटउत्तर प्रदेशात लग्नाच्या नावाखाली लोकांना फसवून त्यांच्याकडून पैसे आणि दागिने घेत घेणारा रॅकेट उघड झाला आहे.
और पढो »
शेयर बाजार में तेज गिरावटवर्षच्या शेवटच्या कार्यावधीत शेअर बाजारात आज मोठा घसरण झाला, तर गुरुवारी बाजारात चांगला उतार झाला होता. Sensex ने 800 अंक गमावले, परंतु शेअर बाजार बंद झाल्यावर तो 720 अंक कमी झाल्याने 79,223.11वर बंद झाला. Nifty 50 ने 183 अंक गमावले आणि 24,004वर बंद झाला. Nifty Bank देखील 616 अंक कमी झाला आणि 50,988वर बंद झाला.
और पढो »
Video: मेलबर्न कसोटीमध्ये मैदानात राडा! 19 वर्षीय खेळाडू विराटला धडकल्यानंतर...Video Virat Kohli Vs Sam Konstas Fight On Ground: विराटचा ज्या ऑस्ट्रेलियन खेळाडूबरोबर वाद झाला तो पहिलाच अंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळत होता.
और पढो »
विराट कोहलीचा ऑस्ट्रेलियाच्या पत्रकारांशी विमानतळावर वादविराट कोहलीला मेलबर्न विमानतळावर आपल्या मुलांना शूट केलं जात असल्याची शंका आली. यामुळे त्याने ऑस्ट्रेलियाच्या प्रसारमाध्यमांशी वाद केला. पण शेवटी दोन्ही पक्षांनी वाद मिटवला.
और पढो »
अॅडिलेडमधील पराभवानंतर विराट कोहलीनं उचललं अनपेक्षित पाऊल; या निर्णयानं सुनील गावस्करांचाही विश्वास बसेनाVirat Kohli, India vs Australia: विराट असा कोणत्या निर्णयावर पोहोचला की...; भारतीय संघातील या खेळाडूच्या निर्णयानं भलेभले हैराण. त्यानं असं नेमकं काय केलं?
और पढो »
Google Search 2024 च्या सर्च लिस्टमध्ये 'अकाय' चा बोलबाला, विराट-अनुष्काच्या लेकाच्या नावाचा अर्थ काय?अकाय हे नाव युनिक असल्यामुळे सोशल मीडियावर याची मोठी चर्चा झाली. लोकांमध्ये या नावाचा अर्थ नेमका करत काय हे जाणून घेण्याची उत्सुकतता होती.
और पढो »